मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
माझें गाणें, एकच माझें नि...

माझें गाणें - माझें गाणें, एकच माझें नि...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


माझें गाणें, एकच माझें नित्याचें गाणें;
अक्षय गाणें, अभंग गाणें, गाणें हें गाणें, १
सर्व जगाचें मंगल, मंगल हें माझें गाणें;
या विश्वाची एकतानता हें माझें गाणें; २
आशेच्या वीणेचा चढवुनि सूर भौतिकांत
हें गाणें, हें प्रियकर माझें गाणें मी गात. ३
ही प्रेमाची, ही शांतीची, विश्वमंगलाची,
सौभाग्याची तार तशी ही, ही जगदैक्याची. ४
निरध्वनी हें, मूकगान हें यास म्हणो कोणी,
नभांत हें सांठवलें यानें दुमदुमली अवनी. ५
सर्व धर्म हे, भेद - पंथही सर्व एक झाले;
माझें, माझें विश्व, तार ही प्रेमाची बोले. ६
शांत (हि) मत्सर, प्रशांत कपटस्वार्याची ज्वाला,
चिच्छांतीनें अहा भरीलें सगळ्या विश्वाला. ७
ही मोक्षाची, स्वातंत्र्याची, उन्नतिची माला,
सौभाग्याची तार लागलों मीं छेडायाला. ८
हें नंदनवन ही स्वर्भूमी एक पहा झालीं !
मंगल मंगल मदगानाची गति ही शेवटली. ९

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP