मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय ७४

बृहत्संहिता - अध्याय ७४

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


सर्व पृथ्वी जिंकिली तरी त्यात एक नगरच श्रेष्ठ होय. नगरामध्ये गृह, गृहामध्येही त्याचा एकदेश (निजण्याचा प्रदेश, खोली,) त्यामध्येही शय्या (बिछाना,) त्या शयनीही मणि सुवर्ण इत्यादिकांनी भूषित उत्तम स्त्री, हे राज्यसुखाचे सार होय ॥१॥

स्त्रिया रत्नांना शोभवितात. रत्नकांतीने स्त्रिया सुशोभित होत नाहीत. रत्नयुक्त जरी स्त्रिया नसल्या तथापि पुरुषांचे चित्त हरण करितात. स्त्रियांच्या अंगसंगावाचून रत्ने चित्त हरण करीत नाहीत ॥२॥

सुखदु:खादि आकार आच्छादित करणारे, शुत्रुसैन्य जिंकण्याविषयी उद्युक्त, कृत व अकृत जे हजारो व्यापारविस्तार त्यांनी व्याप्त अशा राजतंत्रांचे चिंतन करणारे, प्रधानांनी सांगितल्याप्रमाणे वागणारे, पुत्रादि सर्वांपासून शंका घेणारे, दु:खसमुद्रामध्ये राहणारे, अशा राजांस प्रियस्त्रीचे द्दढालिंगन हे सौख्यलेश होय (क्षणमात्र सुखकारक होय) ॥३॥

स्त्रीनाम श्रवण केले, पाहिले, स्पर्श केला, स्मरणही केले असता, पुरुषांस आनंदकारक असे रत्न स्त्रियांहून इतर कोणतेही ब्रम्हदेवाने उत्पन्न केले नाही, स्त्रियांच्या अर्थी (स्त्रीसहायाने) धर्म व अर्थ हे प्राप्त होतात. पुत्र व विषयसुखे  त्यांपासून होतात. गृहामध्ये स्त्रिजा लक्ष्मीरूपच होत. यास्तव स्त्रिया सत्कार व ऐश्वर्य यांस निरंतर योग्य होत (स्त्रियांचा सत्कार करावा) ॥४॥

स्त्रियांचे गुण सोडून, वैराग्यमार्गाने, जे स्त्रियांस दोषयुक्त म्हणतात; ते दुर्जन होत, असा माझ्या मनाचा निश्चय आहे व ती त्यांची भाषणे परमार्थपर (सत्य) नव्हेत (कपटी होत) ॥५॥

मनुष्यांनी आचरण केला नाही. असा मोठा दोष स्त्रियांचा काय आहे ? हे तुम्ही खरे सांगा, परदारगमनादिदोष प्रथम, पुरुषांनी आचरण केला. पश्चात त्यांनी त्यांपासून ग्रहण केला. तस्मात पुरुषांनी निर्लज्जपणाने स्त्रिया दोषित केल्या; परंतु त्या उत्तम गुणवान आहेत. याविषयी धर्मामार्ग सांगणार्‍या मनूने त्याच स्त्रियांचे प्राधान्य सांगितले, ते पुढे सांगतो ॥६॥

त्या स्त्रियांस चंद्र शुद्धि देता झाला गंधर्व आनंदकारक वाणी देते झाले. अग्नि सर्वभक्षित्व देता झाला. यास्तव सर्ववर्णाच्या स्त्रिया सुवर्णासारख्या शुभ होत ॥७॥

ब्राम्हण पायांनी पवित्र, गाई पाठीमार्ग पवित्र, बकरा व अश्व हे मुखाने पवित्र, स्त्रिया तर सर्वत: पवित्र होत ॥८॥

स्त्रिया बहुत शुद्ध होत कधीही त्या दूषित होत नाहीत. प्रतिमासाच्याठाई रज, यांच्या पातकांचा नाश करिते ॥९॥

सत्कार होत नाही, अशा कुलस्त्रिया, ज्या गृहांस शापितात. ती गृहे महामारीने मारल्यासारखी सर्वत्र नाश पावतात. (सर्व मनुष्ये मरतात) ॥१०॥

पत्नी असो अथवा माता असो, पुरुषांची उत्पत्ति स्त्रियांपासून आहे. यास्तव त्यांची निंदा करणारे कृतघ्नहो, तुम्हास सुख कोठून होईल ॥११॥

स्त्री व पुरुष या दोघांसही व्युत्क्रमाने (पुरुषास परस्त्रीगमन व स्त्रियांस परपुरुषगमन) यांचा दोष शास्त्रांत सारखाच सांगितला आहे. पुरुष त्या दोषाते पाहत नाहीत. स्त्रिया पाहतात. यास्तव विचार केला अ० स्त्रियाच श्रेष्ठ होत ॥१२॥

बाहेर केश असे गाढवाचे कातडे पांघरून “मी परदार गमन केले आहे. मला भिक्षा घाला” असे बोलून सहा महिने भिक्षा मागेल तेव्हा, परस्त्रीगमन करणारा पुरुष शुद्ध होतो ॥१३॥

पुरुषांची कामवासना शंभर वर्षांनीही जात नाही. ती कामवासना पुरुषांची अशक्तीने निवृत्त होते. व स्त्रियांची धैर्याने निवृत्त होते. तस्मात स्त्रियांचे सामर्थ्य पुरुषांपेक्षा अधिक होय ॥१४॥

निष्पाप स्त्रियांची निंदा करणार्‍या दुर्जन पुरुषांचे धारिष्ट, ज्याकडे चोरी केली, त्यासच चोरा उभा रहा, असे बोलणार्‍या चोराप्रमाणे होय ॥१५॥

पुरुष स्त्रियांपाशी एकांती (रतिसमयी) जी प्रियभाषणे करितात. ती रतीनंतर करीत नाहीत आणि दुष्टत्वही करतात. स्त्रिया तर सुंदर कृतज्ञता जी तीणेकरून मृतपतीते आलिंगन करून अग्नीप्रत प्रवेश करितात. (नवर्‍याचा  उपकार स्मरून अग्नीत सती जातात) ॥१६॥

स्त्रीरत्नाचा उपभोग ज्या पुरुषास आहे तो, निर्धन असला तरी, आपणास राजा मानितो. राज्याचे सार स्त्रियांचा उपभोग करणे हेच आहे व तृष्णाग्नीचे प्रज्वलित करणारे, असे शेष राहिलेले काष्ठच स्त्री होय ॥१७॥

प्रथमतारुण्याने युक्त, थोडे, रमणीय, मधुर, स्तब्ध, असे आहे भाषण जिचे अशी; उच्चस्तनी अशा स्त्रीचे आलिंगन करून जे रतिसुख प्राप्त होते ते ब्रम्हादेवाच्या घरीही नाही असे मला वाटते ॥१८॥

ब्रम्हालोकामध्ये देव, मुनि, सिद्ध, चारण याही मान्य (पूजनीय) पूजक, सेवनीय यांच्या सेवेहून दुसरे सुख काय आहे ते सांगा ? एकांती स्त्रीचे आलिंगन करून जे सुख प्राप्त होते ते जर सुख नव्हे तर ब्रम्हालोकामध्ये तरी याहून सुख कोणते आहे ? ॥१९॥

ब्रम्हदेवापासून कृमिपर्यंत सर्व जगत स्त्रीपुरुषयोगाने बद्ध आहे. यास्तव या जगामध्ये पुरुषास स्त्रीविषयी काय लाज आहे. शिवही स्त्रीच्या लोभाने चतुर्मुख झाला. (याविषय़ी कथा - तिलोत्तमा अप्सरा शिवास प्रदक्षिणा करीत असता, अतिसुंदर पार्वती मांडीवर होती ती रागे भरेल म्हणून, चार दिशांस चार मुखे करून अप्सरेकडे शिव पाहता झाला व एका मुखाने पार्वतीकडे पहात होता) ॥२०॥


॥ इतिबृहत्संहितायांअंत:पुरचिंतायांस्त्रीप्रशंसानामचतु:सप्ततितमोध्याय: ॥७४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP