मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय १९

बृहत्संहिता - अध्याय १९

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


(हे दोन्ही श्लोक मूळग्रंथात नाहीत; परंतु त्यांतील अर्थाची गरज पुढील मूळ श्लोकांतील अर्थास आहे म्हणून टीकेतून घेतले आहेत. त्या दोन्ही श्लोकांचा क्षिप्त अर्थ - चैत्रशुद्ध प्रतिपदेस ज्या ग्रहाचा वार असेल तो ग्रह वर्षाधिपति होय. याचप्रमाणे कोणत्याही महिन्याचे शुक्लप्रतिप्रदेस ज्याचा वार असेल तो मासाधिपति होय.)

सूर्याचे वर्ष. वर, महिना यांमध्ये पुढे सांगितल्याप्रमाणे फले होतील. सर्व देशांमध्ये भूमि स्वल्पधान्ययुक्त होईल. अरण्ये दैवहतांस भक्षण करावयास इच्छिणार्‍या दष्ट्री (सर्प, वृकु, वराहादि) यांही व्याप्त होतील. नद्यांतून बहुत उदक वाहणार नाही. अत्युक्तामही औषधांनी गेगशांति होणार नाही. थंडीच्या दिवसांतही सूर्यतेज अधिक होईल. पर्वतासारखे (मोठे) मेघही अतिवृष्टि करणार नाहीत. नक्षत्रे व चंद्र हे नष्टकांति होतील. तपस्वी व गाई ही दु:ख पावतील. हत्ती, घोडे, पायदळ हे ज्यामध्ये आहेत अशा पराक्रमी सैन्याने युक्त व धनुष्य. तरवार. मुसल यांते धारण करणारे असे राजे. राजसेवकांनी युद्धामध्ये जिंकले जातील व ते अनेक देशांप्रत फिरतील. ही फले होतील ॥१॥२॥३॥

चंद्राचा संवत्सर प्रवृत्त झाला असता, गमन करणारे व पर्वतासारखे मोठे सर्प, कज्जल, भ्रमर, गव्हयाचे शॄंग यांच्या कांतीसारखे (काळे) अशा मेघांनी आकाश व्याप्त होऊन, ते मेघ स्वच्छ उदकांनी सर्व भूमि पूर्ण करतील व दु:सह अशा मोठया शब्दाने दिशा पूर्ण करतील ॥४॥

पद्मे (दिवसा फुलणारी,) कुमुदे (रात्री फुलणारी) यांणी युक्त उदके होतील. प्रफुल्लित वृक्ष व भ्रमरांचे शब्द यांनी उपवने (बाग) युक्त होतील. गाई बहुत दुध देतील. सुंदर स्त्रिया सुरतक्रीडांही कामी पतीस रमवितील ॥५॥

गोधूम, शाली, यव, उत्तमधान्ये व उसांचे फड, नगरे, द्रव्याच्या खाणी यांही युक्त अशी; यज्ञस्थानांनी चिन्हित महान यज्ञ व पुत्रकाम्यादि इष्टि यांमध्ये जो वेदध्वनि तेणेकरून युक्त, अशा भूमीचे राजे पालन करतील म्हणजे धान्ये, नगरे, द्रव्यखाणी, यज्ञ, महान वेदध्वनि ही भूमीवर होतील ॥६॥

भौमाच्यावर्षी, मासी, दिवसी, पुढील फळे होतात. वार्‍याने पेटविलेला फार भयंकर अग्नि, गांव, नगरे यांते जाळीत फिरतो. चोरांच्या समुदायांने पीडित, निर्धन झालेले, गाई इत्यादि पशुरहित झालेले, असे मनुष्यसमुदाय पृथ्वीवर हाहा: कार करितील ॥७॥

आकाशामध्ये उभारलेले, संहतमूर्ति (दाट) असेही मेघ कोठेही बहुत उदक देणार नाहीत. जलप्रवेशमार्गीं अथवा नदी व्या तीरी झालेलेही धान्य शुष्क होईल.  अथवा झलेले धान्य अन्यपुरुष अन्यायाने हरण करतील ॥८॥

राजे धर्माने पालन करणार नाहीत. पित्तापासून रोग उत्पन्न होतील. सर्पांपासून लोकांस पीडा होईल. या प्रकारांनी प्रजा नष्ट होईल व धान्यरहितही होईल ॥९॥

बुधाचा संवत्सर, मास, दिवस, प्राप्त असता, मायावी (प्रपंचकुशल,) चमत्कार दाखविणारे, दांभिक, द्रव्योत्पत्तिस्थानकुशल, नगरवासी, गायन जाणणारे, चित्रे काढणारे, गणित जाणणारे, शस्त्रवेत्ते, यांची वृद्धि होते. राजे, संतोष उत्पन्न होण्याकरित परस्परास संतोषजनक असे आश्चर्यकारक पदार्थ देतील ॥१०॥

लोकांमध्ये वेद पठन करतील.) मनुसारखी उत्तम दंडनीति होईल. ईश्वराकडे बुद्धि लावणारे असेही कांही लोक होतील. आन्वीक्षिकी (तर्कविद्या) इचेठाई बुद्धि घालून परपद (मोक्ष) इच्छितील ॥११॥

हास्यज्ञ, दूत, कवि, बाल, नपुंसक, युक्तिवेत्ते, सेतु, जल, पर्वत, यांवर रहाणारे यांस सुक होईल. भूमीवर औषधींची वृद्धि होईल ॥१२॥

बृहस्पतीचा शुभसंवत्सर, मास, दिवस, प्राप्त झाला असता, यज्ञामध्ये ब्राम्हाणांनी उच्चारित जो मोठा शब्द (वेदध्वनि, तो, यज्ञाचा विध्वंस करणारे जे राक्षस त्यांच्या मनाचे भेदन करितहोत्साता व देवांच्या ह्रदयांत आनंद करित होत्साता, अनिश म्ह. दिवसास स्वर्गाप्रत जातो ॥१३॥

उत्तमधान्ययुक्त, बहुत गज, पायदळ, घोडे, धन, गाईंचे समुदाय यांही युक्त राजानी उत्तम पालनाने वाढिवलेली व देवांबरोबर स्पर्धा करणार्‍य नानाप्रकारच्या मोठया मेघांनी आकाश व्याप्त होईल. पृथ्वी बहुत धान्ये व उत्तम संपत्ति यांनी युक्त होईल ॥१५॥

शुक्राचे वर्ष, मास, दिवस, प्रवृत्त झाले असता, धान्ये व ऊस यांनी युक्त अशी, पर्ततांसारख्या मेघांनी सोडलेल्या उदकाने पूर्ण आहेत सर्व प्रदेश जीचे अशी, शोभायुक्त कमलांनी व बहुत उदकांनी युक्त अशा तळ्यांनी व्याप्त अशी पृथ्वी, नूतन अलंकारांनी तेजयुक्त आहे अंग जीचे अशा स्त्रीचेपरी, शोभते ॥१६॥

नाश केला आहे बलिष्ठ शत्रूंचा ज्याणे असे व उच्चारित मोठया जयशब्दाने शोभविल्या आहेत दिश ज्याणे असे क्षत्र (क्षत्रियकुल) होईल. राजे, शिष्टांस आनंद व दुष्टांचा नाश यांनी युक्त अशी नगरे आकर (रत्नखाणी) यांनी युक्त अशी भूमि, इचे पालन करतील ॥१७॥

लोकांनी वसंतऋतूमध्ये स्त्रियांसहवर्तमान पुष्पारस किंवा मद्य वारंवार प्राशन करिजेते होतील. लोक, वेणु, वीणा यांनीयुक्त व कानांस गोड असे गायन करितात. कामाचा जयशब्द लोकांमध्ये होतो. (अत्यंत कामासक्त प्रजा होतात.) ॥१८॥

शनैश्वराचे वर्ष, मास,  दिवस हे प्रवृत्त झाले असता, उद्वृ चोरांच्या समुदायांनीं व बहुत युद्धांनी युक्त, अनेक पशु व द्रव्ये यांनी रहित, युद्धामध्ये मेले जे बंधु त्यांचा शोक करणार्‍या लोकांनी युक्त, क्षुधा व बहुत रोग यांनी व्याप्त; अशी राष्ट्रे होतील ॥१९॥

वायूने कंपित अशा मेघांनी रहित आकाश होईल. पृथ्वीवर बहुत वृक्ष मोडतील. आकाश बहुत धुळीचे आच्छादित होऊन चंद्रसूर्यकिरण दिसणार नाहीत. तळी, विहिरी यांचे पाणी आटेल. नद्याही बारीक (अल्प उदकांच्या) होतील ॥२०॥

इंद्र अल्पवृष्टि करीत असता धान्ये कोठे कोठे झाली तथापि ती उदक थोडे यास्तव नाश पावतात व कदाचित उदक शिंपले तर उन्हाळ्याची धान्ये चांगली होतात. याप्रमाणे शनैश्वराच्या वर्षामध्ये होते ॥२१॥

जो ग्रह, बारील झालेला, अस्पष्टकिरण, नीचराशिगत व अन्यग्रहांनी युद्धांत जिंकलेला असा जो त्याचे शुभफल असले तरी तो सर्व शुभफल देणारा होत नाही. याहून अन्यप्रकाराचा ग्रह असला म्हणजे शुभफल देतो. अशुभ ग्रहाच्या वर्षामध्ये अशुभग्रहाचेच मासफल येईल, तर फारच अशुभफल होते. असेच, वर्षपति व मासपति या दोघांचेही शुभफल असेल तर मासफल वृद्धिंगत होते आणि एकाचे शुभ व दुसर्‍याचे अशुभ असेल तर शुभ किंवा अशुभ फल स्वल्प होते ॥२२॥


॥ इतिबृहत्संहितायांग्रहर्वफलमेकोनविंशोध्याय: ॥१९॥

N/A

References : N/A
Last Updated : February 19, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP