मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
नभतनयानंदनरिपु जो त्या कु...

श्लोक स्वामीचे - नभतनयानंदनरिपु जो त्या कु...

रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.

नभतनयानंदनरिपु जो त्या कुळींच जो उद्‍भवला ।
नगारिरिपुच्या जनकासह कुळासि घात केला ।
अनुग्रासक सारथी बंधु रिपु धराधिपति जो जाला ।
करुणालय मोठा जाणा सुरनराहि स्तविती ज्याला ॥१॥
काये मी वर्णू आतां तत्पदींच ठेविन माथा ॥ध्रु०॥

केशरीरिपुपति राति अतंक तो निज जवळी ।

केशरीरिपुपति राति अतंक तो निज जवळी ।
पौलस्तिसुत काननरिपु ठेविला निजपद कमळीं ।
कुंभोद्भवअरि ज्याते रति ना हो रम्य सकाळीं ।
अनुपम्य लीळा ज्याची कंदर्प कोटि झळाळी ॥२॥


अनळउद्भवधीपनंदनप्रिया तो हा चि स्वयें गुण गातो ।
नेति नेति म्हणती ज्यातें तो सज्जनहदयीं वसतो ।
स्वामी तो सद्‍गुरु माझा कल्याण जननी जनक तो ।
साम्राज्य निजसुख भोगी मंगळदायक निधि तो ॥३॥

N/A

Last Updated : March 26, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP