मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
हें काय असें होऊ ? साशडक ...

गज्जलाञ्जलि - हें काय असें होऊ ? साशडक ...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


हें काय असें होऊ ? साशडक धपापे ऊर,
डोळ्यांत जमे पाणी, डोक्यांत कुठे काहूर,

ऐकान्त गमे ठेवी छातीवरती ओझें,
अन्धार फिरे भोती, गेला दुनियेचा नूर,

स्वारस्य न तें राही, हो लुप्त जिगीषा ही,
नैश्चित्य नुरे काही, गेलाच गमे मग्दूर.

मी गीत कसें गाऊं ? स्फूर्तीस कुठे पाहूं ?
भेसूर जगामाजी कोल्हाळ कुठे बेसूर.

पाणी न कुठे साचे हा, जीव कसा वाचे ?
वाळूनि मदाशांचे जातात पहा अङकूर.

हृत्सङग तिचा किंवा मृत्यूच मिळो जीवा -
थाम्बेल कधी काळीं त्यावीण न ही हुर्हूर.

३ जून १९२२

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP