मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
द्या आशेचा एकचि तंतू मजला...

निराशेचें गीत - द्या आशेचा एकचि तंतू मजला...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


द्या आशेचा एकचि तंतू मजला, ना तरि हा समजा मेला.
रवि तीक्ष्णकरें ये मज जाळायाला - हा चंद्र विषाकर झाला.
ही भूमि गमे थरथरली दुं:खांहीं - सागरही क्षुब्ध अगाई !
कोसळले पर्वत माथां
प्रलयाग्नी भडके आतां
तम भेसुर वेष्टी पंथा,
करुं काय कुठें जाऊं ? बाहुं कुणाला ? तारील कोण दीनाला ? १

हें दु;ख नव्हे, प्रळयींची चपला ही ! आली हो ! पडते भालीं.
ही आरडते. धांवुनि येते खालीं ग्रासाया मज जलदाली;
नभ कडकडतें, भूमि चालली खालीं - हीं भूतें धांवत आलीं.
काळाच्या भेसुर दाढा
करुं टपल्या हाय ! चुराडा;
काढा हो, यांतुनि काढा.
या दीनाच्या उत्तर द्या हांकेला; उठवा हो ! मेलेल्याला ! २

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP