मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी| माझा लहानसा बाग बालकवी अप्रकाशित कविता परिचय आनंदी - आनंद गडे इकडे, ति... पूर्व समुद्रीं छटा पसरली ... गिरिशिखरें, वनमालाही दरीद... मधुयामिनि नील - लता हो गग... अस्तगिरीच्या अभिनव कुंजीं... हिरवे हिरवेगार गालिचे - ह... सृष्टि निमाली स्वर्गहि नु... कुणि नाहीं ग, कुणि नाहीं ... दिनरजनींच्या हृदयावरलें प... दिनरजनीच्या हृदयाबरलें प्... श्रावणमासीं हर्ष मानसीं ह... ‘हें फूल या उडत्या स्वर्ग... सांज खुले सोन्याहुनि पिवळ... विमळ चंद्रिका क्षितिजावरत... माझा लहानसा बाग मनोवेधका सृष्टिसतीच्या अग... केव्हां मारुनि उंच भरारी ... सुकलेलीं फुलें पांखरा, गाइलें तुला कधींह... सुमनांच्या गर्भामाजीं । र... दीपशिखे, फडफडतेसी । कां म... निंब जांब जांभळ शेंदरी । ... श्रमलें दमलें वणवण फिरूनी... सौंदर्यॆ शब्दातीत - स्वर्... अनंत तारा नक्षत्रें हीं, ... सखया भ्रमरा सदैव तूं कमला... प्रभातकालीं काव्यतारका सो... स्वर्गाच्या तेजोगर्भी । ब... स्वर्गाच्या तेजोगर्भीं । ... गा, गा, गा विहगा गीतें, ट... देऊळींचा देव मेला । विश्व... आद्य ऋषींनीं जी केली । ते... बोलवितात । विक्राळ यमाचे ... अंत:शक्ती प्रगट जाहली, द्... कसें हाकारूं । शीडाविण दु... भरलें घर ओकें ओकें । मज न... सुखशयनीं मी निजलें होतें ... वेडा झाला, म्हणा हवें तर ... तुला बघावें गुंगावें । गु... वस्तुवस्तुमधिं काव्य विलस... प्रिय कविते अमरसुते तेजाच... माझें गाणें, एकच माझें नि... सख्या वाचका गीत कवीचें ऐक... ब्रम्हांडावरि नित्य नूतन ... वेळी डोलत, वृक्ष हस्त पसर... मेधाचें करिं भूर्जपत्र धर... गाणें हें रचिलें असे जुळव... व्योमीं पाहुनि अरुणातें ।... दोष असती जगतांत किती याचे... आहे बीज म्हणोनि आज तुजला ... ऊठ मुला वसंत आला । बाळा तुज रंजवि... बोल बाई बोल ग । तुझ्या बो... आई आई । चांदोबा मजला देई.... १ रागोबा आला, आला, गडे आम... चिव् चिव् चिव् चिव् ग... काव्यरसाच्या गुंगींत कधि... घोडा घोडा खेळु चला रे । म... पाहत लाहूं - गोदिला ग माध... अंधारामधुनी प्रकाशकिरणें ... पाळणा किनरीवाला दारांत भिकारी आ... परस्पराकंठीं हात घालुनिया... दुर्ग भयंकर जीर्ण पसरला प... दे दे सोडुनि ही लाज गडे, ... ‘गर्द सभोंतीं रान साजणी त... जरि धूप जळत अनलांत । वार्... विष्णुमय जग वैष्णवांचा धर... थबथबली, ओथंबुनि खालीं आली... निजला होता क्षीरसागरीं पर... जळ काळें काळें हंसें भयान... कोठुनि येते मला कळेना उदा... सर्व जगानें मला टाकिलें म... रात्र संपली, दिवसहि गेले,... भिंत खचली, कलथून खांब गेल... त्या उजाड माळावरती बुरुजा... हा अंत:कलहाग्नि घोर पडला,... दुर्धर करुणा तीव्र वेदना ... जगाचे बंध कोणाला - जगाला ... नाकीं डोळीं चित्र बाहुली ... या शुभ्र विरल अभ्रांचें ।... शूर वीर सरदार मराठी मानकर... उग्र कडेच्या कडे तोडुनी व... ‘या घुमत्या,’ रात्रीचा वा... अरिसैन्याचा अफाट सागर, त्... हे सौंदर्यध्वंसी काला । भ... प्रेमर्तूच्या मरुदगणांची ... हृदयाची गुंतागुंत कशी उकल... फिकट निळीनें रंगविलेला का... होतें एक असें जुनाट थडगें... ऐल तटावर पैल तटावर हिरवाळ... ये, ये, ये आई, ये बाई, रज... शून्य मनाच्या घुमटांत कसल... मना दैन्य दौर्बल्य हें पा... अव्यक्तांतिल दूरदूरच्या श... नमो श्रीराष्ट्रगायित्री ।... हमालांचें जरि राष्ट्र असे... नीति व्यर्थ कल्पना धर्माध... मृत्यू येइल जेधवां पसरुनि... ये, ये, ये आई, ये बाई, &n... - गाण्याची चढली कमान, नयनीं... भारद्वाजा; विहगा माझ्या, ... ही अश्रूंची अखंड माला । म... हेहचिंतनीं जीव जाळुनि हा ... शब्दज्ञान असें कधींच न चि... हे योगीशा, मोहमूढ मी नर द... पाहुनी सखी सृष्टीला प्रेम... झोंप येते निद्रिस्त विश्व... चंद्रकला जलदामधुनी - धांव... वत्सलतेनें चिमण्या बाळा त... पांव्याच्या गोड सुरांत । ... नाना उत्सव मन्मना रिझविती... कौमारप्राप्ती तुज होत बाल... प्रवासी एक सदा मज हें गाणें, गुंग... ऊन पाऊस ऊन बाई ऊन पाऊस ऊन... हीं कालाचीं दोन फुले दों ... जीवित संशय जिकडे तिकडे जी... कां मग खंती - जग सगळें मा... मन्मना जगाचा पंथ तुझा नच ... हा शोक उगाच कशाला, क्षयरो... द्या आशेचा एकचि तंतू मजला... आशा सरली, प्रीति निमाली, ... कुरण वायुशीं मंद डोलतें ह... आली भाऊबिज म्हणुनिया हर्ष... बाहय जगांतुनि दिव्य रसाचा... काय करूं विठठला - कथी मज ... रात्र काळी, आकाश कृष्णवर्... १ मत्काव्यदेवते येईं तळम... समय रात्रीचा कोण हा भयाण ... मुरडितसा नाकें आज पाहोनी ... शीतल हें जग झालें - उष्ण ... मी रमल्यें बाई प्रेमदेवते... तूं तर मित्र जगाचा - कां ... प्रणयमंजुषा उषा उदेली. दि... निंब, जांब, जांभूळ, शेंदर... माझा लहानसा बाग बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो. Tags : balkavikavitakavyapoemकविताकाव्यबालकवीमराठी माझा लहानसा बाग Translation - भाषांतर श्लोकहें पांडुरंग नभ नील असोनि झालें,अभ्रें तदीय शरिराप्रति वेष्टियेलें,वाटे मना बहुत वृष्टि निशींत झाली,ऐशा सुशांत अरुणोदयिं एक कालीं १सकुतुक बघण्यातेम बाल उद्यान जाई;श्रमुनि बनविलें जें पार्श्वभागास पाही.सुकुसुमधर तेथें पाहुनी सल्लतांला नयनसुखद झाला बाग त्या बालकाला. २प्रियकरजलपातें मोद वेलींस झाला,म्हणुनि जपुनि पर्णीं ठेविती त्या पयाला;सहजच नगप्राप्ती त्यांस संतोष दे तीबहुत रमवि बाळा तोयमुक्तावली ती; ३निबीडतर पल्लवी टवटवी नवी लावरी चढे अमृत वर्षले म्हणुनि मेघ वृक्षांवरी; बहार नव पातला कितिक सल्लतांना तयेंनवी रुचिर कांति त्या चिमुक्रल्याहि बागेस ये. ४येथें दुरून तंव एक मधूप आला,जो मानसीं पिउनियां सुरभीस धाला.आनंदवृत्तिस निसर्गचि लाट आलीबागेंत या चिमुकुल्या करि रम्य केली ५राहे न निश्चल कुठें क्षण एकही तो;विश्रांतिसौख्य नच अन्य (हि) भोग घेतो,माधुर्यसौरभ सदा पिउनी रहातो,काव्यांतरीं कवि जसा सुमनीं रमे तो. ६पुष्पावरी बसुनिया क्षण एक संथराहे अधांतरिं मुखें रव मंजु गात;शुंडा मृदू मग मधूप्रति आकळायापुप्पीं धरी वरि मधूस क्षणैक पेया, ७बघुनि दंग मधूप फुलांवरीपवन वाटत मत्सर हा धरी;लववितो म्हणुनी स्वबलें लताजरि नसे लव लाभहि कोणता. ८स्वभाविकचि चंचला गति यदीय लक्ष्मीपरीसुखांत असतां अहा ! स्वमनभंग झाला वरी,गमे भ्रमर जाहला खचित त्यामुळें बावळानसे स्वमनभंगसे खचित दु:ख या भूतला ९सुटे सुमन, आळवी भ्रमर काय गानें तयावियोगधर शोधितो उपवनीं तदीय प्रिया,दिसे न नयना कुठे म्हणुनि धीर त्याचा सुटे;फुटे स्वमनिं कामवृक्ष न तयेंच कार्यीं नटे १०सुपुष्प नव लाधलें पुनरपी जसें भेटलेंस्वपूर्वविधिच्या बळें हरित वित्त वाटे भलें.अपार सुख मानवा गमत कीं तयानें जसेंदुजें कुसुम भेटतां भ्रमर मानसीं होतसे. ११क्षणभरी मग गुंगत त्यावरीदिसत मोद किती स्वमनीं धरी;सुखविण्यापप्रति त्याप्रति गायनें करित उच्चरचें मग बोलणें १२बागेंत ज्याची सुमती रमे तीकर्णीं मुलाचे रव मंजु येती;होता जरी बंभर मात्र हो तोबालास सदगानसमान होतो. १३दृष्टी तयाची मग अन्य भाती;सोडोनि झाली भमरा पहाती;तेजस्विनी कृष्णपणा धरी ती,कांती मुला वाटत तोषदा ती. १४मधुग्रहण तो करी बघुनि बाल ती तत्कृतीधरोनि विपरीतता परिहि तापला निश्चितीं,‘अहा अधम गांजिसी धरूनि दुष्टता मानसींफुलांस तरि नीच तूं कूति बरोनि हें दाविसी. १५स्वशुंड सुमनास टोचिसि अहा सुईच्यापरीखरा बहुत दुष्ट तूं कृति कथी तुझी ही खरी.म्हणोनि तुज शासणें खचित योग्य वाटे मनास्वरूप नच योग्यता मिळवि सत्कृतीच्याविना.’ १६वदोनि इतुके करी कुसुमरक्षणा धावणें सुशब्द तंव आयके, ‘नच छळी तया ताडनें,अकार्य करण्यास तूं नच प्रवृत्त हो मुला !नसे भ्रमर दुष्कृती स्वमनिं जाण गा हेतुला,’ १७वदे कवण; पाहण्या करित वक्र द्दष्टी जरा,बघोनि जननीप्रती क्षणिक जाहला लाजरा.सुबोधरस त्याप्रती जननि जाहली अर्पिती;मुलांस्तव तयांतलीं सुवचनेंच सांगेन तीं. १८‘मुला, न म्हण टोचितो भ्रमर तो स्वशुंडा फुला,पितो सुरस तो, गुणग्रहण सांगतो बा तुला;धरोनि बहु मोद तो रस सदा जसा चाखितोतसा पिउनि तुं भुले सुगुण मानसीं वांछितो. १९गुणग्रहणमाधुरी सतत सेवितो त्यां कळे;कळे न इतरांस ती कथुनि गोडवेही बळें.सदा कमल सेवितो भ्रमर त्यावरी गुंगतो;कशास, तरि काय हें स्वमनिं भेक जाणेल तो. २०आर्या सुगुणग्रहणार्थ झटे जरि पडले कष्ट त्यांत सोसावे;नच सोडी कमलांतें भ्रमर जरी बद्धतेसही पावे.’ २१ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP