मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
तुझाच दास न लागे सखे, तुझ...

गज्जलाञ्जलि - तुझाच दास न लागे सखे, तुझ...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


तुझाच दास न लागे सखे, तुझ्या पाठी ?
छळी तुला नि म्हणे, सर्व हें तुझ्यासाठी ?

खरेंच, अन वघशी तूहि त्यास ताळाया
अचूक तों पडती तूमच्या पुन्हा गाठी ?

म्हणे, ‘नको मज माझें, तुझें हवें,’ तूतें
कळे न भाषण भाषा असूनि महराटी ?

विनन्ति, कोप, ऊपेक्षा, तिरस्कृती वाया ?
हसेच धीट बघूनी कपाळची आठी ?

कितीहि वाग्शर मारा, कितीहि धिक्कारा,
तथापि लोचट मोठा कशास ना गाठी ?

कथूं ऊपाय तुला मी बरोबरीची का ?
पहा, खुल्या करुं तूझ्या मनांतल्या गाठी ?

अगे बिलन्दर पोरी; करुनि ही चोरी
पुन्हा अशी करिशी काय तूच हाकाटी ?

तुवां अगोदर हृद्रत्न चोरिलें त्याचें.
न जें मिळे धन वेचूनिही कुणा हाटीं.

न होय माफ गुन्हा हा, खुशाल तर्काच्या
आडया पठापट तू मार येथ कोल्हाटी.

अपाय ऐकच, हृद्रत्न दे तुझें त्याला,
जरी असेल ठिकाणीं, करी फिटम्फाटी.

पुरे पुरे रुसवा ! सोङग ढोङग मी जणें,
दुरीच बैस, ऊन्हाळयांत कां तुझी दाटी ?

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP