मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
श्रोते सावध परिसा जी । हे...

श्लोक स्वामीचे - श्रोते सावध परिसा जी । हे...

रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.

श्रोते सावध परिसा जी । हे विज्ञप्ती माझी ।
तुम्ही सर्वज्ञ समजी । जाणतसा भक्तकथा ॥६२॥

पुढें सोडिलें जनस्थान । येके स्थळीं राहो नये निस्पृहानं ।
म्हणोनि कृष्णातीरा गमन । करिते जाले स्वइच्छा ॥६३॥

तो कृष्णातीरप्रांतीं । श्री कल्यान योगभ्रष्ट मूर्ती ।
खंती बहुत चित्तीं । कैं भेटे मम स्वामी ॥६४॥

ऐसी अवस्था मानसीं । तो भेटी जाली दासासी ।
वंदूनिया चरणांसी । अनन्य भावें शरण ॥६५॥

जैसें लवण सागरासी । गंगा मीनली महोदधीसी ।
कां वायो जैसा आकाशीं । मिनला जाणा सर्वर्थां ॥६६॥

पुढें जगदोधाराकारणें । समर्थें अद्वैतनिरूपण ।
केलें बहु व्याख्यान । वेदशास्रसंमत ॥६७॥

जयाचें कवित्व पाहातां । सांडूनि जाये देहेअहंता ।
श्रीहरीची संलग्रता । बोधें होय जयाचे ॥६८॥

जयाचे बोधें अंतरीं । प्रवेश करी श्रीहरी ।
आणि षड्‍वैरीती वारी । होऊनि जाये सर्वथा ॥६९॥

ऐसें काव्यनिरोपण । सत्सेवकें कल्याणें ।
स्वतां केलें लेखन । समर्थकृपेकरूनि ॥१७०॥

श्रीरामउपासना समर्थ । पुढें सांप्रदाय बहुत ।
वाढविला अद्‍भुत । वैराग्यज्ञानेकरूनि ॥७१॥

ऐसा कित्येक काल जाल्यानंतर ।
श्रीकल्याणासी पाचारुनी सत्वर ।
ठेविते जाले अभयकर ।
जगदोधार करी तूं आतां ॥७२॥

तूं जया कृपा करीसी । तो हासल विश्वामित्रासी ।
नाहीं पार गुरुदेण्यासी । कोण पुसे सृष्टी ये ॥७३॥

ऐसा प्रतापी गहन । होयील तुझिये कृपेनं ।
म्हणोनिया अभयदान । देते जाले आपण ॥७४॥

॥ वोवी ॥ महंतें महंत करावें । युक्तिबुद्धीनें भरावें ।
जाणते करूनि विखरावें । नाना देशीं ॥७५॥

आणि हें वचन साचें । जाणावें पै ग्रंथसंमतीचे ।
मी न म्हणे वाचे । रामदास बोलविते ॥७६॥

मग श्रीभीमातीरासी । कल्याण येते जाले स्वछंदेसीं ।
जे कां ज्ञानभक्तिरासी । निस्पृहपण विख्यात ॥७७॥

पुढें मुद्‍गलनामें विख्यात । श्रीहरीकारणे अद्‍भुत ।
होऊनिया विरक्त । सोडिते जाले आश्रम ॥७८॥

फिरत फिरत सायास । येते जाले भीमातीरास ।
कल्याणवेषें जगन्निवासें । भेटी दिधली तयासी ॥७९॥

जैसा चंद्रतेची चंद्रिका । सूर्यतेची प्रभा देखा ।
नाना नग परी कनका । भिन्नत्व नाहीं सर्वथां ॥१८०॥

ऐसी हे सद्‍गुरुपरंपरा । तारक जाली संसारा ।
श्रोते हो श्रवण करा । प्रार्थना हे तुम्हांसी ॥८१॥

ऐसी ब्रह्मभावें उत्तम । कल्याणसेवा मुद्‍गलभिमान ।
करिते जाले नित्य नेम । येकात्मता करूनी ॥८२॥

अहो सद्‍गुरुसेवेपरते । आणिक नाहीं मोक्षदाते ।
याकारणें चित्तें वित्तें । सद्‍गुरुसेवा करावी ॥८३॥

या संसारसागरीं तारक । सद्‍गुरुसेवा चि येक ।
यावेगळे उपाय आणिक । सर्वही वृक्षा ॥८४॥

N/A

Last Updated : March 26, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP