मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
बुझावूं मी किती तूते ? कर...

गज्जलाञ्जलि - बुझावूं मी किती तूते ? कर...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


बुझावूं मी किती तूते ? करावी मी किती हांजी ?
कितीदा मन्त्र ऐच्चारूं ? - तुझा मी तूहि हो माझी.
ऊभे मल्लोचनीं आसू, कपोलीं अन तुझ्या हासूं -
नको गे जिन्दगी नासूं ! असे का ऐश्क ही बाजी ?
ऊन्हाळे. पावसाळे अन हिवाळे लोटले भगवन !
अजूनी मूळ भक्तीची कळी ही देख तू ताजी.
फुलांचे कुञ्ज हे नामी, रमूं गे ये सुखारामीं !
वसन्तीं जीविताच्या मी नि तूही सोड नाराजी.
असेना हीन मी प्राणी ?! न पर्वा. तू महाराणी !
धिटाऊ शुद्ध ऐश्काची मला दे कौल ‘हो गाजी !’
बसूनी घ्येयचक्रीं मी निघालों स्वर्ग जिडकाया;
धुळीला वातचक्रींच्या न कोणी नीच बोला जी.
ऐमेदी धावत्या माझ्या तुझ्या प्रीतीविना पङगू;
न होशी तूच मस्तानी, कसा गे होऊं मी बाजी ?
निमित्तें साङगशी कां हीं ? हृदींचा भाव हा पाहीं,
हृदींच्या गुप्त रत्नाची करावी काय हर्राजी ?
करीं या लोम्बते माला, नसे तोटा मुहूर्ताल,
पटूं दे आज दोघांला, तुझा मी आणि तू माझी !

३० मार्च १९२१

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP