मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
अलभ्याचा हा लाभ थोर जाला ...

श्री गुरूंचे पद - अलभ्याचा हा लाभ थोर जाला ...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


अलभ्याचा हा लाभ थोर जाला । विश्वजनासी उपेगा आला ।
कीर्तिरूपें चि३ विस्तारला । दाही दिशा भरोनि पुरवला । गे बाईचे ॥१॥
स्वामी तो आठवे मनीं । नित्य बोलतां चालतां जनीं ।
स्वप्न सुषुप्ती जागृति मौनी । खंड नाहीं च अखंद ध्यानीं । ग बाईचे ॥ध्रु.॥
भक्ति प्रेमाचें तारूं उतटलें । ज्ञान वैराग्यतीरीं लागलें ।
संतसज्जनी साठवीलें । हीनदिनासी ते ही उद्धरिले । ग बाई ॥२॥
ज्याच्या गुणासी नाहीं गणना । ज्याच्या कीर्तीसी नाहीं तुळणा ।
जो स्वयंभू श्रीगुरुराणा । ब्रह्मादिकांसी बुद्धिकळेना । गं बाई ॥३॥
धर्मस्थापना स्थापियेली । न्यायनीतीनें भक्ति वाढविली ।
संतमंडळी ते निवाली । बहु दास ते भूमंडळीं । गे बाई ॥४॥
जन्मजन्मांतरीं पुण्यकोटी । बहु संचित होतें गांठीं ।
योगीरायाची जाली ज्यास भेटी । त्यास कल्याण होये सृष्टी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP