मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
पांव्याच्या गोड सुरांत । ...

अतृप्ति - पांव्याच्या गोड सुरांत । ...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


पांव्याच्या गोड सुरांत । बुडबून जगाला देऊं;
खानंद सुखद राज्यांत । संत्रस्त जिवाला नेऊं.
तारुण्य भ्रष्ट हो जेथें । प्रेमास अंधता येते,
सौख्यातिरेकही पाहीं । दु:खाला कारण होई.
संध्येच्या सुंदर छाया । निमिषांतच काजळाताती;
करि घोर भयद अंधार । नैराश्यविषची भरती.
या अपूर्ण जगतासंगें । मन तृप्ति कधींहि न पावे
मग मंजु गायनासंगें । बा, कां न उडुनि तें जावें ?

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP