मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
मुकें शास्त्र पौराण वेदास...

श्री कल्याण स्तवन - मुकें शास्त्र पौराण वेदास...

रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.

मुकें शास्त्र पौराण वेदासि सांगे । स्वपादें धृवामस्तकीं पंगु वेघे ।
परीक्षा करी रत्न गर्भांध लेकीं । कृपादृष्टि कल्याण हा जैं विलोकी ॥१॥

तृणाळी शिरीं सर्व ब्रह्मांड वाहे । लघू जीव कल्पाग्रि प्राशूनि१ राहे ।
महा दुष्कृती मान घे देवलोकीं । कृपादृष्टि कल्याण हा जैं विलोकी ॥२॥

झुगारूनि दे शेष थोटाळ लंडी । स्वयें लोकनाशाप्रती तो उलंडी ।
महा सूर्य खद्योतया कींव भाकी । कृपादृष्टि कल्याण हा जैं विलोकी ॥३॥

+ न्नगासि२ कुश्चीत दे तेजराशी । अभागी अहो कल्पवृक्षासि तोषी ।
लवें पिप्पलीकाऽर्णवा सप्त शोखी । कृपादृष्टि कल्याण हा जैं विलोकी ॥४॥

अती मूढबुद्धी जिवा ज्ञान सांगे । महा कामिकाचे पदीं मोक्ष लागे ।
पहा मारुता मश्यकू येक धोकी । कृपादृष्टि कल्याण हा जैं विलोकी ॥५॥

सुवासोक्त वाळू द्रवे तेल भारी । स्वशृंगें क्रिमी इंद्रवज्रा विदारी ।
तृणाग्राणी मेरू शिशू साम्य जोखी । कृपादृष्टि कल्याण हा जैं विलोकी ॥६॥

मृणाळी गजाधीप तंतूसी बांधे । महामूर्ख शक्रासनीं क्षेम नांदे ।
सदोषा पदीं धन्य गोदा अहो कीं । कृपादृष्टि कल्याण हा जैं विलोकी ॥७॥

खगेंद्रा जिणी मक्षिका हे सवेगें । समस्तां ग्राहां पृष्ठिसी मूढ लागे ।
विलासे अवीरक्त साम्राज्यसौख्यीं । कृपादृष्टि कल्याण हा जैं विलोकी ॥८॥

अनूरेणूगर्भीं विधीगोळू माये । शिवा साम्य अल्पायुषा प्राप्ति होये ।
पशू श्र्वान ब्रह्मादिकांतें न लेखी । कृपादृष्टि कल्याण हा जैं विलोकी ॥९॥

अहो बाल अज्ञान पांचा दिसांचें । करी पिष्ठ चाऊनिया त्या लोहाचें ।
जगजीवन्‍ काम्यकर्मासि ठोकी । कृपादृष्टि कल्यान हा जैं विलोकी ॥१०॥

N/A

Last Updated : March 26, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP