मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय ६६

बृहत्संहिता - अध्याय ६६

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


मान व अक्षिकूट (द्दष्टीचा आश्रय नेत्रगोल) ही लांब, कटिभाग व ह्रदय ही मोठी विस्तीर्ण, तालु, ओष्ठ व जिव्हा ही तांबडी; कातडी, केश व पुच्छकेश ही सूक्ष्म (पातळ, मृदु, बारीक,) पाय, गमन, मुख ही सुंदर; कान, ओष्ठ, पुच्छ ही आखूड, पोटर्‍या, गुडघे, मांडया ही वर्तुळ; समसंख्य व पांढरे दात, आकार व शरीरशोभा रमणीय, असा सर्वांगी शुद्ध घोडा, राजास नित्य शत्रुनाशार्थ होतो ॥१॥

अश्रु (नेत्रोदक) पतनस्थान, हनवटी, गाल, ह्रदय, गळा, प्रोथ (मुखप्रांत,) कानाजवळचे शंख, कमर, नाभीच्याखालचा व शिश्नाच्यावरच भाग, गुडघे, वृषण, नाभि, कुकुदावर (बैलास कोळे असते त्यास्थानी,) गुद, डावी कूस, पाय, या अवयवांचाठाई भोवरे घोडयास असले तर तो घोडा अशुभकारक होतो ॥२॥

प्रपाण (उत्तरोष्ठतल,) गळा, कान, पाठीचा मध्यभाग, नेत्रांचा वरचा भाग (भिवया,) ओठ, मांडया, भुज, वामकुक्षि, पार्श्वभाग, ललाट, यांच्याठाई जे भोवरे ते फार चांगले (शुभ फळ देणारे) होते ॥३॥

त्या भोवर्‍यांमध्ये १० ध्रुवावर्त त्यांची स्थाने - १ प्रपाणी, १ ललाटकेशी, २ रंध्री (कुक्षि व नाभि यांच्या मध्यभागी,) २ उपरध्री (कुक्षि व नाभि यांच्या वरच्या भागी,) २ मस्तकी २ उरस्थली, या प्रमाणे १० ध्रुवावर्त सांगतले आहेत ॥४॥

घोडय़ांच्या खालच्या दातांत दोन दाढांच्या मध्ये सहा दात स्पष्ट आहेत; ते सहा दात पांढरे असतील तर तो घोडा एक वर्षाचा, काळेतांबडे अस० तर २ वर्षाचा, (दोन दंतपंक्तींमध्ये सममध्यभागी जे दोन दात ते सदंश, सदंशांच्या दोन बाजूंचे २ मध्यम, मध्यमांच्या बाजूंचे २ अंत्य) सदंश पाडून दुसरे आले असलें तर ३ वर्षांचा, मध्यम प० ४ वर्षांचा, अंत्य प० ५ वर्षांचा, सदंश काळे असतील तर ६ वर्षांचा, मध्वमका० अंत्य पि० ११ व०, सं० पांढरे अ० १२ व०, मध्य० पा० १३, अंत्य पा० १४, सं० काचवर्ण अ० १५, मध्यम का० १६, अ० का० १७, सदंश मधासारखे अ० १८, म० १९, अं० २०, सं० शंखासारख्या आकाराचे अ० का० १७, सदंश मधासारखे अ० १८, म० १९, अं० २०, सं० शंखासारख्या आकाराचे अ०  २१, म० २२, अं० २३ तं० सच्छिद्र० अ० २४, मध्य० २५, अंत्य० २६, सं० हालत अ० २७, म० २८, अंत्य २९, सं० पडले अ० ३०, म० ३१, अं० ३२, याप्रकारे एकापासून ३२ घोंडच्या वयाची वर्षे दातांवरून जाणावी ॥५॥


॥ इतिबृहत्संहितायांअश्वलक्षणंनामषटषष्टितमोध्याय: ॥६६॥

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP