मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ५ वा| अध्याय १० वा स्कंध ५ वा पंचम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा स्कंध ५ वा - अध्याय १० वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ५ वा - अध्याय १० वा Translation - भाषांतर ६१परीक्षितीलागीं निवेदिती शुक । भरतवृत्तान्त पुढती ऐकें ॥१॥सिंधु सौवीराचा ‘रहुगुण’ राजा । ज्ञानार्थ एकदां कपिलाश्रमीं - ॥२॥जातां, मार्गी इक्षुमती नदीतीरीं । शोधितां बेगारी तया देशीं ॥३॥वाहक म्हणूनि आणिला भरत । वेठीविण मार्ग नव्हता तया ॥४॥रासभ वृषभांसम तो सुदृढ । पाहूनि वेठीस लावियेला ॥५॥कुरकुर कांहीं न करी भरत । वासुदेव वृत्त कथी ऐका ॥६॥६२न्याहाळूनि कीड मुंगी । पदार्पण करी मार्गी ॥१॥तेणें विषम होई गति । हिसके बैसती नृपासी ॥२॥देतां सूचना वाहक । करिती विनंती नृपास ॥३॥राया, नूतन बेगारी । मंद चालतसे भारी ॥४॥दोष एकाचा सकळां । बाधे कळलें नृपाळा ॥५॥वृद्धसेवेनें तो शांत । क्षात्रतेजें परी क्रुद्ध ॥६॥बोले भरतासी ऐका । वासुदेव कथी वृत्ता ॥७॥६३बंधो, एकाकी तूं वाहूनि वाहन । श्रमलासी पूर्ण बहुकाळ ॥१॥त्यांतही तूं कृश वार्धक्यपीडित । जोडीदार तुज व्यर्थचि हे ॥२॥ऐसा उपहास होतांही तो शांत । जाणूनियां कृत्य अविद्येचें ॥३॥मनीं म्हणे जन्म होवो हा अंत्यजि । देहाहंभावासी नको स्पर्श ॥४॥गति परी त्याची पालटली नाहीं । तदा क्रोध येई नृपाळासी ॥५॥जिवंत कीं मेला आहेसी रे म्हणे । येसील ताडनें शुद्धीवरी ॥६॥वासुदेव म्हणे सत्तांध पाहूनि । बोलला हांसूनि भरत ऐका ॥७॥६४राया, वदलासी तेंचि सत्य असे । भार न आम्हांतें भासे कांहीं ॥१॥देहासी न माझा लवही संबंध । जाणतों न मार्ग जवळी दूरी ॥२॥पुष्टता देहाची हे पांचभौतिक । अभिमानें विकार क्रोधादि ते ॥३॥जन्म-मरणादि राया, सकलांसी । धनी-सेवकाची भाषा व्यर्थ ॥४॥सेव्य-सेवकता शाश्वत ती नसे । राज्यलाभ मातें घडतां काय ॥५॥तैसाचि सेवक होशील तूं जरी । वागसील तरी केंवी सांगें ॥६॥ब्रह्मभावमग्न, जडमूढासम । वागे त्या शासन काय करी ॥७॥अथवा उन्मत्त मूढचि मी जाणें । परिणाम शासनें काय व्हावा ॥८॥वासुदेव म्हणे ज्ञात्याची ती वाणी । नृपाळ ऐकूनि चकित झाला ॥९॥६५शास्त्रपूत स्वानुभवपूर्ण वाणी । ऐकतां, त्यागूनि अहंकार ॥१॥उतरुनि खालीं वंदिले चरण । नम्रभावें कोण ऐसें पुशी ॥२॥यज्ञोपवीतें या त्रैवार्णिक कोणी । दत्तासम कोणी अवधूत कीं ॥३॥देश कुलही तें निवेदावें मातें । त्रैलोक्यीं विप्रांचें भय मज ॥४॥कपिलदर्शना जातसें मी तेचि । सांगा भेटलांती काय तुम्हीं ॥५॥गूढभाषा, गुप्त वेषधारी तुम्ही । मूढ अज्ञानी मी काय जाणें ॥६॥योगियांचे मार्ग संसारसक्तासी । केले उमगती पुण्यवंता ॥७॥वासुदेव म्हणे रहुगुण ऐसी । नम्रत्वें मुनींची कांस धरी ॥८॥६६मुने, युद्धादिक कर्मे होती श्रम । वाहककार्य न श्रमाविणें ॥१॥सत्यत्व न कांहीं व्यवहारप्रति । म्हणतां तें मजसी दिसे सत्य ॥२॥असत्यापासूनि कार्ये होती सत्य । केंवी त्या असत्य समजूं तरी ॥३॥जलसंचयादि कार्ये तीं प्रत्यक्ष । दिसतां असत्य केंवी घट ॥४॥यास्तव व्यवहार सत्यचि हा वाटे । तापवी पात्रातें अग्निसंग ॥५॥पात्रस्थ उदकें सिद्ध तो ओदन । इंद्रियें तैं प्राण पुढती मन ॥६॥याचि क्रमें सुखी दु:खी होऊनियां । गोंविताती जीवा संसारांत ॥७॥वासुदेव म्हणे रहुगुण ऐसी । शंका मानसींची स्पष्ट करी ॥८॥६७अनित्यचि जरी सेव्य-सेवकादि । कर्तव्य तयांसी करणें प्राप्त ॥१॥प्रजारक्षणार्थ ईश्वरें नृपासी । योजिलें तो शासी दुर्जनांतें ॥२॥दुर्जनत्व तेणें यद्यपि न नष्ट । धर्मे पापयुक्त होई नृप ॥३॥अवमानें क्रोध यद्यप न तुम्हां । परी मुने, क्षमा करा मज ॥४॥घडलाचि नाहीं अवमानदोष । म्हणतां नसे मज समाधान ॥५॥ज्ञात्याच्या अवमानें शिवाचाही नाश । होईल पातक थोर ऐसें ॥६॥वासुदेव म्हणे व्यवहार सत्य । तोंवरीचि पाप-पुण्य लोकीं ॥७॥ N/A References : N/A Last Updated : November 06, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP