मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ५ वा| अध्याय १७ वा स्कंध ५ वा पंचम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा स्कंध ५ वा - अध्याय १७ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ५ वा - अध्याय १७ वा Translation - भाषांतर N/A१०७परीक्षितीप्रति बोलताती शुक । बळीच्या यज्ञांत महाविष्णु ॥१॥दक्षिण पादानें व्यापूनि भूमीसी । आक्रमी स्वर्गादि वाम पादें ॥२॥नखाग्रें ब्रह्मांडकटाहकवच । पावूनियां भेद तयावेळीम ॥३॥बाहेरुनि जलधारा येई आंत । ईशपदांबुज धुतले जाती ॥४॥स्नानमात्रें जल करी तें पावन । पापनिवारण करुनि सर्व ॥५॥‘भगवत्पदी’ हें नाम त्या प्रथम । गांठी स्वर्गस्थान बहु युगांनीं ॥६॥स्वर्गाचें मस्तक तेंचि विष्णुपद । जेथ ध्रुवभक्त वास करी ॥७॥चरणोदक तें कुलदेवतेंचे । पाहूनि ध्रुवातें हर्ष बहु ॥८॥वासुदेव म्हणे सत्त्वभाव अष्ट । ध्रुवाचे प्रगट होती तदा ॥९॥१०८ध्रुवपदाखालीं सप्तर्षीचें स्थान । कृतार्थ पाहून गंगेसी ते ॥१॥देवविमानें जैं संचरती तेथें । भगवत्पदी ते पुढती येई ॥२॥चंद्रमंडलासी करुनि पावन । होतसे अवतीर्ण मेरुवरी ॥३॥ब्रह्मपुरींतूनि प्रवाह ते चार । गांठिती सागर चोंहीकडे ॥४॥‘सीता’ ‘अलकनंदा’ ‘चक्षु’ आणि ‘भद्रा’ । नामें धरी गंगा भिन्न भिन्न ॥५॥सीता वेगें जाई पूर्वसमुद्रासी । चक्षु पश्चिमेसी सिंधु गांठी ॥६॥भद्रा उत्तरेसी, अलकनंदा ते । दक्षिण दिशेतें वाहतसे ॥७॥अलकनंदेचें करील जो स्नान । पदोपदीं पुण्य यज्ञाचें त्या ॥८॥याहूनिही अन्य बहुत नद-नद्या । पदोपदीं झाल्या मेरूंतूनि ॥९॥वासुदेव म्हणे सरिता न कृपा । पावन त्रैलोक्या करी गंगा ॥१०॥१०९सकल खंडामाजी राजा । महिमा श्रेष्ठ भारताचा ॥१॥कर्मभूमि तेचि एक । इतर खंडें भोगखंड ॥२॥पुण्यें देव अवशिष्ट । त्या त्या स्थानीं भोगितात ॥३॥भूमीवरील ते स्वर्ग । संज्ञा यास्तव तयांस ॥४॥दशसहस्त्राब्द तेथें । लाभे आयुष्य लोकांतें ॥५॥दीर्घकाळ सुरतक्रीडा । अंतीं अपत्य एकदां ॥६॥सुखांतचि केवळ मग्न । लोक तेथ रात्रंदिन ॥७॥वासुदेव म्हणे भोग । भोगिताती ते विविध ॥८॥११०कृतयुगामाजी ध्याननिष्ठ । त्रेतायुगीं सौख्य परम तयां ॥१॥द्वापर, कलि ते जाणा दु:खरुप । व्यवस्था सुस्पष्ट कालाची हे ॥२॥अष्टही त्या वर्षी गुहेंत आश्रम । सभोंवतीं रम्य वनशोभा ॥३॥देवही त्या स्थानीं क्रीडेस्तव येती । रंगूनियां जाती विलासांत ॥४॥दयाळु श्रीहरि लोकानुग्रहार्थ । दर्शनार्थ सिद्ध सर्वत्रचि ॥५॥वासुदेव म्हणे कृपा श्रीहरीची । होईल तयासी लाभ त्याचा ॥६॥१११इलावृत्तामाजी शंकर पार्वती । अन्य पुरुषांची वसती नसे ॥१॥कदा कोणी जातां पावेल स्त्रीदेह । पार्वतीचा शाप ऐसा असे ॥२॥शापाचें त्या वृत्त कळेल त्या पुढती । कोणीही न जाती ज्ञाते तेथ ॥३॥पार्वतीच्या दासी असंख्य त्या स्थानीं । सेवेंत रंगूनि जाती नित्य ॥४॥चतुर्मूर्तिमाजी शिव, संकर्षणा । ध्याई नित्य जाणा तमोरुपें ॥५॥वासुदेव म्हणे स्तुति जे तयाची । करी उमापति तेचि ऐका ॥६॥११२वारंवार तुज वंदन ईश्वरा । प्रभो, जगदाधारा हे अचिंत्या ॥१॥तूंचि एक देवा, भजनासी योग्य । सकलही भाग्य तुजमुळें ॥२॥भक्तांलागीं मुक्ति, दुष्टां भवबंध । देसी, तूंचि वंद्य त्रैलोक्यांत ॥३॥अनावर आम्हां विकार आमुचे । तेणें विषयांतें विजय लाभे ॥४॥परी सेवूनीही सकल विषयां । प्रभो, तूं निराळा स्वसामर्थ्ये ॥५॥मुमुक्षु यास्तव आदरिती तुज । मानिती विपरीत भाव अज्ञ ॥६॥मायामत्त तुज मानिताती मूढ । मघ्वासवधुंद भाससी त्यां ॥७॥वासुदेव म्हणे चरणस्पर्शेचि । कामानें पीडती नागस्त्रिया ॥८॥११३उत्पत्ति संहार स्थितीसी कारण । असूनि तूं अन्य तयांहूनि ॥१॥यास्तव अनंत म्हणती तुज श्रुति । राईचि मस्तकीं भूमंडल ॥२॥महत्तत्त्व तव अवतार प्रथम । तया सत्त्वगुण मुख्याधार ॥३॥महत्तत्त्व तोचि देवा, ब्रह्मदेव । त्यापासूनि शिव जाहलों मी ॥४॥रज्जुबद्ध पक्षी ज्यापरी स्वाधीन । तैसें हें आधीन विश्व तुझ्या ॥५॥मायामग्न जीव जाणती विषय । परी तुझे पान न जाणती ॥६॥उद्धार तयांचा तुझ्याचि आधीन । सद्भावें वंदन करितों तुज ॥७॥वासुदेव म्हणे स्तविती शंकर । जयासी आधार तोचि आम्हां ॥८॥ N/A References : N/A Last Updated : November 07, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP