मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय ४२

बृहत्संहिता - अध्याय ४२

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


अतिवृष्टि, उल्का, दंड, परिवेष, ग्रहण, परिधि, इत्यादि उत्पात अमावास्येस किंवा पौर्णिमेस पाहून, धान्यादिकांचे सुभिक्ष किंवा दुर्भिक्ष प्रतिमासी सूर्यचारावरून सांगावे. अन्यतिथींस जे उत्पात होतील ते राजांस शस्त्रकलह (युद्ध) व पीडा देतात ॥१।२॥

मेषराशीस सूर्य असता, अमावास्येस व पौर्णिमेस श्लोक १ व २ यात सांगितलेले उत्पात होतील तर ग्रीष्मऋतूत पिकणार्‍या धान्याचा संग्रह करावा. वृषभास सूर्य अ० वनोत्पन्नमूलफलांचा संग्रह करावा. ते पदार्थ पुढे महाग होऊन त्या दोहोंच्याही व्यापारात चार महिन्यांनी लाभ होतो ॥३॥

मिथुनराशीस सूर्य अ० सर्व मधुरादिरस व धान्ये यांचा संग्रह करून सहाव्या महिन्यात विक्रय केला तर बहुत लाभ होतो ॥४॥

कर्कराशीस सूर्य अ० मध, सुगंधिद्रव्ये, तेल, घृत काकवी किंवा गूळ ही घ्यावी; त्यांची दुसर्‍या महिन्यात विकल्याने दुपटी होते; परंतु कमजास्त काळ झाला तर तूट येते ॥५॥

सिंहराशीस सूर्य अ० सुवर्ण, हीरकादिमणि, चर्म, कवच, शस्त्रे, मोती, रुपे ही घ्यावी त्यांचा लाभ विकणारास पाचव्या महिन्यात होतो. इतर काळी तोटा होतो ॥६॥

कन्याराशीस सूर्य अ० चवर्‍या, गर्दभ, उष्ट्र, अश्व, ही घ्यावी. ती सहाव्या महिन्यात विकणारास दुप्पट लाभ होतो ॥७॥

तूळराशीस सूर्य अ० तातवभांड (तंतुनिर्मित जे गोधडी इ०,) मणि, कंबल, काच, पीतवर्णपुष्पे, धान्ये, ही घ्यावी. त्यांची सहा महिन्यांनी व्यापाराने दुप्पट वृद्धि होते ॥८॥

वृश्चिकराशीस सूर्य अ० फले, कंद, (सुरण इ०,) मूल (औषधिमूले,) नानाप्रकारची रत्ने, ही दोन वर्षे ठेवून विकली तर दुप्पट लाभ होतो ॥९॥

धनुराशीस सूर्य अ० कुंकुम, शंख, पोवळी, काच, मोती, फले, त्या वापाराने सहा महिन्यात दुपटी होते ॥१०॥

मकर व कुंभ या राशीस सूर्य अ० लोखंडी पात्रे व धान्ये ही घ्यावी ती एक महिना ठेवून विकावी त्यात दुप्पट लाभ होतो ॥११॥

मीनराशीस सूर्य अ० मूले, फले, कंद, नानाप्रकारची भांडी, रत्ने, ही घेऊन ठेवावी. सहामहिन्यांनी विकणाराच्या इच्छेप्रमाणे लाभ होतो ॥१२॥

(पौर्णिमेस किंवा अमावास्येस उत्पात झाले तर पूर्वोक्त वस्तुसंग्रह सांगितला) ज्या ज्या राशीस चंद्र किंवा सूर्य हे मित्राने युक्त व अधिमित्राने द्दष्ट असतील तेथे हा पूर्वोक्त लाभ होतो अन्यत्र होत नाही ॥१३॥

चंद्र, सूर्यसहित (अमावास्येस) किंवा संपूर्ण (पौर्णिमेस) असून, शुभग्रहांनी युक्त किंवा द्दष्ट असेल तर, तत्काल मूल्याची वृद्धि होते. तसाच चंद्र पापग्रहांनी युक्त, द्दष्ट अ० वृद्धि होते व पापग्रहांनी युक्त, द्दष्ट अ० नाश होतो. या प्रकारे सर्व भाव (राशि) जाणून शुभ किंवा अशुभ फल सांगावे ॥१४॥


॥ इतिबृहत्संहितायांअर्घकांडंनामद्विचत्वारिंशोध्याय; ॥४२॥

N/A

References : N/A
Last Updated : February 21, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP