मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय १०३

बृहत्संहिता - अध्याय १०३

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


बहुतकरून सूत्राने(सुताने) रहित, प्राचीन (जीर्ण,) प्रकटच्छिद्र अशी रत्ने नव्या गुणांनी (दोर्‍यानी) युक्त केली असता, सोभविण्याविषयी योग्य होतात. तशी बहुतकरून सूत्राने रहित, प्रकाशित आहेत अपशब्द (अशुद्धे) ज्यांचे अशी प्राचीन शास्त्रे नव्या श्रवणीयवस्तु (शब्द) रचनेने योजिली अ० पठन करण्यास योग्य होतात ॥१॥

बहुतकरून ग्रहगोचराचा (ग्रहपाहण्याचा) व्यवहारात उपयोग फार होतो यास्तव त्याची फए अनेकवृत्तांनी सांगतो; हया माझ्या मुखचपलत्वाते (बहुभाषणाते) पंडित सहन करोत (हया आर्येचा मुखचपलाछंद हेही यात सुचविले असेच पुढेही आहे) ॥२॥

मांडव्यऋषीचे भाषण करून, माझे भाषण लोकांस गोड लागणार नाही. अथवा असे नव्हे. जशी जघनचपला (वेश्या) प्रिय होते; तशी पतिव्रता स्वस्त्री पुरुषांस प्रिय होत नाही. (असा स्वभावच आहे यास्तव माझे नीरसही भाषण प्रिय होईल. असा अभिप्राय) ॥३॥

सूर्य जन्मराशीपासून ६।३।१० यास्थानी शुभ होय. चंद्र ३।१०।६।७।१ यास्थानी शुभ. गुरु ७।९।२।५ या स्थानी शुभ. मंगळ व शनि ६।३ यास्थानी शुभ. बुध ६।२।१०।८ या स्थानी शुभ. सूर्यादि सर्व ग्रह ११ वे शुभ होत. शुक्र ७।६।१० या स्थानी असता सिंहासारखा त्रास करतो, यास्तव अशुभ होय. अर्थात इतरस्थानी शुभ होय.  (हे शार्दूलविक्रीडित वृत्त) ॥४॥

सूर्य जन्मराशीस अ० उपद्रव देतो, ऐश्वर्यनाश करतो, उदररोग व मार्गगमन याते देतो. जन्मराशीपासून द्वीतीयस्थानी अ० द्रव्यनाशकारक, सुख देत नाही, वंचना (ठवचणे) व नेत्ररोग याते देतो. तृतीयस्थानी अ० द्रव्यनाशकारक, सुक देत नाही, वंचना (ठवचणे) व नेत्ररोग याते देतो.  तृतीयस्थानी अ० स्थानलाभ, द्रव्यसमूहाने आनंद व अरोगित्व करतो, शत्रूंचा नाश करतो. चतुर्थस्थानी अ० रोग करतो, वारंवार स्त्रीसंभोगास विघ्न उत्पन्न करतो (हे स्रग्धरावृत्त) ॥५॥

सूर्य पंचमस्थानी अ० रोग व शत्रु यांपासून झालेल्या बहुत पीडा होतात. सूर्य षष्ठस्थानी अ० रोगनाश,  शत्रुक्षय, शोकनाश याते करतो. सप्तमस्थानी अ० मार्गगमन, उदररोगाचे भय, दैन्य याते करतो. अष्टमस्थानी असता रोग व भयही होतात. आपली स्त्रीही शोभनमुखी (आनंदयुक्त) होत नाही. हे (सुवदनावृत्त) ॥६॥

सूर्य नवमस्थानी अ० विपत्ति, दैन्य, रोग, चित्तव्यापारांचा नाश, हे होतात. दशमस्थानी अ० उत्तमजय, क्रमाने कार्यांची सिद्धि ही प्राप्त होतात. एकादशस्थानी अ० जय, स्थान, मान, ऐश्वर्य, रोगनाश हे होतात. द्वादशस्थानी अ० सुस्वभावपुरुषांची कर्मे सफल होतात. इतरांची सफल होत नाहीत (सुवृत्तछंद) ॥७॥

चंद्र जन्मराशीस असता भोजन, उत्तमशय्या, वस्त्र ही प्राप्त होतात. जन्मराशीपासून द्वितीयस्थानी अ० मान व द्रव्य यांचा नाश करतो व बहुत विघ्ने होतात. तृतीयस्थानी अ० वस्त्र, स्त्री, द्रव्यसमूह, सौख्य ही प्राप्त होतात. चतुर्थस्थानी अ०, पर्वतावर सर्प असता तेथे जाण्याचा जसा अविश्वास होतो तसा, लोकांचा अविश्वास होतो. (हे शिखरिणीवृत्त) ॥८॥

चंद्र जन्मराशीपासून पंचमस्थानी अ० दैन्य, व्याधि, शोक, मार्गांत विघ्नही  होतात. षष्ठस्थानी अ० द्रव्य, सुख, शत्रु, रोग यांचा नाश होतो. सप्तमस्थानी अ० वाहन, पूजा, शय्या, भोजन, द्रव्य यांचा लाभ होतो. अष्टमस्थानी चंद्र, अल्प जोराने सर्प धरला तर कोणास भय करीत नाही म्ह० सर्वांस भय करतो, तसे भय करतो (हे मंदाक्रांतवृत्त) ॥९॥

चंद्र वनमस्थानी अ० बंधन, उद्वेग, श्रम, उदररोग याते करतो. दशमस्थानी अ० प्रभुत्व व कर्मसिद्धि ही करतो. एकाद्शस्थानी अ० वृद्धि, मित्रप्राप्ति, अर्थालाभ, आनंद याते करतो. द्वादशस्थानी अ० वृषभाने केलेले पादताडन, शृंगाने ताडन इ० दु:ख व व्यय याते करतो (हे वृषभचरितवृत्त) ॥१०॥

मंगळ जन्मराशीस अ० उपद्रव होतो. द्वितीयस्थानी अ० राजापासून पीडा, कलह इ० दोषांनी व पित्त, अग्नि, रोग, चोर यांनी अत्यंत उपद्रव, जरी नाराया व वज्र यांसारखा असेल तथापि होईल. (हे उपेंद्रवज्रवृत्त) ॥११॥

मंगळ तृतीयस्थानी अ० चोर व कुमार (८वर्षांपर्यंत) यांपासून शुभफल करतो. कांति, प्रभुत्व,  धन, कंबलादिवस्त्रे, सुवर्णादि धातूंची उत्पत्तिस्थाने व अन्यस्थाने याते देतो. (हे उपजातिवृत्त) ॥१२॥

मंगळ चतुर्थस्थानी अ० ज्वर, उदररोग, रक्तस्राव ही उत्पन्न होतात व दुष्टपुरुषाच्या संगतीपासून बहुत अकल्याणही होते. (हे प्रसभवृत्त) ॥१३॥

मंगळ पंचमस्थानी अ० शत्रु, रोग, क्रोध, भय, पुत्राने केले शोक हे होतात व जसे वानराच्या मस्तकी ठेवलेले मालती (मोगरी) पुष्प चंचलत्वास्तव स्थिर रहात नाही तसे याचे तेजही चिरकाल स्थिर रहात नाही. म्हणजे तेजहीन पुरुष होतो. (हे मालतीवृत्त) ॥१४॥

मंगळ षष्ठस्थानी अ० शत्रु, भय, कलह यांनी रहित होतो व सुवर्ण, पोवळे, तांबे यांची प्राप्ति होते. असा पुरुष अन्याचे दुर्मुख कधीही पाहणार नाही. (हे अपरवक्त्रवृत्त) ॥१५॥

मंगळ सप्तमस्थानी अ० स्त्रीबरोबर कलह, नेत्ररोग, उदरोग, उदररोग, हे होतात. अष्टमस्थानी अ० स्रवणार्‍या रक्ताने विवर्ण (तेजरहित,) धन व मान यांनीरहित असा होतो. नवमस्थानी अ० पराजय, द्रव्यनाश, पीडा इत्यादिकांनी व निर्बलत्वाने व शरीराच्या धातुक्षयाने विलंबित (विघ्नयुक्त) आहे गति (गमन) जाची असा होतो. (हे विलंबितगतिवृत्त) ॥१६॥

मंगळ दशमस्थानी अ० सम (फार शुभ व अशुभ नाही) होते. एकादशस्थानी अ० नानाप्रकारच्या द्रव्यांची प्राप्ती व जय हे होतात व श्रेष्ठत्वाने सर्व लोकांच्या मस्तकी राहून, भ्रमर बहुत फुललेले आहे अग्र जाचे अशा अरण्याते जसा भोगितो तसा देशाचा उपभोग करतो. (हे पुष्पिताग्रवृत्त) ॥१७॥

मंगळ द्वादशस्थानी असता, अनेक प्रकारच्या खर्चांनी व शेकडो अनर्थांनी (उपद्रवांनी) मनुष्य संताप पावतो व श्रेष्ठवंशाच्या बांधवत्वाने गर्बितही मनुष्य स्त्रीचा कोप, पित्त, नेत्रपीडा यांनीकरून संताप पावतो. (हे इंद्रवंशवृत्त) ॥१८॥

बुध जन्मराशीस अ० दुष्टवाक्य, दुर्जन, शत्रु, भेद (फुटाफुट,) बंधन, कलह यांनीकडून निर्धन होतो. व मार्गामध्ये जात असता, खुशाल आलो, असे सांगितलेलेही कोणी श्रवण करीत नाही (हे स्वागतावृत्त) ॥१९॥

बुध द्वितीयस्थानी अ० पराजय व धनलाभ हे होतात. तृतीयस्थानी अ० मित्रप्राप्ती होते. आपल्या वाईट आचरणांनी व राजा, शत्रु यांच्या भयाने शंकितचित्त होत्साता शीघ्र गमन करतो. (अपराधी यास्तव पळतो) (हे द्रुतपदवृत्त) ॥२०॥

बुध चतुर्थस्थानी अ० स्वजन व कुटुंब यांची वृद्धि व द्रव्यलाभ ही होतात. पंचमस्थानी अ० पुत्र व स्त्री बरोबर कज्जा होतो व सुंदरही स्त्रीचे ग्रहण चित्तोद्वेगास्तव करीत नाही (हे रुचिरावृत्त) ॥२१॥

बुध षष्ठस्थानी अ० सौभाग्य, विजय, उन्नति ही होतात. सप्तमस्थानी अ० विवर्णत्व, कलह, हे अतिशयित होतात. अष्टमस्थानी अ० सुत, जय, वस्त्र, द्रव्य यांचा लाभ होतो व जेणेकरून बुद्धीला आनंद होतो असे निपुणत्व होते (हे प्रहर्षणी यवृत्त) ॥२२॥

बुध नवमस्थानी अ० सव कार्यांस विघ्न करतो. दशमस्थानी अ० शत्रुहंता व धनदाता होतो, स्त्रीयुक्त शय्या, स्त्रीगृह्याते देतो, अनेकरंगांच्या कंबलाचे आस्तरण (शय्या) ही देतो (हे दोधकवृत्त) ॥२३॥

बुध एकादशस्थानी अ० धन, सुख पुत्र, स्त्री, मित्र, अश्वादिवाहन, यांच्या लाभाने संतोष होतो व सुंदर भाषण होते. द्वादशस्थानी अ० शत्रु, पराजय, रोग यांनी पीडित होत्साता स्त्रीभोगाचे सौख्य भोगण्यास समर्थ होत नाही (हे मालिनीवृत्त० ॥२४॥

गुरु जन्मराशीस अ० धन व बुद्धि ही जातात, स्थानच्युत व बहुत कलह युक्त होतो. द्वितीयस्थानी अ० धन प्राप्त होऊन, मुनीही स्त्रीच्या मुखकमली भ्रमरासारखे विलसित (विलास चुंबनादि) करतो. (हे भ्रमरविलसितवृत्त) ॥२५॥

गुरु तृतीयस्थानी अ० स्थानभ्रंभ व कार्यनाश यांनी पीडितचित्त होतो. चतुर्थस्थानी अ० बंधुजनांपासून झालेल्या अनेक क्लेशांनी पीडितचित्त होत्साता गावात किंवा मत्तमयूर अशा वनांतही शांतीते पावत नाही. (हे मत्तमयूरवृत्त) ॥२६॥

गुरु पंचमस्थानी अ० सेवकजन, धर्मादिशुभकर्म, पुत्र, ह्त्ती, अश्व, बैल याते उत्पन्न करतो (लाभ होतो,) सुवर्णयुक्त नगर, गृह, स्त्री, वस्त्र याते करतो. रत्ने व विद्यादिगुण याते करतो म्ह० या सर्वांचा लाभ होतो. (हे मणिगुणनिकरवृत्त) ॥२७॥

गुरु षष्ठस्थानी अ० तिलकाने उज्ज्वल असे सखीचे (स्त्रीचे) मुख व मोर,  कोकिला यांच्या शब्दाने नादयुक्त; हरिणांच्या उडया मारणार्‍या बालकांनी शोभित असे अरण्यही, मनाला सुख देणारे होत नाही. (हे हरिणप्लुतवृत्त) ॥२८॥

गुरु सप्तमस्थानी अ० शय्या, रतिसुख, धन, भोजन, पुष्पे, अश्वादिवाहन, सुंदरपदयुक्त वाणी, बुद्धि याते उत्पन्न करतो म्ह० देतो. (हे ललितपदवृत्त) ॥२९॥

गुरु अष्टमस्थानी अ० बंधन, पीडा, मोठा शोक, मार्गामध्ये क्लेश, मृत्युतुल्यरोग, सर्वकार्याचे निपुणत्व, प्रभुत्व, पुत्र, कर्म, अर्थ यांची सिद्धि; व शालिनी म्ह० भात पिकावयाजोगी उत्कृष्ट भूमि यांचा लाभ होतो. ( हे शालिनीवृत्त) ॥३०॥

गुरु दशमस्थानी अ० स्थान, आरोग्य, धन यांचा नाश करतो. एकादशस्थानी अ० स्थान, आरोग्या, धन याते देतो. द्वादशस्थानी अ० मनुष्य वेगयुक्त रथाने गमन करीत असला तरी मार्गामध्ये प्रतिकूल दु:ख पावतो. (हे रथोद्धतवृत्त) ॥३१॥

शुक्र जन्मराशीस अ० कामोद्दिपक, सुगंध, मनास आनंदकारक, अशी गंधद्रव्ये, पुष्पे, वस्त्रे यांचा लाभ होतो. शय्या, गृह, आसन, भोजन यांनीयुक्त पुरुष मद्यपानाने मत्तस्त्रीच्या मुखकमली भ्रमरासारखा होतो (चुंबन करतो) (हे विलासिनीद्विपदीवृत्त) ॥३२॥

शुक्र द्वितीयस्थानी अ० अपत्य, द्रव्य, धान्य, राजाची प्रीति, कुटुंबाचे कल्याण ही प्राप्त होऊन, पुष्पे, रत्ने, यानी अलंकृत होत्साता वसंतातील तिळांच्या पुष्पांच्या कांतीसारखे (पांढरे) केश झालेला (वृद्ध) ही पुरुष स्त्रीविलासाते करतो. (हे वसंततिलकवृत्त) ॥३३॥

शुक्र तृतीयस्थानी अ० प्रभुत्व, धन, मान, स्थान, ऐश्वर्य, वस्त्र, शत्रुनाश, यांते करतो. चतृर्थस्थानी अ० मित्रप्राप्ति व रुद्र, इंद्र, वज्र यांसारखी शक्ति यांते देतो. (हे इंद्रवज्रवृत्त) ॥३४॥

शुक्र पंचमस्थानी अ० बहुत संतोष, बंधुजनप्राप्ति, पुत्र, धन, यांचा लाभ; मित्र, सहाय, शत्रुसैन्यामध्ये अनवस्था ही होतात. (हे अनवसितवृत्त) ॥३५॥

शुक्र षष्ठस्थानी अ० पराजय, रोग, संताप हे देतो. सप्तमस्थानी अ० स्त्रीच्या निमित्ताने अनिष्ट होते. अष्टमस्थानी अ० गृह, परिवार देतो व लक्ष्मीयुक्त स्त्रीते देतो. (हे लक्ष्मीवृत्त) ॥३६॥

शुक्र नवमस्थानी अ० धर्म, स्त्री, सुख, यांचा उपभोग करतो, व धन, वस्त्रे यांचा समूह प्राप्त होतो. दशमस्थानी अ० प्रमित (अल्प) अक्षरे जरी बोलला तरी अपमान, कलह हे निश्चयाने होतात. (हे प्रमिताक्षरवृत्त) ॥३७॥

शुक्र एकादशस्थानी अ० मित्र, धन, अन्न, सुगंधद्रव्ये, ही प्राप्त होता. द्वादशस्थानी अ० द्रव्य, वस्त्र यांचा लाभ होतो व वस्त्रलाभ स्थिर होत नाही. (हे स्थिरवृत्त) ॥३८॥

शनि जन्मराशीस असता विष, अग्नि यानी पीडित, स्वजनांनी रहित, बंध, वध यांनी युक्त, मित्र, गृह यांनी रहित, द्रव्य, पुत्र ही विमुख (नाहीत,) परिभ्रमणाने दीनमुख असा होत्साता परदेशाप्रत प्राप्त होतो. (हे तोटकवृत्त) ॥३९॥

शनि द्वितीयस्थानी प्राप्त झाला अ० रूप, सुख यांनी रहितशरीर, गर्व, बल, यांनी रहित, विद्यादिगुणांनी केलेला द्रव्यसंचय बांबूच्या पानावर पडलेल्या उदकासारखा बहुत नसून बहुत दिवसही रहात नाही. (हे वंशपत्रपतितवृत्त) ॥४०॥

शनि तृतीयस्थानी अ० धने, दास, परिवार, उंट, महिष, अश्व, हत्ती, गर्दभ, गृह, ऐश्वर्य,बहुतसुख, रोगनाश यांते प्राप्त होतो. भित्रा असताही शूरांच्या व्यापारांनी मोठया शत्रूते शिक्षा करतो. (हे ललितवृत्त) ॥४१॥

शनि चतुर्थास्थानी अ० मित्र, धन, स्त्री, पुत्र इत्यादिकांनी रहित होतो. या पुरुषाचे चित्त सर्वत्र असाधु, (पापाकारी,) सर्पाच्या गमनासारखे (कुटिल) होते. (हे भुजंगप्रयातवृत्त) ॥४२॥

शनि पंचमस्थानी अ० पुत्र व धन यांनी रहित, बहुत कलहाने युक्त असा होतो. षष्ठस्थानी असता शत्रु व रोग यांचा नाश करून श्रीपुटोष्ठ (शोभेचे पात्र अशा ओष्ठाने युक्त) अशा स्त्रीच्या मुखाचे चुंबन करतो. (हे पुटवृत्त) ॥४३॥

शनि सप्तमस्थानी अ० मार्गाप्रत गमन करतो (प्रवास होतो.) अष्टमस्थानी अ० प्रवास होतो व स्त्रीपुत्रांनी रहित, दीनचेष्ट होतो. नवमस्थानी अ० गमन, स्त्री - पुत्रहीन, दीनचेष्ट असा होतो व वैर, हृद्रोग (चित्तरोग,) बंधन यांहीकरून वैश्वदेव इत्यादि कर्मांचा विच्छेद होतो. (हे वैश्वदेवीवृत्त) ॥४४॥

शनि दशमस्थानी अ० कर्मांची प्राप्ति, द्रव्यनाश, विद्या व कीर्ती यांची हानि (नाश) ही होतात. एकादशस्थानी अ० तीक्ष्ण (उग्र) स्वभाव, दुसर्‍याची स्त्री व दुसर्‍याचे धन यांचा लाभ, हे होतात. द्वादसस्थानी अ० शोकांच्या बहुत लहरीते प्राप्त होतो. (हे ऊर्मिमालावृत्त) ॥४५॥

शुभकारकग्रह, शुभदशादिकाल व मनुष्य पाहून हे पूर्वोक्त गोचर शुभाशुभ फल देतात. यास द्दष्टांत - मेगसमूह वसंतऋतूत कुडव (धान्य मोजावयाचा पावशेर) यामध्ये बहुत उदक सोडीत नाही. कारण - वसंत पर्जन्यकाल नव्हे व कुडव हे उदकपात्र (विस्तृत) नव्हे लहान धान्यपात्र आहे ॥४६॥

सूर्य व मंगळ हे तांबडीपुष्पे, सुगंधद्र्व्ये, रक्तचंदनादि ताम्रवर्णगंधे, सुवर्ण, वृषभ, बकुलवृक्षाची पुष्पे, यांनीकरून भक्तीने पूजावे. चंद्र, धेनु, श्वेतपुष्पे, रुपे, दधिमधुघृतशर्करादि मधुरद्रव्ये यांनीकरून पूजावा. कामोद्दीपक गंधपुष्पादिकांनी शुक्राची पूजा करावी. काळ्या गंधपुष्पादिकांनी शनीची पूजा करावी. मणि, रुपे, तिलकपुष्पांनी बुधाची पूजा करावी. पिवळ्या गंधपुष्पादिकांनी गुरूची पूजा करावी. याप्रकारे सूर्यादि ग्रहांची पूजा करणारा पुरुष, उंचावरून पडेल अथवा सर्प खेळत असता त्यांमध्ये प्रवेस करील, तथापि ग्रह संतुष्ट झाले अ० त्यास पीडा (दु:ख) होणार नाही. (हे भुजंगविजृभितवृत्त) ॥४७॥

देव व ब्राम्हाण यांचे पूजन, शांति, मंत्रजप, जिताहारत्व व ब्रम्हाचर्यादि नियम, दान, इंद्रियनिग्रह, साधुजनांबरोबर संभाषण व समागम इत्यादिकांनी पापग्रहाच्या उत्पन्न झालेल्या द्दष्टीतेही निवारण कर. (पापद्दष्टीची शांति कर) (हे उद्रतवृत्त) ॥४८॥

सूर्य व मंगळ हे राशीच्या पूर्वार्धी, चंद्र व शनि हे राशीच्या उत्तरार्धी शुभाशुभ फल देतात. (यांतच गीति व उपगीति आर्यांचे लक्षण सांगतात) आर्येच्या पूर्वार्धासारखेच उत्तरार्ध अ० गीति व उत्तरार्धासारखेच पूर्वार्ध अ० उपगीति असे अनुक्रमाने लक्षण जाणावे (हे गीतिवृत्त) ॥४९॥

बुध, राशिप्रवेशकाली (पूर्वार्धी) जसे शुभाशुभ फल देतो तसेच राश्यंती (उत्तरार्धी) ही होतो, उपगीतिच्छंदाच्या मात्रांची जशी समता होते. तसे राशीच्या पूर्वपश्वार्धी बुध समफल देतो (हे उपगीतिवृत्त) ॥५०॥

गणनामक देवविशेषाची पूजा न केली अ० तो साधूंचाही जसा नाश करतो तसा गुरु (बृहस्पति व शुक्र) अशुभस्थानी राशीच्या मध्यभागी असता, साधूचाही नाश करितो. तोच गुरु षष्ठस्थानी अ० सर्वत्र गौरव (सत्कार) हीन पुरुष होतो. आर्याछंदाच्या गणात मध्ये गुरु अक्षर असेल तर त्या आर्येचा नाश होतो. (हे आर्यावृत्त) ॥५१॥

शुभफल देणारा बलवान ग्रह अशुभफल देणार्‍या बलिष्ठ ग्रहाने द्दष्ट; अथवा अशुभफल देणारा बलवान ग्रह शुभफल देणार्‍या बलिष्ठ ग्रहाने द्दष्त अ० शुभ किंवा अशुभ फलांची समता होते म्ह० कोणतेही फळ होत नाही. हे नर्कुटकवृत्त प्राकृतात (बालभाषेत) व संस्कृतात सारखेच  होते. (हे नर्कुट्क वृत्त) ॥५२॥

नीचस्थानि, शत्रुगृही, सप्तमस्थानी शत्रुद्दष्टग्रहाचे फल व्यर्थ होते. अंधाच्यापुढे सुंदर स्त्रीचे विलासयुक्त कटाक्शाणे पाहणे जसे व्यर्थ होते. (हे विलासवृत्त) ॥५३॥

शनि, सूर्यासारखाच शुभाशुभ होय म्ह० ३।६।१०।११ यास्थानी शुभ होय. बुध, समीप राहणार्‍या ग्रहाच्या छंदाने (ग्रहाच्या गुणाप्र०) शुभाशुभफल देतो. जसे संस्कृतामध्ये आर्यागीति वृत्त, तेच  प्राकृता (बालभाषा) मध्ये स्कंदकवृत्त; तसेच वैतालीयवृत्त, तेच छंदाने प्राकृतात मागधी गाथा आर्येते अनुगमन करते ॥५४॥

शनि, सूर्यकिरणांच्य योगाने (अस्तगंतत्वाने) सविकार होत्साता कोपून पथ्यभोजन करणार्‍या मनुष्यांस  पित्तासारखे फार अशुभफल देतो. तसे साधूस देत नाही. (हे पथ्याआर्यावृत्त) ॥५५॥

चंद्र, शुभाशुभग्रहयोगाने शुभाशुभ फल देतो. जसा मनोवृत्तीच्या योगाने मुखास विकार होतो. (हे वक्त्रवृत्त) ॥५६॥

श्लोकच्छंदामध्ये सर्व चरणात पाचवे अक्षर व दुसर्‍या व चौथ्या पादात सातवे अक्षर जसे लघुत्व पावते तसे अशुभस्थानी ग्रह अ० पुरुषास लघुत्व होते. ९हे श्लोकवृत्त) ॥५७॥

स्वभावाने लघु (असत्कुलोत्पन्न) व वृत्तवाहय (दु:शील) असाही पुरुष शुभस्थानी ग्रह आले असता, लोकांमध्ये श्रेष्ठत्व पावतो. प्रकृतीने लघुवर्ण अ० चरणाच्या अंती असेल तर गुरु होतो ॥५८॥

पंडितांनी आपली वृद्धि होण्यासाठी, अशुभस्थानी ग्रह असता, आरंभिलेले  कर्मच त्याचा नाश करिते. जसे यथाशास्त्र न केलेले वेतालपूजनादि कर्म नाश करिते. (हे वैतालीयवृत्त) ॥५९॥

जो राजा, ग्रहांचे सुस्थितत्व (शुभत्व) पाहून यात्राकाली यात्रा करतो; तो, अल्पही पराक्रमाने वेदोक्त वृत्ताचा (कार्याचा) चार म्ह० शेवट पावतो (हे औपच्छंदसिकवृत्त) ॥६०॥

उपचय ३।६।१०।११ यास्थानी सूर्य असता, रविवारी अथवा लग्नी सूर्य असता, सुवर्ण, तांबे, अश्व, काष्ठ, अस्थि, कातडे, कवलादि ऊर्णावस्त्र, पर्वत, वृक्ष, त्वचा, (साल) नख, व्याल, (सर्प, सिंह, वाघ, उन्मत्तहत्ती, हिंस्रपशु, चित्रक) चोर, शस्त्रसंबंधी, अरण्य, क्रूर, राजोपसेवा, अभिषेक, औषधे, क्षौमवस्त्र, (तागाचे, सणाचे वस्त्र) पण्यादि (बाजारसंबंधी) गवळी, कातार, (कठिणमार्ग) वैद्य, अश्मकूट  यासंबंधी कार्ये करावी म्हणजे सिद्ध होतात ॥

इंदुवारी व कर्कलग्नी व चंद्र, केंद्री १।४।७।१० असता,  अलंकार, शंख, मोती, कमळ, रुपे, जळ, यज्ञ, ऊंस, भोजन, स्त्री, क्षीर, जिवंतझाडे, झुडपे, पाणथलदेश धान्य, पातळपदार्थ, ब्राम्हाण, अश्व, शीतद्रव्यसेवन, बैल, नागरणे इत्यादि, सेनापति, आक्रंद (वीरांचा शब्द,) राजा, सौभाग्यकरण, चोर, श्लेष्म्यासहितद्रव्य, (बुळबुळीत पदार्थ) पुष्प, वस्त्र, यांविषयी कार्यांचा आरंभ केला असता त्यांची सिद्धि होते ॥

मंगळवारी धातूंचे खाणीसंबंधी कार्ये, सुवर्ण, अग्नि, पोवळे, आयुध, क्रूरत्व, चौर्य, उपद्रव, अरण्य, पर्वतादिदुर्ग, सेनाधिकार, तांबडयापुष्पांचे वृक्ष, इतर तांबडे द्रव्य, निबादिकडु, मिरी इ० तिखट, दंभ व सर्प डसण्याने संपादित द्रव्य, कुमार वैद्य, शाक्यभिक्षु (जैनमती,) रात्री फिरणे, पट्टवस्त्र, शठस्वभाव (परकार्यविमुखत्व,) दंभ, यासंबंधी सर्व कार्ये सिद्ध होतात ॥

बुधाच्यालग्नी व वारी हिरवी रत्ने, भूमि, सुगंधिद्रव्ये, वस्त्रे, साधारण (उग्र सौम्य) नाटकशास्त्र, आध्यात्मिक, काव्य, सर्वकलायुक्ति, मंत्र व धातु यांच्या क्रिया, वाद, निपुणता, पुण्य, व्रतग्रहण, दूत, आयुष्यवर्धक, छद्मव्यवहार, असत्य, स्नान, र्‍हस्व, दीर्घ, मध्य, परचित्तग्रहण, अतिवृष्टि, गमनास अनुकारी (आगमनादि) कार्ये, ही केली, अ० सिद्ध होतात (हे चंडवृष्टिप्रयातदंडकवृत्त) ॥६१॥

गुरुवारी सुवर्ण, रुपे, अश्व, ह्त्ती, बैल, वैद्य, औषधि, ब्राम्हाण, पितर, देव यांची कार्ये; पुर;स्थित (पदाति), छत्रादि धर्मवारण, चंवरी, अलंकार, राजा, देवगृह, धर्माश्रय, सुभकार्य, शास्त्र, मनोज्ञ, बलप्रद, सत्यवाणी, व्रत, हवन, धन, ही व रंगादिकाने पताकेच्या काठीप्रमाणे सुंदर, यांची सिद्धि होते (हे वर्णकदंडकवृत्त) ॥६२॥

शुक्रवारी चित्रकर्म, वस्त्र, वृष्यप्रयोग (रेतोवृद्धिकर,) वेश्यास्त्री, क्रीडा, हास्य, सुरतादियौवनोपभोग, रम्यभूमि (बागइ०,) स्फटिक, रूपे, कामोपचार, वाहन, ऊस, शरद्दतूसंबंधी, गो, वाणिज्य, शेतकी, औषधि, कमळे यासंबंधी कार्ये करावी ॥

शनैश्वराच्यावारी महिषी, बोकड, उंट, कृष्णलोखंड (शस्त्र,) दास, वृद्ध, नीचकर्म, पक्षि, चोर, पारधी, विनयच्युति, फुटकीभांडी, हत्तीसंबंधी, विघ्नकारणे ही केली असता सिद्ध होतात; इतर कार्ये सिद्ध होत नाहीत. समुद्रतीरास जाऊन त्याचे थोडेही पाणी जसे उपयोगी नाही; तशी यावाचून दुसरी कार्ये सिद्ध होत नाहीत (हे समुद्रदंडकवृत्त) ॥६३॥

विस्तीर्ण छंदांचा विस्तार जाणून मी हे कार्य केले. हा कानास गोड असा वृत्तसंग्रह वराहमिहिर बोलता झाला. (हे विपुलार्यावृत्त) ॥६४॥


॥ इतिश्रीवरा०बृहत्संहितायांग्रह्गोचराध्यायोनामचतुरुत्तरशततमोध्याय: ॥१०३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP