मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
सुंदर कर्कश रूपी । धगधग द...

श्री मारूतीचे पद - सुंदर कर्कश रूपी । धगधग द...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


सुंदर कर्कश रूपी । धगधग दिव्य स्वरूपी ।
अद्‍भुत रुद्र प्रतापी । दानव दंडण पापी ॥१॥
मंद्रातुल्य प्रतिमा । मुखारविंदी उपमा ।
निशिपति राजित महिमा । अतुळ न तुळे सीमा७ ॥२॥
कुमडल कीरटी बरवी । गरगर लांगुळ फिरवी ।
ध्वजांग कर वर मिरवी । अभय सुरवर धीरवी ॥३॥
कांचन चिर लंगोटी । घंटा किंकिणी दाटी ।
सामर्थ्याच्या कोटी । रुळती चरणांगुष्टी ॥४॥
प्रगटत१० भुभुकारें । राक्षस म्हणती बा रे ।
कलिमल न थरे थारे । कल्याणहदयस्था रे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP