मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय १०२

बृहत्संहिता - अध्याय १०२

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


अश्विनी, भरणी, कृत्तिकेचा प्रथमपाद अशी मेषराशि होते. कृतिकांचे तीन चरण, रोहिणी, मृगशीर्षाचे पूर्वार्ध अशी वृषभराशि होते ॥१॥

मृगशीर्षाचे उत्तरार्ध, आर्द्रा, पुनर्वसूचे प्रथम तीन चरण अशी मिथुनराशि होते. पुनर्वसूचा अंत्यचरण, पुष्य, आश्लेषा, कर्कराशि होते ॥२॥

मघा, पूर्वा, उत्तरांचा प्रथमचरण, सिंहराशि होते. उत्तरांचे तीन चरण, हस्त, चित्रांचे प्रथमार्ध, कन्याराशि होते ॥३॥

चित्राचे अंत्यार्ध, स्वाति, विशाखांचे प्रथम तीन चरण, तुळाराशि होते. विशाखांचा अंत्यचरण, अनुराधा, जेष्ठा वृश्चिकराशि होते ॥४॥

मूळ, पू० षा०, उत्तराषाढांचा प्रथमचरण, धनराशि होते. उत्तराषाढांचे अंत्य तीन चरण, श्रवण, धनिष्ठांचे पूर्वार्ध, कमरराशि होते ॥५॥

विवा० षष्ठस्थानी शनि, सूर्य, राहू, गुरु, गुरु, मंगळ यातून असेल तर सुभगा व सासु सासरा इत्यादिकांची भक्त अशी कन्या होते. चंद्र अ० विधवा, शुक्रा अ० दरिद्रा, बुध अ० सधना न कलहप्रिया अशी कन्या होते ॥६॥

वि० ल० पासून सप्तमस्थानी शनि, मंगळ, गुरु, बुध, राहु, सूर्य, चंद्र, शुक्र हे ग्रह असले तर अनुक्रमाने वैधव्य, बंधन, वध, नाश, अर्थनाश, रोग, प्रवास, मरण, शनि अ० भयंकर रोग, चंद्र अ० कन्याप्रसूति, ही फले होतात ॥५॥

विवा० षष्ठस्थानी शनि, सूर्य, राहु, गुरु, मंगळ यातून असेल तर सुभगा व सासु सासरा इत्यादिकांची भक्त अशी कन्या होते. चंद्र अ० विधवा, सुक्र अ० दरिद्रा, बुध अ० सधना व कलहप्रिया अशी कन्या होते ॥६॥

वि० ल० पासून सप्तमस्थानी शनि, मंगळ, गुरु, बुध, राहु, सूर्य, चंद्र, शुक्र हे ग्रह असले तर अनुक्रमाने वैधव्य, बंधन, वध, नाश, अर्थनाश, रोग, प्रवास, मरण ही फले होतात ॥७॥

विवा० अष्टमस्थानी गुरु किंवा बुध असेल तर निरंतर स्त्रीपुरुषांचा वियोग होतो. चंद्र, शुक्र, राहु, यांतून असेल तर मृत्यु होतो. सूर्य असेल तर सौभाग्यवती, मंगळ अ० रोगयुक्त, शनि अ० धनवती व पतिप्रिय अशी होते ॥८॥

विवाह० नवमस्थानी शुक्र, सूर्य, मंगळ, गुरु यांतून असेल तर धर्मपर, बुध अ० रोगरहित, राहु किंवा शनि असेल तर वंध्य, चंद्र अ० कन्याप्रसूति व भ्रमणशील अशी होते ॥९॥

विवा० द्शमस्थानी राहु असेल तर विधवा, सूर्य किंवा शनि अ० पापपर, मंगळ अ० मृत्यु, चंद्र अ० द्रव्यरहित व कुलटा (जारिणी,) शेष राहिलेले ग्रह (बुध, गुरु, शुक्र) असतील तर धनवती व सुभगा अशी कन्या होते ॥१०॥

विवा० एकादशस्थानी सूर्य असे० बहुपुत्रवती, चंद्र अ० धनयुक्त, मंगळ अ० पुत्रयुक्त, शनि अ० धनयुक्त, गुरु अ० चिरंजीवी, बुध अ० धनयुक्त, राहु अ० अविधवा, शुक्र अ० द्रव्ययुक्त अशी कन्या होते ॥११॥

विवा० द्वादशस्थानी गुरु असे० धनयुक्त, सूर्य अ० दरिद्री, चंद्र अ० द्रव्यनाश करणारी, राहु अ० जारिणी, शुक्र अ० पतिव्रता, बुध अ० बहुत पुत्र पौत्र यांनी युक्त, शनि किंवा मंगळ यांतून असेल तर मद्यपानरत अशी कन्या होते ॥१२॥

गाई राखणारांनी काठीने ताडितज्या गाई त्यांच्या खुराग्रांनी विदारितजी सायंकाली धूलि ती (तो गोधूलि मुहूर्त) कन्यांच्या विवाही बहुतधन, पुत्र, आरोग्य, सौभाग्य याते करते. त्या गोधूलिमुहूर्ती विवाहोक्त नक्षत्र, तिथि, करण, लग्न, योग,  ही पाहू नये. तो मुहूर्त पुरुषांच्या सुखार्थ सांगितला आहे. त्या मुहूर्ती उत्पन्न झालेले गोरज दोषांना, शमविते ॥१३॥


॥ इतिश्रीवराहमिहिरकृतौबृहत्संहितायांविवाह्पटलंनामत्र्युत्तरशततमोध्याय: ॥१०२॥

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP