TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
तुजवीण सखे, मज कोणि नसे, ...

गज्जलाञ्जलि - तुजवीण सखे, मज कोणि नसे, ...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


वासन्त ऊषा
तुजवीण सखे, मज कोणि नसे,
प्रतिमाहि तुझीच ह्रदीं विलसे,

मी करीं पूजा तियेची भावपुष्पें वाहुनी,
आणि पुष्पें कोणतीं पूजेस अञ्ची याहुनी ?

परि ती न कधीच बघे हसुनी
भिजवी न कधी मन शान्तिरसें.

सारखा ऊसा अबोला भीववी भक्तास या,
केवि वारावें कळेना व्यापणार्‍या संशया;

कर तूच दया, हस, वार भया.
बघ खोल हिमीं जिव केवि फसे,

बोल तूझा येऊं दे वासन्त वायूसारखा,
आणि आशेची  ऊषा ती फाकुं दे, अन्धार कां ?

प्रणयास वसन्तच रम्य सखा,
मग रङगुनि विश्व कसें विकसे !

मे १९३३

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:50:16.4070000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

सप्ताळू

  • न. एक विशिष्ट फळ . ( इं . ) पीच . सप्ताळें ऊंस पुंडे कविठ कमरखें वाळकें सूक्ष्म बोरें . । - सारुह ३ . ४९ . [ फा . शफ्तालू = एक फळ ] 
RANDOM WORD

Did you know?

मानवाच्या मनांत शुभ अशुभ विचार चालू असतांत, अशा क्रियेला काय म्हणतात?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.