मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
सुमनांच्या गर्भामाजीं । र...

अप्सरांचें गाणें - सुमनांच्या गर्भामाजीं । र...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


सुमनांच्या गर्भामाजीं । रसगंगा भरली ताजी;
आजूबाजूला वसलीं । शुभ्र अद्रिशिखरें सगळीं;
सांभाळुनि तरा बाई । वेळ गडे स्नानाची ही ॥१॥

गर्द दाट मधली झाडी । मंदमंद हलवा थोडी;
पराग, समनें हसलेलीं । नीट बघा पायाखालीं;
पुष्पांचा बसला थाट । हळूं ह्ळूं काढा वाट ॥२॥

गोड सुवासाचे मेघ । आळसले जागोजाग;
हिमकणिका त्यांच्या पडती । गोड गोड अंगावरतीं;
पुनीत ही गंगामाई । स्नान करा झटपट बाई ॥३॥

संध्येच्या कोमल किरणीं । मटुनि थटुनि वस्त्राभरणीं
गुंजतसे अक्षयगीतें । बैसुनि त्या भृंगावरते;
मग आपुल्या भरभर जाऊं । देवांचें दर्शन घेऊं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP