मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
रात्र काळी, आकाश कृष्णवर्...

दिव्य - रात्र काळी, आकाश कृष्णवर्...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


रात्र काळी, आकाश कृष्णवर्ण । चंद्र काळ्या मेधांत हो विलीन.
हाय ! गेल्या तारका पुढें आतां । कृष्ण पसरे नभ घोर हें सभोंता. १
चित्त काळ्या दु:खांत बुडे पार  । मना गेले सोडोनि सदविचार
सर्व, काळें मज शून्य सर्व झालें । दिव्य माझें लोपलें. कुणीं नेलें ? २
विश्व काळाच्या सागरीं बुडालें । अब्धिसीमेनें बद्ध सदा झालें;
निधी पाताळीं खोलखोल गेले । दिव्य माझें चोरोनि कुणी नेलें ? ३
कालसागर वेढील तया काय  । कुणी सीमा घालील त्यास होय ?
कधीं नाहीं, उत्तान तें सदाचें । प्रेम शांतीचें न हो निराशेचें ४
इथें कोठें लाधे न दिव्य माझें । वृथा वाटे हा जीव जगीं ओझें.
कुणी कोठुनिही मला याच काळा । दिव्य माझें आणोनि अहो घाला.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP