मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
कां रे निष्ठुर राजसा रामा...

श्री कल्याणचे पद - कां रे निष्ठुर राजसा रामा...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


कां रे निष्ठुर राजसा रामा । राघवा रे ॥ध्रु.॥
चाड हे नसतां आम्हा । कां रे निर्मीले रामा ।
अपराधी मज तां केलें । माधवा रे ॥१॥
अनंत ब्रह्मांडमाळा । न कळे विचित्र कळा ।
बहुरूपी नारायणा । केशवा रे ॥२॥
सकळीक करणें तुझें । संचित प्रारब्ध माझें ।
बोलणें उचित नव्हे । या जीवा रे ॥३॥
जन वन विजन सज्जना । व्यापाक तूं जनार्दना ।
ठाव हा न दिसे कांहीं । या भवा रे ॥४॥
तन मन धन माझें । सांडणें सांडिलें सहजें१ ।
दासां कल्याण करी । तूं देवदवां रे ॥५॥


Last Updated : March 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP