मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
ये राज्य कोण, कोणा फकीरी,...

गज्जलाञ्जलि - ये राज्य कोण, कोणा फकीरी,...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


ये राज्य कोण, कोणा फकीरी,
ये दास्य कोणा, कोणा अमीरी,
कोणी शिकन्दर, कोणी कलन्दर -
अल्मुल्कु लिल्ल्हा ! अल्लाहु अक्वर !

हा दैववादी दैवा निखन्दी,
तो कर्म साधी, देवास वन्दी,
निर्द्वन्द्व कोणी योगी दिगम्बर
बोले अनल्हक्क !- अल्लाहु अक्बर !

हा तर्कवादी शङकेंत रङगे.
श्रद्धाळु तोही पृष्ठीं तरङागे,
नाना मतांचा गिल्ला भयङकर -
अल्लाहु आलम ! अल्लाहु अक्बर !

बोला हवें तें - ब्रम्हास्मि ! अल्लख !
सायुज्य जें दे तें ज्ञान सम्यक.
भू, स्वर्ग किंवा पाताळ नश्वर -
स्थायी प्रभू तो - अल्लाहु अक्बर !

भङगूनि मूर्ती ‘काबा’ कशाला ?
सर्वत्र अल्ला, सीमा कशाला ?
स्त्रष्टा जगाचा जो ऐक अक्षर,
वन्दे तमेकम ! अल्लाहु अक्बर !

धर्मांत साची ही राष्ट्रभक्ती,
दात्री यशाची ही सङघशक्ती,
सर्वत्र होवो राष्ट्रीय सङकर !
ध्यायेत स्वदेशम ! अल्लाहु अक्बर !

गाजो जगीं या जी लोकशाही
तीचेच आम्ही याजी शिपाऊ,
जिज्ञासु भिक्षू, आ - जन्म चाकर
स्वानन्दसम्रात - अल्लाहु अक्बर !

येवो कुलीच्या नेत्रीं प्रभा ती,
कर्दाहि चालो काढूनि छाती
लभो खपे जो त्यालाच भाकर !
वन्दे स्वकष्टम ! अल्लाहु अक्बर !

दाता मिळो वा कद्रू मिळो वा,
टक्का मिळो वा धक्का मिळो वा,
ही तत्त्वनिष्ठा आम्हांस  बक्तर
अल्हाम्दु लिल्लाह ! अल्लाहु अक्बर !

११ एप्रिल १९२३

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP