मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ५ वा| अध्याय ४ था स्कंध ५ वा पंचम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा स्कंध ५ वा - अध्याय ४ था सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ५ वा - अध्याय ४ था Translation - भाषांतर २०मेरुदेवीच्या उदरीं । जन्म पावला श्रीहरी ॥१॥त्याच्या हस्तपादादिकीं । चिन्हें वज्र अंकुशादि ॥२॥चंद्रकलेसम वृद्धि - । पावतां, त्या समता शांति ॥३॥वैराग्यही तें ऐश्वर्य । प्रभाव हे दृग्गोचर ॥४॥श्रेष्ठत्वें त्या ‘ऋषभ’ नांव । हर्षे ठेवीतसे राव ॥५॥लोकोत्तर रुप त्याचें । उपजे मत्सर इंद्रातें ॥६॥पाडितां तो अवर्षण । योगबळेंचि पर्जन्य ॥७॥नाभिराजाचा आनंद । सामावे न तो नभांत ॥८॥अत्यानंदें कंठ दाटे । मुखीं शब्दही नुमटे ॥९॥बाळा, वत्सा, म्हणे राव । देवा, कथी वासुदेव ॥१०॥२१अनुरक्त प्रजा जाणूनि पुढती । राज्यभार अर्पी तयाप्रति ॥१॥कांतेसवें जाई स्वयें बदरीवनीं । तप आचरुनि मुक्त झाला ॥२॥निर्मळता त्याची वर्णवेल कैसी । प्रत्यक्ष हरीचि पुत्र ज्याचा ॥३॥वासुदेव म्हणे भक्तराज ऐसा । जगीं लाभे कैसा वारंवार ॥४॥२२राया, कर्मभूमी मानी स्वदेशास । गुरुगृहीं वास प्रथम केला ॥१॥अध्ययन होतां गुरु तयाप्रति । गृहस्थाश्रमाची आज्ञा देती ॥२॥तया निष्कामासी नव्हती कांहीं इच्छा । उद्धार जगाचा करणें हेतु ॥३॥देवेंद्र त्या अर्पी स्वकन्या ‘जयंती’ । शतपुत्र होती तयांलागीं ॥४॥‘भरत’ त्यां माजी होता महायोगी । भारतवर्ष ही संज्ञा तेणें ॥५॥कुशावर्तादिक बंधु त्या पाठचे । ‘कवि’ ‘हरि’ ज्ञाते पुत्र नऊ ॥६॥भागवतधर्म निवेदिला त्यांनीं । इतर यज्ञकर्मी निरत सदा ॥७॥वासुदेव म्हणे ऋषभचरित । परम पवित्र पुढती ऐका ॥८॥२३पूर्णब्रह्म अनासक्तचित्त । परी धर्मनिष्ठ, लोकांस्तव ॥१॥सुलभ निश्चित धर्मपंथ जनीं । दाखवावा मनीं हेंचि इच्छा ॥२॥मूर्तिमंत दया, शांति, समभाव । विप्रांप्रति देव मानीतसे ॥३॥सर्वज्ञही परी वेदांचें रहस्य । पुसूनि विप्रांस आचरी तो ॥४॥सर्वदा संतृप्त सर्व प्रजा त्याची । न्य़ूनता कोणासी नव्हती कांहीं ॥५॥ब्रह्मावर्ती ऋषिसभेंत एकदां । पुत्रमिषें बोधा सकलां करी ॥६॥वासुदेव म्हणे ऋषभाचा बोध । ऐकूनि आनंद पावो जन ॥७॥ N/A References : N/A Last Updated : November 06, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP