मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ५ वा| अध्याय १३ वा स्कंध ५ वा पंचम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा स्कंध ५ वा - अध्याय १३ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ५ वा - अध्याय १३ वा Translation - भाषांतर ७५नृपा, हा संसार दु:खाचा सागर । यामाजी संचार अर्थेच्छूंचा ॥१॥आडवनीं सार्थ चुकतां जेंवी धोका । जीवांची ते दशा तैसी एथ ॥२॥वासनानायक कुमार्गे चालतां । वृक गोमायूंचा घेर पडे ॥३॥षड्रिपुतस्कर निर्दय पीडिती । लतागुल्मांमाजी गुंततां ते ॥४॥विघ्नरुपी दंश मशक त्या ठायीं । गांजिताती पाहीं सर्वकाल ॥५॥गंधर्वनगरीसम रम्य देह । मानूनियां सत्य, भ्रमण होई ॥६॥वासुदेव म्हणे भवाटवी थोर । पीडी अविचारमग्न जीवा ॥७॥७६कोठें ‘कोलती’ सुवर्ण । धरायास धांवे रान ॥१॥रजस्वलावावटळ । करी तयासी व्याकूल ॥२॥विसरे आत्मज्ञानदिशा । भ्रमतां होतसे निराशा ॥३॥निंदामशकांचा दंश । पीडा देई अहर्निश ॥४॥मशक सांपडे न कदा । असह्य त्या होती पीडा ॥५॥ओरडती शत्रुघूक । कंप पावतें काळीज ॥६॥दुष्ट काम-क्रोधवृक्ष । कवटाळिती ते क्षुधार्त ॥७॥वासुदेव म्हणे मिथ्या । मृगजलाची त्यां आशा ॥८॥७७जलहीन सरितांमाजी । निमज्जनीं होई राजी ॥१॥पुढती बहु हाल होती । शरण जाई बांधवासी ॥२॥वणव्यामाजीही गवसे । लुटिती दैत्य सर्वस्वातें ॥३॥कोणी बलिष्ठ ओढिती । दीनवाणा होई अंतीं ॥४॥कांहीं आप्त देती धीर । परी क्षणिक आधार ॥५॥कांटे, खडे रुतती पायीं । गिरिशिखरींही जाई ॥६॥वासुदेव म्हणे मार्ग । वाटे तया अवघड ॥७॥७८निद्राअजगर ग्रासितो तयासी । मृतचि मानिती आप्त कदा ॥१॥टाकितां वनांत पीडिताती सर्प । तेणें होई अंध दैवें कोणी ॥२॥पतन तयाचें होई कूपामाजी । आक्रंदे पुढती करुण स्वरें ॥३॥कदा परस्त्रीसी शोधितां कामांध । कळतां तें आप्त क्रुद्ध होती ॥४॥होतांही ते वश अन्यचि तियेसी । हिरावूनि नेती बलात्कारें ॥५॥शीतोष्णादि द्वंद्वें सहन न होती । कदा कपटकृति द्वेषमूळ ॥६॥वासुदेव म्हणे नागवल्या जीवा । देई न विसावा कोठें कोणी ॥७॥७९परद्रव्यासक्ति उपजतां पोटीं । पावतो फजिती लोकांमाजी ॥१॥परस्परांमाजी द्रव्यार्थ कलह । त्यांतचि विवाह करिती सौख्यें ॥२॥ऐसे विषयांत रमूनियां जाती । संकटें यद्यपि येती बहु ॥३॥मृतासी त्यागिती, जन्मे त्या पाळिती । ऐसा क्रमिताती पुढील मार्ग ॥४॥परोपरी कष्ट यापरी भोगितां । कोणी मूळ शोधा प्रवर्तेना ॥५॥पारही न कोणी जाई माझें माझें । करुनियां ओझें व्यर्थ वाहे ॥६॥शासन कोणासी वैरभावें ज्ञाता । न करी, सायुज्यता तेणें पावे ॥७॥वासुदेव म्हणे भवाटवीमाजी । विषयांत राजी जीव नित्य ॥८॥८०बाहुलतापाशीं बालक पक्ष्यांचे । बोल बोबडे ते मधुर मानी ॥१॥कदाकाळीं कोणी सिंहासी भिऊनि । सख्यत्व जोडूनि कंक-गृध्रां ॥२॥वंचित जाहल्यावरी हंसांप्रति । क्षणभरी जाती शरण दु:खें ॥३॥त्यागूनि तयांही पुढती मर्कटांसी । जोडूनियां मैत्री विषयीं लुब्ध ॥४॥विषयमग्नासी कालविस्मरण । होऊनि पतन होई घोर ॥५॥दरींत त्या, मृत्युगजासी भिऊनि । जाळींत दडूनि स्वस्थ राहे ॥६॥वासुदेव म्हणे वांचतां फिरुनि । रमे त्याचि कर्मी ज्ञानहीन ॥७॥८१राजा रहुगुणा, भवाटवीमग्ना । शासन न अन्या करीं गर्वे ॥१॥सर्वभूतसख्यें करीं ईशसेवा । सकल विषयां अव्हेरुनि ॥२॥पाजळतें ज्ञानखड्ग घेईं करीं । छेदीं हें सत्त्वरी भवारण्य ॥३॥वासुदेव म्हणे भरताची वाणी । ऐकूनियां मनीं तुष्ट राव ॥४॥८२संतुष्ट नृपाळ म्हणे सज्जनांचा । संग देवादिकां दुर्लभचि ॥१॥ईश्वरभजनें कंठिती जे वय । तयांचें सान्निध्य न मिळे देवां ॥२॥मुने, दोन घटि सहवास झाला । अविवेक गेला तेणें माझा ॥३॥नित्य पायधुळीमाजी जे लोळती । कां न मुक्त होती ऐसे नर ॥४॥कोण्या वेषें साधु वसती न कळे । यास्तव जोडिले सकलां कर ॥५॥वासुदेव म्हणे आशीर्वादइच्छा । धरील तयाचा उदय होई ॥६॥८३शुक रायाप्रति बोलले यापरी । उपदेश करी भरत नृपा ॥१॥अवमानखेद नसेचि ज्ञात्यासी । रहुगुण वंदी प्रेमें तया ॥२॥सद्गदित कंठ पाहूनि नृपाचा । मोद भरताचा प्रगट होई ॥३॥निर्विकार क्षणीं होऊनि चालला । मोह नष्ट झाला नृपाळाचा ॥४॥सत्संगमहिमा अगाध यापरी । राया, ध्यानीं धरीं म्हणती शुक ॥५॥परीक्षिती म्हणे ज्ञानाचें महत्त्व । निवेदूनि अर्थ स्पष्ट करा ॥६॥भवाटवीचें त्या स्पष्ट कथा ज्ञान । न कळे त्याविण सामान्यासी ॥७॥वासुदेव म्हणे भवाटवीबोध । ऐका आतां स्पष्ट कथिती मुनि ॥८॥ N/A References : N/A Last Updated : November 06, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP