TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
विद्युल्लतेप्रमाणे हासूनि...

गज्जलाञ्जलि - विद्युल्लतेप्रमाणे हासूनि...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


अक्षय्य लागणी
विद्युल्लतेप्रमाणे हासूनि साजणी,
अन्धार गर्दवूनी जाशी पुन्हा झणी.

रस्ता पुढे दिसेना अन्दाज होऊना,
हा जीव पाठलागीं मी लाविला पणीं.

मागे न येऊनीही जाणार मी कुठे ?
खेचूनि ने, न सोडी तूझी भुलावणी.

ठेचाळातां कुठूनी  जाऊंच मी पुढे.
रात्रीहि पापणीला लागे न पापणी.

घेऊं कुठे विसावा ? रस्ता अनन्त हा,
थाम्बूं तरी कसा मी ? अक्षय्य लागणी !

अशी लपालपी तू खेळूं नको गडे.
राहीं ध्रुवापरी तू - ही ऐक मागणी.

१० मे १९२१

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:50:15.2500000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

वीप

  • स्त्री. ( महानु . ) लाज . कां चालितां गति विलासीं । इआं वीप लाविली राजहंसी । - शिशु ८०४ . 
RANDOM WORD

Did you know?

मंदिराला कळस बांधतात, पण घरातील देव्हार्‍याला कळस का नसतो?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site