मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
पाहुनी सखी सृष्टीला प्रेम...

दंवबिंदु - पाहुनी सखी सृष्टीला प्रेम...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


पाहुनी सखी सृष्टीला प्रेमळा उषा वेल्हाळा
ओढुनी तिला स्वच्छंदें आलिंगी परमानंदें,
प्रीतीची मुग्धा बोली तों धावुनि नयनीं आली.
सृष्टीच्या हृदयावरते - टपटपलीं मोत्यें मोत्यें.
मधुमधुर काब्यबिंदू ते - प्रीतीचें केंद्रच नसुतें;
स्वर्गिचीं फुळे फुललेलीं - भूसुमनावरतीं गळलीं.
कवि भावसुमांचा झेला - भुलला हो पाहुनि त्याला;
स्वमनींच वदे गुंगोनी - आले हे बिंदु कुठोनी ?

सृष्टीच्या हृदयांतून प्रीतीची सरिता वाहे,
तींतून उसळले वरतीं - दंवबिंदु मनोरम का हे ?
कीं द्रवुनि तारका चित्तीं - स्वर्गींच्या विमल ज्योती
उतरून पातल्या खालीं - ही माळ तयांची झाली ?
सौंदर्यझरी ज्योस्ना ती - अवकाशीं झरली रातीं.
सौंदर्यसुधाबिंदू ते - कीं दिसती हे मज पुढते ?
स्वर्गाची तेजोवृत्ति - अवनीची मुग्धा प्रीति,
संमीलित होऊनि कीं ही - दंवबिंदुमालिका होई ?

हें प्रेम दिव्य सुंदरता - मज दिसतें त्यांतच आतां
एकेका बिंदूंतून किति होति स्वर्ग निर्माण
गाण्य़ांचें सार अहा रे प्रगट होत तयांतच
गंधर्व काय का कोणी - आले हे स्वर्गांतोनी ?

अपूर्ण

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP