TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
प्राशितों सौन्दर्य तूझें ...

गज्जलाञ्जलि - प्राशितों सौन्दर्य तूझें ...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


सौन्दर्य - मोहन
प्राशितों सौन्दर्य तूझें मी दुरूनी
प्राशुनी पीयूष कां जातों झुरूनी ?
फाकते ऐन्दुप्रभा चौफेर तूझी
आणि कां माझ्या मनीं ये काहुरूनी ?

आननीं हृद्रम्य सन्ध्याकाल - शान्ती,
नेत्र हे की हासरे तारे दिनान्तीं !

केश - वीची की भुर्‍या या मेघमाला !
की गुलाबांची मिळे देहास कान्ती !

नासिका नामी कळी ही आर्जवाची,
हासतां गालीं खळी रमार्थवाची,

हीं कुडीं कानीं तुझ्या का कृत्तिकांचीं
मौक्तिकें तेजाळ जीं व्योमार्णवाचीं !

हासशी, हास्त्यीं असें गाम्भीर्य कां गे ?
ओढिशी गुम्फूनि चित्तांतील धागे.

राहशी दिव्याङगने, निश्शब्द दूरी,
भोवती तूझ्या भ्रमूं हा जीव लागे.

४ जुलै १९२२

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:50:12.3430000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कलमी

  • वि. १ लेखी ; लिहिलेलें ; लेखनिविष्ट ; याच्या उलट तोंडी किंवा उडत उडत . क्रि० करणें , लिहिणे . जबानी वातमीस व कलमी बातमीस थोडें अंतर पडतच आहे .' - खरे ४ . १४७० . ' मुंबईकरांनी आंग्रे यांस कलमी केलें ' - खरे ७ . ५७१ . २ पगारी . ' या स्वारीस कलमी फौज ठेवावी असा इरादा . ' - होर्क ५ . ३ ( गो .) लिहिणारा . ४ ( व . घाटी ) उंची व तिखट दालचिनी . ५ कलम केलेलें झाड ; सदन झाडांचे फळ , ( आंबा इ० ) ६ ( कु . ल .) देवळी जात . ७ ( हेट .) डोलाच्या मागची काठी इंवा मागचें म्हणजे दुसरें शीड ; ही काठी डोलकाठीपेक्षा एक हात कमी असते . ( कलबी पहा ) ( अर . कल्‌म = बोरु , लेखणी ) 
  • वि. रेघांचें . ' तिवट कलमी हिरवें , दुपटा कलमी हिरवा ' - समारो १ . २०६ . ( अर . कलम ) 
  • ०दालचिनी स्त्री. वरील ४ था अर्थ पहा . ०लता - स्त्री . लवंगी वासाची वेल , 
  • a  Written, authentic. Bearing grafts-a tree, grafted. 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

pl. kartiksnanache ani kakadariche mahatva sangave ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site