स्कंध ५ वा - अध्याय २३ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१४४
महर्षिमंडळावरी तेरा लक्ष । योजनें तें उंच विष्णुपद ॥१॥
अद्यापि त्या स्थानीं वसे ध्रुवभक्त । प्रदक्षिणा त्यास इंद्रादींच्या ॥२॥
भूर्लोकादींचा ध्रुव हा आधार । ईश्वर आधार नक्षत्रांसी ॥३॥
पक्ष्यांसम नभीं नक्षत्रसंचार । रुप शिशुमार भगवंताचें ॥४॥
ऊर्ध्वपुच्छ अधोमुख तो मकर । पुच्छाग्रीं तो ध्रुव विराजला ॥५॥
प्रजापति अग्नि इंद्रादि ते अध । सप्तर्षी तो मध्य कटिभाग ॥६॥
नक्षत्रें गृहादि अवयवीं त्या त्या । मकर चिंतितां पापनाश ॥७॥
वासुदेव म्हणे ईश्वराचें रुप । निवेदिती स्पष्ट मुनिश्रेष्ठ ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 07, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP