मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय ९४

बृहत्संहिता - अध्याय ९४

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


हत्तीच्या दातांचे मूलाचा घेर दुप्पट करून तितके लांब दांत ठेवून, पुढे कापावे; परंतु बहूदकदेशांतील हत्तींचे किंचित याहून अधिक असावे व पर्वतावरील हत्तीचे किंचित कमी असावे ॥१॥

श्रीवत्स, स्वस्तिक, छत्र, ध्वज, चामर, यांसारखा हस्तिदंताचा छेद दिसला तर आरोग्य, विजय, धनवृद्धि, सौख्य, ही होतात ॥२॥

तो छेद खडगासारखा दिसेल तर जयप्राप्ति, नंद्यांवर्त (नंदाच्या शेल्यावर काढतात ते चिन्ह) य़ासारखा असेल तर नष्टदेशाची प्राप्ति, मृत्पिंडासारखा असेल तर पूर्वी प्राप्त झालेला देस हस्तगत होईल ॥३॥

तो छेद स्त्रीरूपासारखा दिसेल तर ह्त्तींचा नाश, झारीसारखा दिसेल तर पुत्रोत्पत्ति, कुंभसद्दश दिसेल तर ठेव मिळेल, दंडासारखा दिसेल तर यात्रेस विघ्न होईल ॥४॥

तो छेद सरडा, वानर, सर्प यांसारखा दिसेल तर दुर्भिक्ष, व्याधि, शत्रूच्या स्वाधीन होणे ही होतात. गृध्र, घुबड, कावळा, ससाणा यांसारखा असेल तर लोकांस मृत्यु होईल ॥५॥

तो छेद पाश व कबंध (छिन्नमस्तकपुरुष) यांसारखा असेल तर राजास मृत्यु, रक्तस्राव झाला तर लोकांस विपत्ति ही होतील. तो छेद कृष्णवर्ण, मलिन, अग्निदग्ध, दुर्गंध असा असला तर अशुभ होते ॥६॥

तो छेद श्वेतवर्ण, सर्वत्र सारखा, सुंगधि, स्निग्ध असेल तर शुभकारक होय. हस्तिदंत कापल्याचे जसे फल तसेच दंत गळ्याचे व विवर्ण झाल्याचेही जाणावे ॥७॥

हत्तीच्या दंतमूली देव, मध्यभागी दैत्या, दंताग्री मनुष्य, हे राहतात; यास्तव त्यांचे फल अनुक्रमाने पूर्ण, मध्यम, अल्प असे व शीघ्र, मध्यम, चिरकाळ, असे होते ॥८॥

उजव्या दंतभंगाचे फल - मूळ, मध्य, अग्र यांच्याठाई भंग झाला तर अनुक्रमाने राजा, देश, सैन्य यांचे पलायन होईल. डाव्या दंताचे फळ - मूळ, मध्य, अग्र, यांच्याठाई अनुक्र० पुत्र, पुरोहित, म्हता यांस मृत्यु व अनु० रानटी, स्त्री, मुख्य पुरुष यांचा नाश हे होतात ॥९॥

दोहोही दातांचा भंग एककाळीच होईल तर राजाचा कुलक्षय होईल. शुभग्रहाचे लग्न, शुभतिथि, शुभनक्षत्र इ० असता शुब होते अन्यथा अशुभ होते ॥१०॥

चिकाचा वृक्ष व फले, पुष्पे यानी युक्त वृक्ष अथवा नदीतीर यांस घासण्याने हत्तीचा डावा दात मध्ये मोडेल किंवा फुटेल तर शत्रुनाश होईल. याहून अन्यथा होईल तर शत्रुवृद्धि होते ॥११॥

कावळे बिछान्यावर भस्म, हाडे, केश, पाने ही टाकतील तर पतिवध होईल. मणि, पुष्प, फल इत्यादि बिछान्यावर टाकतील तर पुत्र होईल. तृणकाष्ठादि टाकतील तर कन्या होईल ॥१२॥

कावळ्याचे मुखरेती, धान्य, ओलीमाती, पुष्प, फळ, ओलेगवत इत्यादिकाने भरलेले असेल तर अर्थलाभ होईल. (हे प्रयाणकाळी पहावे असे वाटते) कावळा लोकांच्या सहवासाने भांडी नेईल तर भय होईल ॥१३॥

अश्वादि वाहन, खडगादि शस्त्र, वाहणा, छत्र, छाया, आंग यांचे कुट्ट्न (तुकडे) कावळा करील तर त्यांचे स्वामीस मृत्यु होईल. वाहनादिकांची पुष्पादिकेकरून कावळा पूजा करील तर तत्सवामीचा सत्कार होईल. वाहनादिकांवर विष्ठा करील तर अन्नप्राप्ति होईल ॥१४॥

कावळा जो पदार्थ आणून टाकतो त्याची प्राप्ति होते. जो पदार्थ घेऊन जातो त्याचा नाश होतो. पीत (पिवळे) द्रव्य आणील तर सुवर्णाचा लाभ व त्याचे हरण करील तर त्याचाच नाश होईल. कापूससंबंधी आ० वस्त्र, श्वेतपदार्थ आ० रुपे यांचा लाभ व हरण करील तर नाश होईल ॥१५॥

कावळे, रुवी इ० दुधाचे वृक्ष, अर्जुन, अशोक या वृक्षांवर व नदीच्या दोहों बाजूंच्या तीरांवर वर्षाऋतूत बसून शब्द करतील तर वृष्टि होईल. अन्य ऋतूचा दुर्दिन (अभ्राने आच्छादित) होईल. कावळे धुरळ्यात व जलात वर्षाऋतूत स्नान करतील तर वृष्टि व अन्य ऋतूत दुर्दिन होईल ॥१६॥

कावळा वृक्षाच्या ढोलीत राहून मोठा शब्द करील तर मोठे भय होईल. उदकाकडे पाहून शब्द करील किंवा मेघासारखा शब्द करील तर पर्जन्य पडेल. ॥१७॥

कावळ पाख हालवून सुर्याभिमुख, दु:खित होऊन  वृक्षावर टोकीने बोचील तर अग्निभय होईल. घरावर तांबडे द्रव्य (पदार्थ) किंवा जळके तृण, काष्ठ ठेवील तर अग्निभय होईल ॥१८॥

कावळा पूर्वादि दीप्तदिशांकडे पाहून सूर्याभिमुख असून घरावर बसून शब्द करील तर गृहस्वामीस ही फले होतील (पूर्वेस राजभय, दक्षिणेस चोरभय, पश्चिमेस बंधन, उत्तरेस कलह व आग्नेयादि विदिशांस पशुभय ही होतात) ॥१९॥

कावळा शांत पूर्वादिदिशांकडे पाहून शब्द करील तर राजपुरुषाचे मित्राचे येणे, सुवर्णलाभ, शाल्यन्न व गूळ यांचे भ्जन ही प्राप्त होतील ॥२०॥

कावळा शांत आग्नेयीकडे पाहून शब्द करील तर सुवर्णकारादि अग्निजीवी, स्त्री, श्रेष्ठधातु (सुवर्णादि) यांचा लाभ होतो. दक्षिणेस पा० उडीद, कुळीथ यांचे भोजन व गांधविक (गौडबंगाली) यांच्याशी योग, हे होतील ॥२१॥

कावळा निऋतीस पाहून शब्द करील तर दूत, अश्व, अश्व, उपयोगी भांडी, दही, तेल, मांस भोजन यांची प्राप्ति होईल. पश्चिमेस पा० मांस, मद्य, पान, धान्य, समुद्रांतील रत्ने यांची प्राप्ती होईल ॥२२॥

कावळा वायव्येस पा० शस्त्र (लोह,) खडगादि आयुध, कमल, वेलीची फले (कूष्मांडादि,) भोजन यांची प्राप्ति होते. उत्तरेस पा० क्षीरभक्षण, अश्व, वस्त्र, यांची प्राप्ती होईल ॥२३॥

कावळा ईशानीस पाहून शब्द करील तर घृतपूर्ण (घिवर, अनरसे) यांची प्राप्ती व बैलाचा लाभ ही होतील. गृहाच्या पृष्ठभागी कावळा बसेल तर गृहपतीस असेच फल होईल ॥२४॥

कावळा प्रयाणकाली यात्राकर्त्याच्या कानाबरोबर जाईल तर कल्याण होईल, कार्यसिद्धि होणार नाही. गमनकर्त्याच्या सन्मुख कावळा येऊन शब्द करील तर गमन होणार नाही ॥२५॥

कावळा प्रयाणकर्त्याच्या डाव्या बाजूस प्रथम शब्द करून नंतर उजव्या बाजूस शब्द करील तर द्रव्यहरण होईल. त्याहून विपरीत (उव्या बाजूस प्रथम शब्द करून नंतर डाव्या बाजूस करील तर) अर्थसिद्धि होईल ॥२६॥

गमनकर्त्याच्या डाव्या आंगीच मागून जाऊन वारंवार शब्द करील तर अर्थाची सिद्धि होते. हे फल पूर्वेकडील लोकांस दक्षिणेकडील कावळ्याचे होते ॥२७॥

कावळा गमनकर्त्याच्य सन्मुख येऊन डाव्या आंगी शब्द करील तर गमनास विघ्न करील. ज्यासाठी जावयाचे ते फल तेथेच राहून मिळेल असे सांगतो ॥२८॥

कावळा गमनकर्त्याच्या उजव्या आंगी शब्द करून डाव्या आंगी शब्द करील तर इच्छित अर्थाची  प्राप्ति होईल. कावळा शब्द करून शीघ्र पुढे जाईल तर गमनकर्त्यास पुढे मोठी द्र्व्यप्राप्ति होईल ॥२९॥

कावळा गमनकर्त्याच्या मागे शब्द करून उजव्या आंगाने शीघ्र जाईल तर रक्तस्राव होईल. एक पायावर उभ राहून सूर्याकडे पाहून शब्द करील तर पुढे रक्तस्रावाचे कारण होईल ॥३०॥

कावळा सूर्याकडे पाहून एक पायावर उभा राहून आपल्या पिसांवर तोंडाने रेघा काढील तर पुढे महाजनाचा वध होईल ॥३१॥

कावळा धान्ययुक्त शेतात शांत होऊन शब्द करील तर धान्ययुक्त भूमीची प्राप्ती होईल. सीमांती उद्योगयुक्त कावळा शब्द करील तर गमनकर्त्यास दु:ख होईल ॥३२॥

रखरखीत नव्हत अशी पाने, पल्लव, पुष्पे, फळे यांनीकरून नमलेला, सुगंध, गोड, चिकाळ, अच्छिद्र, चांगला राहिलेला, सुंदर अशा वृक्षावर कावळा असेल तर कार्यसिद्धि होईल ॥३३॥

धान्यपिकलेले शेत, कोमल तृण, गृह, देवालय, गृहपृष्ठ, हिरवाप्रदेश, धान्य, उंचप्रदेश, शुभस्थान यांच्याठाई कावळा शब्द करील तर द्रव्यप्राप्ती होईल ॥३४॥

गाईच्या पुच्छावर किंवा वारुळावर कावळा बसेल तर सर्पाचे दर्शन होईल. महिषावर बसून शब्द करील तर तत्काल ज्वर होईल. झुडपावर बसून शब्द करील तर शुभाशुभफल स्वल्प होते ॥३५॥

गमनकर्त्याच्या डाव्या आंगी गवताच्या गंजीवर अथवा हाडांवर कावळा बसून शब्द करील तर कार्यनाश होईल. जळलेल्या किंवा वीज पडलेल्या वृक्षावर बसून कावळा शब्द करील तर वध  होतो ॥३६॥

काटयांच्या ‘वृक्षांनी युक्त शुभवृक्षावर कावळा शब्द करील तर कार्यसिद्धि व कलह होतील. केवळ कंटकिवृक्षावर बसून श० कलह होईल. वेलींनी वेष्टित वृक्षावर बसून शब्द करील तर बंधन होईल ॥३७॥

कावळा शेंडा मोडलेल्या झाडावर बसेल तर अंगच्छेदन, शुष्र्क वृक्षावर बसेल तर कलह, गमनकर्त्याच्या मागे किंवा पुढे गोमयावर बसेल तर धनप्राप्ति होईल. ॥३८॥

कावळा मृतपुरुषाच्या अंगाच्या अवयवावर बसून शब्द करील तर मृत्युभय होते. चंचूने हाड फोडून्शब्द करील तर गमनकर्त्याच्या हाडांचा भंग हातो ॥३९॥

कावळा दोरी, हाड, काष्ठ, काटा, असार, (सत्त्व नाही असा पदार्थ) केस हे मुखात घेऊन शब्द करील तर अनुक्रमाने सर्प, रोग, डुकरादि दंष्ट्री, चोर, शस्त्र, अग्नि, यांचे भय होईल. ( दोर तोंडात घेईल तर सर्पभय, हाड घेईल तर रोगभय इ०) ॥४०॥

कावळा पांढरे पुष्प, अशुद्ध पदार्थ, मांस ही मुखात घेऊन शब्द करील तर गमनकर्त्याची यथेच्छ सिद्धि होईल. पाख हालवून वर तोंड करून वारंवार शब्द करील तर गमनकर्त्यास विघ्न होईल ॥४१॥

कावळा बेडी, चामडयची दोरी, वेल ही मुखात घेऊन शब्द करील तर बंध होतो. दगडावर बसून शब्द करील तर भय व क्लेशयुक्त, अपूर्व, अशा मार्गस्थाचा योग हे होतात ॥४२॥

कावळे अन्योन्यांच्या मुखांत भक्ष्यपदार्थ घालीत असले तर गमनकर्त्यास उत्तम संतोष होतो.  स्त्रीपुरुष कावळे एककाली शब्द करतील तर स्त्रीलाभ होईल. ॥४३॥

स्त्रीच्या मस्तकावर राहिलेल्या पूर्णकुंभावर कावळा बसेल तर स्त्री व द्रव्य यांची प्राप्ति गमनकर्त्यास होईल कावळा घागरीस ताडण करील तर पुत्रास दु:ख होईल. घागरीत कावळा विष्ठा करील तर भोजनप्राप्ति होईल ॥४४॥

रावटीमध्ये प्रवेशसमयी चंचलपक्षी कावळा शब्द करील तर अन्यस्थानास जाणे सुचवितो. निश्चलपक्ष शब्द करील तर भयमात्र सुचवितो ॥४५॥

गिधाड व कंक (पक्षिवि०, यांच्या पक्षांच बाणास पिसारे करितात) यांनी युक्त कावळे सैन्य, नगर, गाव यांत प्रवेश करतील व त्यांचा विरोध नसेल तर शत्रूची प्रीति होईल; आणि विरोध असेल तर युद्ध होईल ॥४६॥

कावळा डुकरावर बसेल तर बंधन होईल. चिखलाने भरलेल्या डुकरावर बसेल तर द्रव्यप्राप्ति होईल. द्विक म्ह० कावळा, गाढव व उंट यांवर बसेल तर कल्याण होईल. गाढवावर बसला तर वध होईल असे कोणी म्हणतात ॥४७॥

कावळा घोडयावर बसून शब्द करील तर वाहनांचा लाभ होईल. गमनकर्त्याच्या मागून कावळा शब्द करीत जाईल तर रक्तपतन होईल. मागून जाणारे अन्यपक्ष्यांचेही फल गमनकर्त्यास कावळ्यासारखेच जाणावे ॥४८॥

३२ कोष्टकांचे चक्रात जसे फल सांगितले तसेच काकशब्दाचे फल गमनकर्त्यास होते ॥४९॥

कावळा आपल्या घरटयावर राहून, का, असा शब्द करील तर तो शब्द निष्फल (त्याचे शुभाशुभ फल नाही.) कव, असा शब्द स्वप्रीतीने करतो. क असा शब्द करील तर प्रियमित्राची प्राप्ती होईल ॥५०॥

कर, असा श० कलह, कुरुकुरु, असा श० आनंद, कटकट, असा श० दहीभाताचे भोजन, केले किंवा कुकु असे शब्द करील तर गमनकर्त्यास धनलाभ होईल ॥५१॥

कावळा, खरेखरे, असा शब्द करील तर मार्गस्थ येईल. कखाख, असा श० गमनकर्त्यास मृत्यु होईल. आ, असा श० जाणे बंद होईल. खलखल, असा श० तत्काल वृष्टि होईल ॥५२॥

काका, असा श० नाश होईल. काकटि, असा श) विषादिकाने अन्न दूषित असे सांगतो. कवकव, असा श० स्नेहस्थानप्राप्ति. कगाकु, असा दा० बंधन होईल ॥५३॥

कावळा, करकौ, असा शब्द करील तर पर्जन्यवृष्टि होईल. गुडवत, असा श० भय होईल. वड, असा श० वस्त्रप्राप्ति होईल. कलय, असा श० करील तर शुद्राची ब्राम्हाणांशी भेट होईल ॥५४॥

कावळा, फड, असा शब्द करील तर फळप्राप्ती व फळे येणाराचे दर्शन ही होतात. दड, असा श० प्रहार (युद्ध) होईल. स्त्री, असा शब्द० स्त्रीप्राप्ती होईल. गड, असा श० गाईची प्राप्ती. पुड, असा श० पुष्पांची प्राप्ती होईल ॥५५॥

कावळा, टाकुटाकु, असा शब्द० युद्ध होते. गुहु, असा श० अग्निभय, कटेकटे, असा श० कलह होतो. टाकुलि, चिटिचि, केकेके, पुरेच, असे शब्द करील तर अशुभ होत ॥५६॥

वर कावळ्याविषयी जे फळ सांगितले. तेच फळ, दोन, तीन, चार कावळ्यांनी शब्द वगैरे केले तर जाणावे. जे कावळ्याचे फळ तेच येथे न सांगितलेल्या पक्ष्याचे फळ जाणावे. वन्य पशूंचे फल कुत्र्यासारखे जाणावे व वर दाढांचे डुकर इ० पशूंचेही फळ कुत्र्यासारखे जाणावे ॥५७॥

वर्षाकाळी जमिनीवरील प्राणी बकरे वगैरे पाण्यात जातील व पाण्यातील प्राणी मासे वगैरे जमिनीवर येतील तर बहुत वृष्टि होईल. अन्यकाळी भय होईल. मधमाशांचे पोळे घरावर बसेल तर ते घर मनुष्यरहित होईल. ती माशी मस्तकी नीळवर्ण असेल तर प्राण्यांस मृत्युही करील ॥५८॥

मुंग्या आंडी उदकामध्ये ठेवतील तर वृष्टि बंद होईल असे सांगतात. सखल भूमीपासून वृक्षावर किंवा उंच प्रदेशावर नेतील तर वृष्टि होईल असे त्या सांगतात ॥५९॥

पहिल्या शकुनावरून यात्रेचे शुभाशुभफल पहावे. निघाल्यावर मध्ये जो शकुन होईल त्याचे फल त्याच दिवशी जाणावे. या अध्यायामध्ये सांगितलेले जे शकुन ते सर्वकाल पाहावे. सर्व कार्यांचा प्रारंभ, यात्रा, गृहप्रवेश इत्यादिकांच्याठाई सर्व शकुन पहावे. शिंका कोणत्याही कर्मी शुभ नव्हे असे सांगतात ॥६०॥

शुभशकुन झाले तर दशेचे फल, निर्विघ्न कार्यसिद्धि, मूलस्थानाचे पालन, मार्गामध्ये सहाय, इच्छितकार्यसिद्धि, नीरोगत्व, ही फळे लोकांचा सत्कार करणार्‍या राजास होतात असे सांगतात ॥६१॥

कोसापुढे पक्ष्यांचा शब्द निष्फल (व्यर्थ) असे कश्यपादि कोणी ऋषि म्हणतात. राजाने पहिला अपशकुन झाला तर आवश्यक कार्याच्याठाई ११ प्राणायाम करावे नंतर जावे. दुसरा अपशकुन झाला तर १६ प्राणायाम करून प्रयाण करावे. तिसरा झाला तर परत स्वगृहास यावे (राजास सांगितले ते सर्वांनी करावे) ॥६२॥


॥ इतिसर्वशाकुनेवायसरुतंनामदशमोध्याय: ॥१०॥

॥ इतिश्रीवरा०बृहत्सं० पंचनवतितमोध्याय: ॥९४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP