मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ५ वा| अध्याय १८ वा स्कंध ५ वा पंचम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा स्कंध ५ वा - अध्याय १८ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ५ वा - अध्याय १८ वा Translation - भाषांतर ११४भद्राश्ववर्षी तो भद्रथवा राव । प्रार्थी हयग्रीव ईश्वरासी ॥१॥म्हणे नमस्कार ईश्वरा, हा घेई । अंतपार नाहीं त्वन्मायेचा ॥२॥पिता, पुत्र, आप्त, पावती मरण । जन त्यांचें धन इच्छिताती ॥३॥चिरंजीव स्वयें मानूनि आपणां । पाहूनि हें मना नवल वाटे ॥४॥हेचि तुझी माया शाश्वत तूं एक । निवेदिती देव स्पष्टपणें ॥५॥चोरितां ते वेद दैत्यांनीं ईश्वरा । घेऊनि अवतारा अश्वरुपें ॥६॥रसातळांतूनि आणूनियां वेद । देसी तूं ब्रह्मयास नमन तुज ॥७॥वासुदेव म्हणे हयग्रीवाप्रति । आदरें प्रार्थिती भद्राश्वांत ॥८॥११५हरिवर्षी भक्त प्रल्हाद नृसिंहा । प्रार्थी तया देवा नमस्कार ॥१॥वज्रनख वज्रदंष्ट्रा हो प्रगट । सकल तेजांस मूळ तूंचि ॥२॥जाळूनियां टाकीं आमुच्या वासना । देईं नारायणा अभय आम्हां ॥३॥परस्पर दया उपजो सर्वांसी । दुष्टत्व लयासी नेई सर्व ॥४॥गृहधनासक्ति हरावी आमुची । निरंतर भक्ति जडो तव ॥५॥केवळ शरीरकर्मे जो आचरी । कृपा तयावरी श्रीहरीची ॥६॥अनुपम जगीं भक्तांचीं संगति । पावन करिती श्रवणें जनां ॥७॥कर्णरंध्रद्वारा अंतरीं ईश्वर । प्रवेशूनि मळ सकळ हरी ॥८॥गंगादिक तीर्थे नासे देहमल । अंतर निर्मल हरिभक्तीनें ॥९॥वासुदेव म्हणे भक्ति ते निष्काम । करितां प्रसन्न होई देव ॥१०॥११६प्रसादें हरीच्या देवतासान्निध्य । सद्गुणांचा वास नित्य घडे ॥१॥वरीवरी मोहकारी जे विषय - । सेवी, निरामय त्यजूनि ईश ॥२॥तया सवैराग्य ज्ञान केंवी लाभे । जीवन मत्स्यांचें उदक जेंवी ॥३॥तैसें सकलांचें जीवन श्रीहरी । कांस त्याची धरी तोचि श्रेष्ठ ॥४॥दुर्लक्षिती तया, तयां शक्ति, वय । यांचेंचि श्रेष्ठत्व, ज्ञानावीण ॥५॥ज्ञानकलेवीण श्रेष्ठत्व तें व्यर्थ । ज्ञानाविण व्यर्थ सकल कांहीं ॥६॥सकल विकारकारण संसार । जाणूनि, आधार ईश्वरचि ॥७॥दैत्यहो, तयाचा आश्रय करावा । प्रल्हाद केशवा स्तवी नित्य ॥८॥वासुदेव म्हणे प्रल्हादाची वाणी । धरील जो ध्यानीं देवत्व त्या ॥९॥११७केतुमालवर्षी प्रजापतिकन्या । तेंवी लक्ष्मी धन्या करी विष्णु ॥१॥कामदेवरुपें वसे तेथें हरी । संतुष्ट अंतरीं कन्या पुत्र ॥२॥छत्तीस सहस्त्र पुत्र भाग्यवंत । तितुक्याचि तेथ कन्या जाणें ॥३॥दिन-रजनीच्या देवता त्या दिव्य । प्रतिवर्षी गर्भपतन त्यांचें ॥४॥पतींसवें त्यांच्या लक्ष्मी करी ध्यान । ईश्वरस्तवन करुनियां ॥५॥वासुदेव म्हणे स्तवन तें ऐका । देवा कामरुपा लक्ष्मी स्तवी ॥६॥११८इंद्रियनियंत्या प्रभो, कामरुपा । जगीं उत्तमता सकळ तूंचि ॥१॥क्रिया-ज्ञानशक्ति संकल्प विकल्प । सकलही तूंच शक्तिरुपें ॥२॥वारंवार माझा घेई नमस्कार । पति तूं साचार एकमेव ॥३॥निर्भय जो स्वयें संरक्षी सर्वांसी । सत्य तोचि पति जगीं एक ॥४॥सकाम इच्छिती तेचि तयां देसी । इच्छा पुरवीसी निष्कामांच्या ॥५॥सुखार्थ सर्वही इच्छिताती मज । लाभतें मी ज्यांस भक्तिप्रिय ॥६॥ईशभक्तीवीण अन्य न पुरुषार्थ । ठेवीं कृपाहस्त शिरीं माझ्या ॥७॥अतर्क्यचि तुझी माया म्हणे लक्ष्मी । वासुदेव पाणी जोडी तयां ॥८॥११९वैवस्वत मन प्रार्थी रम्यकवर्षांत ॥ अद्यापि आदरें मत्स्यरुपी ईश्वरास ॥१॥मत्स्येश्वरा, असो नित्य नमस्कार माझा ॥ सर्वशक्ति सत्तारुपें आधार विश्वाचा ॥२॥व्यापक गंभीर तुझा वेदरुप शब्द ॥ बाहुबलीसम हे सर्व देव परतंत्र ॥३॥वैषम्यें त्यागितां तुज इंद्रादिक देवा ॥ पश्चात्ताप झाला पूर्वी प्रभो, देवदेवा ॥४॥प्रलयकालीं तूं देवा रक्षिलेंसी मज ॥ प्रभो, नमस्कार माझा नित्य असो तुज ॥५॥वासुदेव म्हणे विश्वचालक प्रभूसी ॥ सर्वकाळ प्रार्थीतसे मनु तया वर्षी ॥६॥१२०हिरण्मयवर्षी अर्यमा कूर्मासी । निरंतर प्रार्थी भक्तिभावें ॥१॥कूर्मरुपी देवा, घेई नमस्कार । रचिते हें सर्व तव माया ॥२॥आभासचि सर्व रुपे हीं ईश्वरा । जंगम स्थावरां तूंचि मूळ ॥३॥असंख्यात नामरुपें ही असूनि । मर्यादा सांख्यांनीं कथिली त्यांची ॥४॥कल्पनाचि परी वाटते ते मज । प्रार्थी ऐसें नित्य ईश्वरासी ॥६॥१२१भूमि त्या उत्तरकुरुवर्षामाजी । प्रार्थी वराहासी जनांसवें ॥१॥देवा, यज्ञरुपा, वेदमंत्रें बोध । होई तव यश, सर्वयुगीं ॥२॥विवेकेंचि तव बोध ज्ञानियांसी । नमन तुजसी असो भावें ॥३॥निरपेक्षा भक्तांस्तव इच्छा तुज । तूंचि मायाधीश सकल साक्षी ॥४॥लीलामात्रें मज सागरीं रक्षिलें । दैत्यासी वधिलें सहजपणें ॥५॥प्रभो, मज पाईं लीन मी सर्वदा । वंदी तया रुपा वासुदेव ॥६॥ N/A References : N/A Last Updated : November 07, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP