मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ५ वा| अध्याय ११ वा स्कंध ५ वा पंचम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा स्कंध ५ वा - अध्याय ११ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ५ वा - अध्याय ११ वा Translation - भाषांतर N/A६८जडभरत ते ऐकूनियां वाणी । निर्भय तो मनीं वदला स्पष्ट ॥१॥अज्ञ ज्या विषयीं तेथ मूढासम । पूर्वपक्ष जाण करिसी राया ॥२॥तात्त्विकाविषयीं लौकिक व्यवहार । कदाही न थोर उच्चारिती ॥३॥वैदिकही काम्यकर्मे गौण होती । म्हणसील प्रवृत्ति ज्ञात्यातेंही ॥४॥तरी त्या ज्ञात्यासी पात्रता न जाण । अनुभवज्ञान नसे तया ॥५॥कर्मजन्यसौख्य स्वप्नासम त्याज्य । कळे न जयास ज्ञानी त तो ॥६॥उपनिषदेंही व्यर्थचि तयासी । कथी भरतोक्ति वासुदेव ॥७॥६९सात्त्विक राजस तामस विकार । तोंवरीचि नर कर्मे करी ॥१॥प्रथम वासना पुढती आसक्ति । सत्त्वादिकां शक्ति पुढती येई ॥२॥कामक्रोधादिकां तेणें चढे बळ । इंद्रियसमूह भूतांसवें ॥३॥होऊनियां मन, चालक तें होई । भिन्न भिन्न घेई जन्म ऐसे ॥४॥जोंवरी हें मन तोंवरीचि द्वंद्वे । बंधन जाणावें तोंवरीचि ॥५॥विषयासक्त तें पाडी संसारांत । विषयविमुक्त होतां मोक्ष ॥६॥घृतयुक्त दीप कज्जल प्रसवे । संपतां तें पावे शुद्धरुपा ॥७॥७०ज्ञानकर्मेद्रियें अभिमान तेंवी । अहंकारवृत्ति द्वादश या ॥१॥पंचकर्मे, पंचभूतें तैं शरीर । ममत्वासी मूळ अभिमानचि ॥२॥अहंकार तो मी, माझें हा अभिमान । मनानेचि जाण खेळ सर्व ॥३॥अहंकारासवें देहामाजी जीव । विश्रांति सदैव घेत असे ॥४॥वृत्ति या, विषय, स्वभाव, संस्कार । कर्म, कालें पक्व होऊनियां ॥५॥कोटयवधि रुपें करिती धारण । वृत्तियुक्त मन तोचि जीव ॥६॥वृत्तीसवें जागृत्स्वप्नादीचें ज्ञान । जीवाप्रति जाण नृपश्रेष्ठा ॥७॥वासुदेव म्हणे हाचि त्वं पदार्थ । आतां तत्पदार्थ कथिती मुनि ॥८॥७१सर्वव्यापी जगच्चालक अव्यय । ईश स्वयमेव तत्पदार्थ ॥१॥सविकार मन जोंवरी न शांत । तोंवरी अनंत जन्म घेणें ॥।२॥त्रिविध तापांचे पिकवूनि मळे । मन स्वयें मळे निजदोषानें ॥३॥यास्तव सावध होऊनि मनाचा । नाश करीं राजा, दक्षपणें ॥४॥तस्कर हा बळें चोरील आत्म्यासी । शस्त्र एक यासी सेवारुप ॥५॥गुरु-ईशसेवा शस्त्रें याचा नाश । वासुदेव बोध मुनिंचा ऐके ॥६॥ N/A References : N/A Last Updated : November 06, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP