मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
सख्या वाचका गीत कवीचें ऐक...

कवीचें अंतरंग - सख्या वाचका गीत कवीचें ऐक...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


सख्या वाचका गीत कवीचें ऐकुनिया निज कानीं
न वदे, कळलें महाकवीचें अंत:करण निदानीं.
ह्नन्मंजूषीं भाव गुप्त जे भरले, जनसम्मदीं
कथील का कधिं उच्चरवानें कवि हृदयाचा दर्दी ?
जा, जाउनिया अब्धिकिनारींएक सुक्तिका घेईं,
रंग मनोहर दीप्तिही अनुपम याविण अन्य न कांहीं.
अगाधगहनें सागरलहरी झांकुनि ठेवति काहीं;
गूढतळींचीं त्याविषयीं ती शब्दहि बोलत नाहीं
[त्या शुक्तीपरि हींहि गायनें विचारलहरीवरतीं
हृदंतरांतुन महाकवीच्या उसळुनि वरतीं येती.
घे हातीं, कर कौतुक यांचें परि चित्तीं (नच) आणी
या गीतांनीं कळलें कविचें अंत:करण निदानीं]

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP