TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
न झाली भावगीताची अजुनी पू...

गज्जलाञ्जलि - न झाली भावगीताची अजुनी पू...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


दिवङगत भगिनीस
न झाली भावगीताची अजुनी पूर्ण अस्ताऊ,
मधे तों सूर का थाम्बे ? कुठे ती गायिका जाऊ ?
तकाके पाचुची झाडी, दिसे ही तृप्त आषाढीं;
कशाला गा विसंवादी ? तिला ही भीति का खाऊ ?

मिळेना साथही साधी, न रङगे राग आल्हादीं,
कलेची सेविका नादी त्यजूनी जाय ही राऊ.
जिवींची साद घालावी. कुणीही साथ ना द्यावी.
न लाभे शान्ति योगाची, रसज्ञांची न टन्चाऊ !

मरे तों प्रीतिची सेवा करावी आणखी - देवा !
निराशा मात्र लाधे वा ! जगाचा कायदा न्यायी !
जगाच्या विस्तृतारामीं विराजे चारुता नामी,
परी दग्धाश जीवाला गमे ही पेटली खाऊ.

मिळेना नीच या ठायां जुळ्या जीवांस भेटाया,
म्हणुनी स्वर्ग धुण्डाया ऊडी का मारिली ताऊ ?
बरें, गा नन्दनोद्यानीं तुझ्या घ्येयासवें गाणीं,
भवींची तेथ गार्‍हाणीं कशाला ?  स्तब्ध मी भाऊ !

जरी मी या वनीं लक्षीं न थोडे बोलके पक्षी,
तुझा तो सूर संरक्षीं मनीं मी - तोच तो गाऊं ?

१९ जून १९१९

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:50:09.9070000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

प्राण डोळ्यांत उतरणें

  • प्राण जाण्याची वेळ येणें 
  • मरणोन्मुख होणें. ‘तरुणाचे प्राण शेवटीं डोळ्यांत उतरण्याचा प्रसंग येतो.’ -भावबंधन २२. 
RANDOM WORD

Did you know?

देवाचे तीर्थ ग्रहण करण्यासंबंधी शास्त्रीय संकेत कोणते?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site