मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
विशेष स्मरणें देव चि होतो...

श्री गुरूचे पद - विशेष स्मरणें देव चि होतो...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


विशेष स्मरणें देव चि होतो । जनास उद्धरितो ।
महादेव तो अखंड ध्यातो । स्मशानवास करीतो ॥१॥
म्हणउनि स्मरा रे स्मरा रामराया ॥धृ०॥
स्मरण जातें दगा च खातें । कानकोंडें होतें ।
लक्ष चौर्‍यासी पडिले फासी । स्वहित करी ना तें ॥२॥
पळ पळ चळतें देही च कळतें । आयुष्य निघोनिया जातें ।
निमिष्य येक स्मरणीं रहातां । कल्याणस्वरूप होतें ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP