मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
सखे तू पूस, चण्डोला, त्यज...

गज्जलाञ्जलि - सखे तू पूस, चण्डोला, त्यज...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


सखे तू पूस, चण्डोला, त्यजूनी भूस कां जाशी ?
ऊडूनी ऊन्च आकाशीं ऊषेंचें गीत कां गाशी ?
गुलाबा दील खोलूनी कशाला स्वैर वाताला
लुटाया गन्ध तू देशी ? तुझ्या ये काय हाताला ?

समुद्रा, हा क्षयी ऊन्दू, रवीची ऊग्र मैत्री ती,
ऊडया कां मारिशी वेडया ? निराशा ओढवी प्रीती.

तुवांही चञ्चले देवी, घनाला श्याम पर्णावें !
न मानी जातिधर्माला कसें तें प्रेम वर्णावें ?
जबानी घेऊनी यांची करी तू चौकशी माझी;
हवा तो न्यास दे आर्ये, दयाही ठेव त्यामाजी,

२५ एप्रिल १९१९

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP