मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
गज्जलाञ्जलि

गज्जलाञ्जलि

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


आता न कां रुचे तुज ही प्रीति भाबडी ?
चित्तांतली अजूनिहि जाऊ न कां अढी ?

माणूस केवि राहिल गे नित्य शाहणें ?
कां राखिशी कुरीं गत कालांतलीं मढीं ?

दे त्यांस अग्नि या अनुतापांत माझिया,
तप्ताश्रु - सङगमीं बघ हा पूर चौथडी !

गेले किती वसन्त  नि हेमन्त लोटुनी,
अद्यापि होय आठव तूझा घडी घडी.

रागांत अन्त का मम तू पाहणार गे ?
देवि क्षमस्व ! धावुनि ये, सोड फू - गडी !

होतोंच नातुला प्रिय अत्यन्त ऐकदा ?
घ्यानांत आण तो क्षण, दे भेट तातडी.

झाला असे पुरा शनिफेरा, अता तरी
ती होऊं दे पुन्हा युति, कां ठेविशी अढी ?

२९ नोव्हेम्बर १९२१

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP