मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय ८९

बृहत्संहिता - अध्याय ८९

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


मनुष्य, अश्व, हत्ती, कुंभ, खोगीर, रुवी इ० क्षीरवृक्ष, इटांची राशि, छत्र, शय्या, आसन, उखळ, ध्वज, चंवरी, दूर्वादि हरिततृण, पुष्पयुक्तस्थान, यांच्याठाई; कुत्रा मुतून गमनकर्त्याच्यापुढे जाईल तर कार्यसिद्धि होईल. ओल्या शेणावर मुतेल तर मिष्टान्नप्राप्ति होईल. शुष्क गोमयावर मुंतेल तर शुष्कान्न अथवा गूळ, मोदक यांची प्राप्ती होईल ।

विषावृक्ष, काटयांचा वृक्ष, काष्ठ, दगड, शुष्कवृक्ष, हाडे, श्मशान, यांच्याठाई कुत्रा मुतून गमनकर्त्याच्यापुढे जाईल तर कार्यसिद्धि होईल. ओल्या शेणावर मुतेल तर मिष्टान्नप्राप्ति होईल. शुष्क गोमयावर मुतेल तर शुष्कान्न अथवा गूळ, मोदक यांची प्राप्ती होईल ।

विषवृक्ष, काटयांचा वृक्ष, काष्ठ, दगड, शुष्कवृक्ष, हाडे, श्मशान, यांच्याठई कुत्र मुतून अथवा पायाने ताडन करून गमनकर्त्याच्या पुढे जाईल अर अशुभ होईल. बिछाना, कुंभाराने केलेली मातीची भांडी, लाकडांचीभांडी, नवी व फुटलेली नाही अशांवर कुत्र्रा मुतेल तर कन्या दोष करील. ती भांडी भुक्त असतील तर स्त्रीस दोष होतो. तसेच उपानत् (वाहणा, जोडा इ०)  यांचेही फल भांडयांसारखेच जाणावे. गाईच्या तर मुतण्याने, वर्णसंकर, त्याच्या गृही होतो ॥

कुत्रा उपानह मुखात घेऊन गमनकर्त्याच्या पुढे येईल तर कार्यसिद्धि होईल. मुखात मांस घेऊन येईल तर द्रव्यप्राप्ति, ओले हाड घेऊ० अशुभ, जळके लाकूड अथवा शुष्क हाड घेऊ० मृत्यु, अग्निरहित जळके लाकूड घेऊ० घात होईल. पुरुषाचे डोके किंवा हात, पया इ० मुखामध्ये घेऊन ये० भूमिलाभ, वस्त्र व वल्कल ही घेऊ० विपत्ति, सवस्त्र कुत्रा आला तर शुभ असे कोणी ऋषि म्हणतात. शुष्क हाड मुखात घेऊन गृहामध्ये प्रवेश करील तर गृहपतीस मृत्यु होईल. बंधन होईल. पाय चोळील, कान कापवील, आंगावर चढेल तर गमनकर्त्यास विघ्न होईल. गमनकर्त्याबरोबर विरोध करील तर मार्गामध्ये रोध होईल. कुत्रा आपले आंग खाजवील तर चोरादिकांनी मार्गरोध होईल. कुत्रा निजून वर पाय करील तर सर्वकाल अशुभ होय ॥१॥

सूर्योदयी सूर्याकडे मुख करून गावाच्या मध्यभागी जर कुत्रा एकटा किंवा बहुत कुत्रे एकत्र मिळून रोदनशब्द करतील तर लवकरच देशाधिपति दुसरा होईल असे सांगतात ॥२॥

कुत्रा सूर्योदयी आग्नेयीकडे राहून सूर्याभिमुख रोदनशब्द करील तर चोर व अग्नि यांचे भय शीघ्र होईल. मध्यान्ही अग्नि व मृत्यु हे होतील. अपराण्ही अपराण्ही रक्तस्रावयुक्त कलह (युद्ध) होईल असे सांगतो ॥३॥

कुत्रा सूर्यास्ती सूर्याभिमुख रोदनशब्द करील तर शेतीलोकांस शीघ्र भय होईल. प्रदोषकाळी वायव्यदिशेकडे मुख करून करून रोदनशब्द करील तर वायु व चोर यांचे भय होईल ॥४॥

कुत्रे, गवताचा गंज, देवालय, मुख्यगृह यांवर राहून उच्चस्वराने रोदनशब्द वर्षाकाली करतील तर महान वृष्टि होईल. अन्यऋतूंत करतील तर मृत्यु, अग्नि, रोग यांचे भय होईल ॥६॥

कुत्रे, वर्षाकाळी अवर्षण (वृष्टि बंद झाली) असता पाण्यात राहून बाजूनी सभोवते वारंवार फिरतील, पाणी हालिवतील व पितील तर १२ दिवसांत पर्जन्य पडेल ॥७॥

कुत्रा गृहद्वारामध्ये (आत) तोंड घालून बाहेर शरीर ठेवून गृहपतीच्या स्त्रीकडे पाहून रोदनशब्द करील तर त्या स्त्रीस रोग होईल. कुत्रा घरात राहून बाहेर तोंड करील आणि गृह० स्त्रीस पाहील तर ती स्त्री जारिणी आहे असे सांगतो ॥८॥

कुत्रा, घराचा कूड (भिंत) उकरील तर खानक (उंदीर, चोर, डुकर) यांचे भय होईल. गोठा उकरील तर गाईचे हरण होईल. धान्यभूमि उकरील तर धान्यप्राप्ती होईल ॥९॥

कुत्रा एका डोळ्यातून पाणी येत असून दीनद्दष्टि व अल्पाहार असा जर होईल तर त्या गृहास दु:खकारक होतो. गाईंबरोबर खेळेल तर सुभिक्ष, कल्याण, आरोग्या व हर्ष यांते देतो ॥१०॥

कुत्रा, गमनकर्त्याचा डावा गुडघा हुंगील तर द्रव्यप्राप्ति होईल. उजवा हुंगील तर स्त्रियांबरोबर विरोध होईल. डाविई मांडी हुंगील तर द्रव्यप्राप्ति होऊन इंद्रियसुख भोगील. उजवी मांडी हुंगील तर इष्टमित्रांबरोबर विरोध होईल ॥११॥

कुत्रा, गमनकर्त्याचे पाय हुंगील तर जाणे होणार नाही व तेथेच राहून इच्छितद्रव्यप्राप्ति सांगतो. स्थानावर गमनकर्ता असता, त्याच्या वाहणा किंवा जोडे हुंगील तर शीघ्र गमन होईल ॥१२॥

कुत्रा गमनकर्त्याचे दोनही बाहू हुंगील तर शत्रु, चोर यांचे भय होते. अपूपादि भक्ष्यपदार्थ अथवा मांस, हाडे ही भस्मामध्ये लपवून ठेवील तर लवकरच अग्निभय होईल ॥१३॥

कुत्रे गांवात शब्द करून बाहेर श्मशानात शब्द करतील तर मुख्यपुरुषाचा नाश  होईल. कुत्रा गमनकर्त्याच्या सन्मुख जर शब्द करील तर यात्रेचा रोध (प्रतिबंधा) होतो ॥१४॥

कुत्रा उ या वर्णाने शब्द करील तर अर्थसिद्धि, ओ याने शब्द करील तर डाव्या बाजूस अर्थसिद्धि होईल. औ अशा शब्दाने रोद० तर चित्त व्याकुल होईल. पूर्वोक्तांतून कोणताहि शब्द गमनकर्त्याच्या मागे, कुत्रा करील तर, यात्रेचा निषेध जाणावा ॥१५॥

कुत्रे वारंवार उच्चस्वराने खंख असा शब्द करतील अथवा दांडयाने मारल्यासारखे, दीनशब्द करतील अथवा मंडलावर धावतील, तर ते, नगर शून्य करतील व मृत्युभयही करतीला ॥१६॥

कुत्रा, दांत दाखवून, ओष्ठप्रांत चाटील तर, मिष्टान्नप्राप्ति होईल असे शकुनशास्त्रज्ञ सांगतात. मुखच चाटील, ओष्ठप्रांत चाटीत नाही, तर भोजन प्रवृत्त असताही, अन्नास विघ्न होईल ॥१७॥

कुत्रे गावाच्या अथवा नगराच्या मध्ये एकत्र मिळून, वारंवार शब्द करतील तर, गांवाच्या किंवा नगराच्या स्वामीस क्लेश होईल. अरण्यातील कुत्र्याचे फळ मृगासारखे (अ० ९१) पहावे ॥१८॥

कुत्रा वृक्षाजवळ राहून ओरडेल तर वृष्टि होईल. द्वाराच्या खिळीजवळ राहून ओरडेल तर प्रधानास पीडा होईल ॥१९॥

घराच्या वायव्य कोनात ओरडेल तर धान्यनाश होईल. नगरद्वारी राहून ओरडेल तर नगरास पीडा होईल. बिछान्यावर राहून ओरडेल तर बिछान्याच्या धन्यास भय होते. प्रयाणकाली मागे भोकेल तर भय होईल. जनसमुदायाच्या डाव्या बाजूस शब्द करतील तर शत्रूंचे भय होईल असे सांगतात ॥२०॥


॥ इतिसर्वशाकुनेश्वचक्रंनामाध्यायश्चतुर्थ: ॥४॥

॥ इतिश्रीवरा०बृहत्संहितायामेकोननवतितमोध्याय: ॥८९॥

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP