मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ५ वा| अध्याय ६ वा स्कंध ५ वा पंचम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा स्कंध ५ वा - अध्याय ६ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ५ वा - अध्याय ६ वा Translation - भाषांतर ३७परीक्षिती म्हणे ज्ञानाग्नीनें दग्ध । कर्मबीजें त्यास सिद्धिपीडा - ॥१॥नसतांही, त्याग केला कां ऋषभें । निवेदावें मातें मुनिश्रेष्ठा ॥२॥शुक म्हणे ज्ञाते चंचल मनाचा । भरंवसा कदा धरितीचिना ॥३॥जालस्थही मृग पळती व्याध मानी । तैसा नित्य ज्ञानी सावधान ॥४॥मानूनि विश्वास करुं नये सख्य । शिवाचाही घात केला मनें ॥५॥जारिणी आश्रय करुनि जाराचा । घात स्वपतीचा करी जेवीं ॥६॥तेंवी कामक्रोधां आश्रय देऊनि । नष्ट करी जनीं योग्यां मन ॥७॥विकारमूळ त्या मनासी जिंकिता । दक्षचि सर्वदा असणें योग्य ॥८॥वासुदेव म्हणे रायालागीं शुक । कथिती वृत्तान्त पुढती ऐका ॥९॥३८राया, भूषण जो लोकपालांतेंही । जडचि तो पाहीं भासे जनां ॥१॥प्रभाव तयाचा कळलाचि न कोणा । आदर्श मरणा सिद्ध होई ॥२॥अभेदानुभवें जीव विषयांचा । संगचि सोडितां शांत होई ॥३॥काढितांही दंड कुलालाचें चक्र । फिरे कांहीं काळ तैसेंचि हें ॥४॥प्रारब्धें भ्रमतो कुटक पर्वतीं । ग्रास घेई मुखीं पाषाणांचा ॥५॥मुक्तकेश, नग्न, जडासम हिंडे । काननीं तैं सुटे थोर वारा ॥६॥घर्षणें त्या वेळीं पेटे वेणुवृंद । भस्म वणव्यांत ऋषभ होई ॥७॥वासुदेव म्हणे निर्भय, वनांत । प्रारब्धाअंकित केला देह ॥८॥३९कोंक, वेंक तेंवी कुटक प्रदेश । होईल ‘अर्हत’ राजा तेथें ॥१॥परमहंसाचें वृत्त तें ऐकूनि । पावेल तो मनीं दैवें मोह ॥२॥निर्भयपणेंचि स्वधर्म त्यागील । पाखंड रचील स्वबुद्धीनें ॥३॥आधींच तो कलि त्यांत ऐसा राजा । अधार्मिक होतां काय न्यून ॥४॥नृपाळानुरोधें वर्णाश्रमधर्म । त्यागितील जन स्वैराचारें ॥५॥स्नान आचमनादिक ते मंगल - । विधि, त्यागितील शास्त्रोक्त जे ॥६॥केशोत्पाटक कीं कर्तन रुचेल । मनसोक्त होतील सकल विधि ॥७॥वासुदेव म्हणे स्वैर निर्भयता । नाश मानवाचा करीतसे ॥८॥४०कलि अधर्माचें मूळ । जनां मोहांत पाडील ॥१॥देव, ब्राह्मण, सज्जन । श्रद्धा जाईल उडून ॥२॥जन नास्तिक होतील । शास्त्रप्रामाण्य त्यजितील ॥३॥स्वबुद्धीनेंचि अर्हत । चालवील धर्मपंथ ॥४॥वेदबाह्य ऐशा पंथें । जातील त्यां नरक लाभे ॥५॥वासुदेव म्हणे बुद्धि । अपूर्णचि मानवाची ॥६॥४१रजोगुणव्याप्त जनांचा उद्धार । करण्या अवतार ऋषभाचा ॥१॥ऋषभासंबंधीं बोलती सज्जन । ऐकें पुरातन भाषण तें ॥२॥सप्तद्वीपांमाजी श्रेष्ठ हें भारत । गोविंदचरित्र गाती जेथें ॥३॥धन्य प्रियव्रतवंश तो पावन । जेथें नारायण ऋषभ झाला ॥४॥ऋषभाचा योग योग्यांसी दुर्लभ । ऐकतां हें वृत्त भक्ति लाभे ॥५॥अर्पील श्रीहरी मुक्तीही एकदां । परी भक्ति कदा अर्पिचिना ॥६॥सद्गतीचा मार्ग दाविला ऋषभें । नमस्कार त्यातें असी नित्य ॥७॥वासुदेव म्हणे ऋषभआख्यान । करील पावन साधकासी ॥८॥ N/A References : N/A Last Updated : November 06, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP