मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
निज मैत्रिणीला घेऊनी तरुण...

गज्जलाञ्जलि - निज मैत्रिणीला घेऊनी तरुण...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


निज मैत्रिणीला घेऊनी तरुणी फिराया ये कुणी,
सोल्लास हासत टेकडी चढती श्रमास न लेखुनी;
टोकावरी बसती कशा या ऐकमेका टेकुनी -
मज भूत भेसुर आठवे हें द्दश्य सुन्दर देखुनी.

तेथेच आम्ही बैसलों निज हृदगतें बोलावया
तेथेच काढुनि दाविल्या सोत्कण्ठ मी कविता - वहया,
तेथेच गाऊनि दाविली कौमारगीतें मी तया
तेथेच ती दिसली ऊषा सन्ध्याक्षणीं असल्याच या.

दोघेहि आशाचारुतेमधि पार गेलों रङगुनी,
गमलें वरीन ध्येय मी प्रत्यक्ष तें ऐल्लडघुनी;
जगतो कसा तरि मी खुळा आशेवरी मन भङगुनी,

वदनीं, हृदींची यांचिया आशा हसे ऊच्छृडखल,
‘होवो’ मनांतच मी म्हणें, ‘यांचें तरी शुभमङगल !’

२५ मार्च १९२९

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP