मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
केला तिने सहजेक्षणें हत्प...

गज्जलाञ्जलि - केला तिने सहजेक्षणें हत्प...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


केला तिने सहजेक्षणें हत्प्रान्त माझा खालसा
अनुकूल राज्य करील ती, आशा नवी ये मानसा.

स्वातन्त्र्य गेलें जाऊं द्या ! बेबन्दशाऊ कासया ?
त्या मत्त चारु द्दष्टिचा हृदयावरी पडला ठसा.
अपुल्याच नादीं रङगते, बघते क्वचित, माझ्याकडे,
डोळे भरूनि दुरूनि मी बघतों प्रियेस मदालसा.
न कुठे जरी ती लक्ष्य दे, न द्रोह हो राज्यामधे.
हृद्वैभवें नटली दिसे चोहीकडे मजला रसा.
करितां तिची मी पायकी वाटे मला मी राय की !
कोणापुढेहि तिच्याविना न धरीन मी अपुला पसा.
धरुनी तिचा ध्वज ऊन्च दिग्विजयास हा मी चाललों,
महिमा महीवरती तिचा पसरीन ही द्दढ लालसा.
सारें पुढे शुभमङगलप्रद तें भविष्य दिसे मला;
घालील कण्ठीं माझिया मग वैजयन्ती राजसा.
व्यवहरकोविद लोक हो, श्रद्धा तुम्हांस न ही पटे;
अपुले हिशेब करा सुखें गणुनी खुळा मज जा हासा !

२१ ऑगस्ट १९३१

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP