मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ५ वा| अध्याय २१ वा स्कंध ५ वा पंचम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा स्कंध ५ वा - अध्याय २१ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ५ वा - अध्याय २१ वा Translation - भाषांतर १३७मुनि शुकाचार्य बोलती रायासी । दलें ब्रह्मांडाचीं स्वर्ग भूमि ॥१॥अंतरिक्ष त्यांच्या संयोगा कारण । सूर्यनारायण अंतरिक्षी ॥२॥उष्णता प्रकाश देई तो सर्वत्र । वर्णिलें जें एथ तेंचि स्वर्गी ॥३॥द्विद्वल धान्याचीं दलें जेंवी सम । तैसेंचि हें जाण नृपश्रेष्ठा ॥४॥मंद शीघ्र सम सूर्याच्या या गति । दक्षिण उदीची मध्यगामी ॥५॥दक्षिणायन तैं उत्तरायण तें । वैषुवत ऐसे भेद तेणें ॥६॥दिनरात्रीमान गतीनें त्या भिन्न । दिनरात्र सम मेष तूळीं ॥७॥वासुदेव म्हणे गतीचें परिमाण । निवेदिती जाण मुनिश्रेष्ठ ॥८॥१३८वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या । राशी या दिनमाना वुद्धिकारी ॥१॥प्रतिमासीं एक घटिका ते वृद्धि । क्रमानें पुढती रजनी वाढे ॥२॥वृश्चिक तैं धन, मकर, कुंभ, मीन । राशींप्रति जाण सूर्य यदा ॥३॥होई दिनवृद्धि उत्तरायणांत । दक्षिणायनांत रजनी वाढे ॥४॥नऊ कोटि एकावन्न योजनांचा । मार्ग दक्षिणेचा कथिला असे ॥५॥‘देवधानी’ नामें मेरुच्या पूर्वेसी । नगरी इंद्राची राजधानी ॥६॥दक्षिणेसी यमपुरी संयमनी । तेंवी निम्लोचनी पश्चिमेसी ॥७॥वरुणनगरी तैसी विभावरी । सोमाची ते पुरी उत्तरेसी ॥८॥वासुदेव म्हणे नगरी या चार । फिरे अहोरात्र सूर्यदेव ॥९॥१३९प्रात:काल यदा होई एक्या ठाईं । सायंकाळ पाहीं अन्यस्थळीं ॥१॥मध्यान्ह ते मध्यरात्र ऐशा क्रमें । योग्य काळीं कर्मे मनुज करी ॥२॥प्रदक्षिणावर्त प्रवह नामक । वायूनें आदित्य प्रदक्षिण ॥३॥मेरुसभोंवतीं फिरतो आदित्य । सर्वदा प्रकाश मध्यान्हसा ॥४॥दोन कोटी लक्ष अडतीस जाण । अर्ध लक्ष न्यून योजनांची ॥५॥गति पंचदश घटीमाजी सूर्या । मेरुप्रति फेर्या ऐशा घाली ॥६॥ज्योतिश्चक्रावरी चंद्रादिक ग्रह । नित्य अस्तोदय पावताती ॥७॥वासुदेव म्हणे सूर्य प्रतिदिनीं । चारीही हिंडूनि येई पुरें ॥८॥१४०संवत्सररुप चक्र सूर्यरथा । मासात्मक वारा आरा तया ॥१॥ऋतु त्याचि सहा धांवा तयाप्रति । काळ तीन नाभि, तया तीन ॥२॥दक्षिण उत्तर आंसासी त्या ध्रुव । मेरुवरी स्थिर एक आंस ॥३॥गायत्र्यादि सप्त छंद तेचि अश्व । अरूण तो अग्रभागीं स्थित ॥४॥बालखिल्य साठ सहस्त्र सूर्यासी । नित्य स्तविताती वेदमंत्रें ॥५॥द्वादश मासांचीं नामें तीं द्वादश । तैसेचि सेवक भिन्न भिन्न ॥६॥सार्ध नवकोटी वरी कांहीं लक्ष । योजनें तो मार्ग आदित्याचा ॥७॥वासुदेव म्हणे प्रतिक्षणीं दोन - । सहस्त्र योजन गति त्याची ॥८॥ N/A References : N/A Last Updated : November 07, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP