मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय ८८

बृहत्संहिता - अध्याय ८८

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


कोकिल, ससाणा, शशघ्न (पक्षिवि०) सुतार (पक्षिवि०,) मयूर, श्रीकर्ण (पक्षिवि० चक्रवाक, चाष, बगळा, स्वंजन, पोपट, कावळा, तीन कपोत (१ आपांडुर, (पारवा,) कवडा, होला प०) कोकडकुंभा, कुलाल, कुक्कुट (रानकोंबड,) गर्दभ, हिरवा खबुतर, गिधाड, वानर, फेट (पक्षिवि०,) कोंबडा, पूर्णकूत (पक्षिवि०) चिमणापक्षी, हे सर्व दिवसास फिरणारे असे सांगितले आहे ॥१॥

खोकड (हे कोल्ह्यासारखे असून लहान असते,) पिंगल, छिप्पिक (पक्षिवि०,) वाघूळ, घुबड, हे सर्व रात्रीस फिरणारे होत. सर्व आपला फिरण्याच्या काळ सोडून दुसर्‍याकाळी फिरावयास लागले तर देशनाश अथवा राजाचा नाश होतो ॥२॥

घोडा, मनुष्य, सर्प, उंट, चित्ता, सिंह, रोस, घोरपड, लांडगा, मुंगस, हरिण, कुतरा, बकरा, गाय, वाघ, हंस, हरिणवि० (पुषिव,) कोल्हा, शाळजीवत, कोकिला, माजर, सारसपक्षी, डुकर, हे दिवसरात्र फिरणारे होत ॥३॥

भष, कूटपूरिक, रबक, करायिक, ही पूर्णकूटाची नावे होत. पिंगलिका, वेचिका, हक्का ही उलूकचेटीची नावे होत ॥४॥

श्यामा, कपोतकी होय, वंजुलक, खदिरचंचु होय. छुच्छुंदरी (सुगंधमूषिका,) नृपसुता होय. वालेय, गर्दभ होय ॥५॥

स्त्रोतोभेदी,  तडागभेदी, एकपुत्रक, कलहहारिका ही रला (राळ) इची नावे होत. ही भृंगारासारखा शब्द रात्रीस भूमीच्याठाई करते व हिचे दोन अंगुले लांब शरीर आहे ॥६॥

दुर्बलिक, भांडीक होय. हा पूर्वेकडील लोकांस उजवा शुभ होय. छिक्कार हा मृगजाति होय. कृकवाकु हा कुक्कुट होय ॥७॥

गर्गाकुक्कुटाचे नामकुलालकुक्कुट असे प्रसिद्ध आहे. कुडय (भिंत) मत्स्य हे नाव गृहगोधा (पाल) इचे जाणावे ॥८॥

दिव्य, धन्वन होय. क्रोड, सूकर होय. उस्त्रा, गाय होय. सारमेय, हा श्वा (कुत्रा) होय. जातीने जी चटका ती सूकरी सांगितली ॥९॥

याप्रकारे देशादेशाच्याठाई ती पूर्वीक्त पक्ष्यादिकांची नावे जाणणार्‍यांपासून नावांची उपलब्धि करून शकुनशब्दाच्या ज्ञानार्थ शास्त्राचा विचार करून ती नावे योजावी ॥१०॥

अश्वादियान, आसन, शय्या यांच्याठाई कपोताचे राहणे होईल अथवा तो घरामध्ये जाईल तर मनुष्यास अशुभफल देतो. याच्या जातिभेदाने फलाचा काल आहे तो पुढे सांगतो ॥१२॥

थोडा पांढरा जो कपोट त्याचे फल वर्षाने, चित्रवर्णकपोताचे सहा महिन्याने, कुंकुमवर्ण व धूम्रवर्ण कपोताचे तत्काल शुभाशुभफल होते ॥१३॥

श्यामा (कपोतकी) इचा चिचित् असा शब्द शुभ होय, शूलिशूल असाही शब्द धन्य (शुभ) होय. चच्चा असा शब्द अशुभ होय. चिकचिक असा शब्द आपल्या प्रियपतीच्या योगार्था होतो ॥१४॥

हारीताचा गुग्गु असा शब्द शुभ होय. इतर सर्व शब्द अशुभ होत. भारद्वाजीचे नानाप्रकारचे सर्व शब्द शुभ सांगितले ॥१५॥

करायिका (पूर्णकूटा) इचा किष्किषि असा शब्द व कहकह असा शब्द शुभ होय. करकर असा शब्द केवल कल्याणकारक होतो, कार्यसिद्धिकारक होत नाही ॥१६॥

कोटुल्ली असा अब्द कल्याणकारक होय. करायिकेचा कटुक्ली असा शब्द वृष्टिकारक होतो. कोटिकिली असा शब्द निष्फल होय. गुं असा केलेला शब्द अशुभ होय ॥१७॥

दिव्यकाचे वामभागी दर्शन शुभ होय. हस्तमात्र उंच दिव्यकाच्या दर्शनाने सिद्धि होते. तोच फार उंच असता, सर्व पृथ्वी स्वाधीन होते ॥१८॥

गमनकर्त्यास सर्प सन्मुख आला तर शत्रुसमागम व बंध, यांनी नाश, हे होतात. अथवा उजव्या अंगाहून डाव्या अंगास येईल तर तो कार्यसिद्धि व जाणेयेणे यांविषयी शुभ नव्हे ॥१९॥

कमल व घोडा, गज, सर्प यांच्या मस्तकी खंजनकपक्षी पाहिला तर राज्य प्राप्ति होते. शुद्धप्रदेश व दूर्वा यांमध्ये पाहिला तर कल्याणकारक होय. भस्म, हाडे, काष्ठे, कोंडा, केश, तृण, यांचाठाई खंजनकपक्षी पाहिला तर एक वर्षापर्यंत दु:ख करितो ॥२०॥

तित्तिरपक्ष्याचा किलिकिल्किलि असा शब्द शांत व शुभ फल देणारा होय. इतर शब्द अशुभ होय. ससा रात्रीस डाव्या बाजूस जाऊन शब्द करील तर शुभफल देतो असे सांगतात ॥२१॥

वानराचा किलिकिलि शब्द दीप्त; तो गमनकर्त्यास शुभफल देणारा नव्हे. चुग्लु शब्द शुभ होय. वानरासारखेच कुलालकुक्कुटाच्या शब्दांचे शुभाशुभ जाणावे ॥२२॥

कृमि, पतंग, मुंग्या इत्यादि प्राण्यांनी पूर्णमुख असा चाष ज्या मनुष्याच्या प्रदक्षिण जाईल; अथवा आकाशामध्ये स्वस्तिकाकार चाष गमन करील तर त्या मनुष्यास मोठा अर्थलाभ शीघ्र होतो ॥२३॥

चाषाचे कावळ्याबरोबर युद्धहोत अ० दक्षिणभागी चाष होईल तर त्याचा पराजय झाला, त्यावेळी निघालेल्या मनुष्याचा वध होतो. उत्तरभागी चाष झाला तर जय झाला, तसाच गमनकर्त्याचा जय होतो ॥२४॥

चाष, केफा, असा व पूर्णकूटासारखा (श्लोक १६।१७) वामबाजूस शब्द करील तर जय होतो. क्रक असा चाषाचा शब्द दीप्त; तो अशुभ होय. याचे दर्शंन गमनकर्त्यास सर्वकाल शुभ होय ॥२५॥

अंडीरपक्षी ष्टी अशा शब्दाने पूर्ण (शुभ) होय. टिट्टिट्टि शब्दाने दीप्त (अशुभ) होय. दक्षिणबाजूस फेंट शुंभ होय. त्याच्या शब्दाविषयी विशेष केलेला नाही ॥२६॥

श्रीकर्णपक्ष्याचा क्वक्वक्व असा शब्द दक्षिणभागी शुभ होय. चिक्‌चिक् असा शब्द मध्यम होय. शेष सर्व शब्द निष्फल होत ॥२७॥

दुर्बलीचा (भंडीरक) चिरिल्विरिल्वि असा शब्द वामभागी शुभ होय. तो डाव्याआंगून उजवीकडे जाईल तर शीघ्र कार्यासिद्धि होईल ॥२८॥

भंडीरक, चिक्‌चिकि असा शब्द करून डावीकडून उजवीकडे जाईल तर तो कल्याणमात्र करील अर्थसाधन करणार नाही. याच्या निपरीत जाईल तर वध, बंध, भय ही होतील ॥२९॥

जी सारिका (शाळुंखी) क्रक्र किंवा त्रेत्रे असे शब्द शीघ्र निर्भयहोत्साती करिते ती, गमनकर्त्याच्या अंगापासून रक्तस्राव होईल असे सांगते ॥३०॥

फेंटकपक्ष्याचा वामभागी चिरिल्विरिल्वि असा शब्द शुभ होत; इतर शब्द दीप्त (अशुभ) होत ॥३१॥

वामभागी एकस्थानस्थित गर्दभाचा शब्द श्रेष्ठ होय. गर्दभाच्या ओंकारशब्दाने गमनकर्त्याचे हित होते. याहून अन्य गर्दभाचा सर्व शब्द दीप्त (अशुभ) होय ॥३२॥

कुरंग (मृगजाति वि०) अन्यमृगांसहित आ, असा शब्द करील व पृषत मृग ओ, असा शब्द करील तर ते दोनही शुभ होत. या मृगांचे जे अन्य शब्द ते दीप्त होत. सर्व शकुनांचे जे पूर्ण शब्द ते शुभ व जे दीप्त ते अशुभ होत ॥३३॥

कोंबडे रात्रीस भिऊन कुकुकुकु असे शब्द करतात ते सोडून अन्य शब्द भयप्रद होत. ते स्वस्थ होत्साते रात्रीच्या अंती स्वाभाविक उच्चस्वराने शब्द करतात ते राष्ट्र, नगर, राजा यांस वृद्धि देणारे होतात ॥३४॥

छिप्पिकेचे नानाप्रकारचे शब्द आहेत त्यात तिचे कुलुकुलु, असे शब्द शुभ होत; इतर अशुभ होत. गमनकर्त्यास मांजराचा शब्द सर्वकाल अशुभ होय. गाईची शिंक गमनकर्त्यास मरणच करते ॥३५॥

घुबड, आपल्या स्त्रीची इच्छा करित होत्साता, आनंदाने हुंहुंग्लुक, असा शब्द करतो व गुरुलु, असा शब्द करतो ते शब्द पूर्ण होत. त्याचा किस्किसि, असा शब्द दीप्त होय. जेव्हा बलबल असा शब्द स्त्री वा होतो तेव्हा कलह जाणावा. ट्टट्ट्ट, असा शब्द अशुभच होय. अन्य सर्व शब्द दीप्त; ते अशुभ होत. (तस्यासकृत्‌) असा पाठ आहे तेव्हा त्या उलूकाचा बलबल असा वारंवार शब्द होतो तेव्हा कलह जाणावा असा अर्था होतो ॥३६॥

सारसपक्ष्याचा शब्द स्त्रीपुरुषांचा एकवेळच होईल तर शुभ होय. एकाचाच अशुभ होय. जर एकाचाच शब्द बहुतवेळाने होईल तर अशुभ होय ॥३७॥

पिंगलापक्षी, चिरिल्विरिल्वि, या शब्दानी शुभ करतो. याहून अन्य जे शब्द ते दीप्तसंज्ञक (अशुभ) होत ॥३८॥

पिंगलापक्ष्याचा इशि, असा शब्द गमननिषेध करतो. कुशुकुशु, असा शब्द कलहकारक होय. ती पिंगला इष्टकार्यसिद्ध जशी सांगते तो प्रकार पुढे सांगतो ॥३९॥

सायंसंध्यासमयी त्या पिंगलेच्या राहण्याच्या बूक्षाप्रत जाऊन नम्र होत्साता ब्रम्हादि देवांची पूजा करून, नूतन वस्त्रे व सुगंधे यांनीकरून त्या वृक्षाचीही पूजा करून ॥४०॥

नंतर त्याच मध्यरात्रीस एकटा आग्नेयीदिशेस उभा राहून दिव्य व लौकिक शपथांनी तिल योजून, ती जशी आयकेल तसा चिंतित अर्थ या वक्ष्यमाण मंत्राने विचारावा ॥४१॥

हे भद्रे, या अर्थाते जाणतेस यास्तव मी प्रेरित तू सर्व वाक्यांची जाणणारी असे म्हणतात ॥४२॥

तुला मी विचारतो. आज मी गमन करीन पुन: प्रात:काली येऊन आग्नेयी दिशेस उभा राहून विचारीन ॥४३॥

जे विचारीन ते, हे कल्याणि जसे मी स्पष्ट जाणेन तसे आपल्या शब्दादि व्यापाराने सांगण्यास योग्य आहेस ॥४४॥

पूर्वोक्तप्रकारे बोलले असता वृक्षावर राहणारी पिंगला चिरिल्विरिल्वि, असा शब्द करील तर कार्यसिद्धि, दिशिकारशब्दी व कुचाकुचशब्दी चित्तव्याकुलत्व, ही होतात ॥४५॥

कोणताच शब्द करणार नाही तर कार्यासिद्धि होते. पूर्व अध्यायोक्त “ऐंद्रयांदिशिशांताया” अशी दिक्‌चक्रफले सांगितली ती येथेही पहावी. वृक्षाच्या मुख्य खांदीवर ती असली तर उत्तम, मध्यखांदीवर मध्यम, कनिष्ठखांदीवर कनिष्ठफल सांगावे ॥४६॥

पालीच्या शब्दाची फले, द्वात्रिंशत्प्रविभक्तदिकचक्रासारखी आतबाहेर जाणावी. चिचोंद्रीचा चिच्चिड असा शब्द प्रदीप्त (अशुभ,) तित्तिड असा शब्द पूर्ण (शुभ) होय ॥४७॥


॥ इतिसर्वशाकुनेशकुनरुताध्यायस्तृतीय: ॥३॥

॥ इतिश्रीवराहमिहिरकृतौबृहत्संहितायामष्टाशीतितमोध्याय: ॥८८॥

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP