मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
तुझे चरणीं मानस रामा२ । र...

श्री रामाचे पद - तुझे चरणीं मानस रामा२ । र...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


तुझे चरणीं मानस रामा२ । रंगलें रे ॥ध्रु.॥
जड मूढ प्राणी आम्ही । सरते केले तां स्वामी ।
पतीतपावन ब्रीद । चांगलें रे ॥१॥
अवगुण माझे कोटी । क्षमिले सर्व हि पोटीं ।
आठवितां हदय माझें । दाटलें रे ॥२॥
वारिली संकटें नाना । वोळलासी करुणाघना ।
जनीं वनीं जनार्दना । देखिलें रे ॥३॥
नाम हें कल्याण तुझें । जीवनीं जीवन माझें ।
पूर्व संचित चि तें । लाधलें रे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP