मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
अनाथहीनदीनपतितपावन नाम तु...

श्री गुरूचे पद - अनाथहीनदीनपतितपावन नाम तु...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


अनाथहीनदीनपतितपावन नाम तुझें।
जडमूढतारण शतकोटीकारण वाणी कुजे । वाल्मीक ॥
अविधी अपसव्य कविवर तो भव्य काव्य माजे ।
विधिहर वंदिती त्रिभुवनपद्धती घोष गाजे । कीर्तनीं ॥१॥
सोपें <१ सुगम पवित्र परिकर सौख्यकारी ।
परवर परब्रह्म चिदानंदपददानी निर्विकारी । नाम हें ॥
आजाती नीच याती वर्णावर्ण स्थिती अंगिकारी ।
गुणीजन मुनिजन जनवन सज्जन पुण्यकारी । नाम हें ॥२॥
सहस्रनामातुल्य समतुल्यमहिमा कोण जाणे ।
मावर सुंदर पुरहर ध्यातसे तो चि जाणे । महिमा ॥
तो वर वहन कल्याण गहन खूण बाणे ।
अष्टमा हरी जरी वोळल्या क्षणभरी पाहु नेणें । त्याकडे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP