TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
ऊठ साकी ! दे भरोनी वारुणी...

गज्जलाञ्जलि - ऊठ साकी ! दे भरोनी वारुणी...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


विस्मृतीची समाधि
ऊठ साकी ! दे भरोनी वारुणीचा ऐक पेला;
रात्र ती गेली सरोनी मित्र ये व्योमीं ऊदेला.

लाज, भीती मोकलोनी बैसलों ओसाड कोनीं,
ओरडो काहीहि कोणी, लौकिकाला जीव मेला.

‘आज’ ही घे रोख हातीं. पाहिली कोणी ‘ऊद्या’ ती ?
होऊनी जाऊल माती, ये न सन्धी दोन वेळा.

कां गडया पर्वा पतीची. काळचक्राच्या गतीची ?
मौज माध्वीसङगतीची लूट, हो खय्याम - चेला !

वाढुं दे पाश्वात्य सत्ता, खाऊं दे पौरस्त्य लत्ता !
द्दष्टि तैशी सृष्टि ! देऊ द्दष्टिला गुत्ता तजेला.

नाचरे अद्यापि वारे, शैलही गम्भीर सारे,
अम्बरीं तेजाळ तारे, सन्थ पाणी आपगेला.

होऊनी वासन्त वर्षा पूर ये रानांत हर्षा;
देख या पुष्पप्रकार्षा ! खेद तो कोठेच गेला !

बुल्बुला, टाकूनि आधी तर्कवादाची ऊपाधी
प्रेमगीतें गोड साधीं गा, तयांचा मी भुकेला.

गा दिवाणांतील गाणीं, वाहुं दे वाणी दिवाणी;
झोकतों मी मद्यपेला, हुङ्ग तूही पुष्पझेला !

ऊठ साकी वेळ साधी, आणखी दे ऐक पेला
विस्मृतीची ही समाधी दाद ना दे काळ - खेळा.

२५ मे १९२१

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:50:11.6100000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

उद्येल

  • ( कुण . ) उदेल पहा . 
RANDOM WORD

Did you know?

shreeyantra siddha kase karave ?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site