मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
असो देव किंवा नसो, कां बर...

गज्जलाञ्जलि - असो देव किंवा नसो, कां बर...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


असो देव किंवा नसो, कां बरें
तयावाचुनी जीव हा घाबरे ?

जसें साण्डलें मूल चोहीकडे
बघे होऊनी कावरें बावरें.

तसें कां मला होय ? येथे पहा
न थोडे मला सोयर - धायरे.

मला लागणी गोड लागूनि कां
स्फुरे प्रार्थना, “ऊश्वरा, धाव रे !”

फुलें गोजिरीं दों दिसांची - कसा
सुखी गन्ध त्यांच्या स्मितांचा भरे !

हवा कापिती पडख मारीत तीं
कशी गोड निष्काळजी पाखरें !

नभांतूनि, तारे जिथे कोन्दले,
कसा लोचनानन्द हा पाझरे !

कसे कृष्णपाषाणभेगांतुनी
खळाळूनि येती रुप्याचे झरे !

फुलें, पक्षि, तारे, झरे - हे प्रभो,
तुझें वेड यांना जडे का खरें ?

नराला तुझ्यावीण नाही गती,
असें कोणतें पाप केलें नरें ?

२५ में १९२१

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP