मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
भीतरी जाऊनि कपाट लाउनि दे...

श्री मारूतीचे पद - भीतरी जाऊनि कपाट लाउनि दे...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


भीतरी जाऊनि कपाट लाउनि देवीस दाटीत दाटी ।
गर गर गर लोचन फिरवी, भीम भयानक जेठी ॥१॥
अरिवीर ठकिले रे ठकिले वानरवीरें ॥ध्रु.॥
अहिवीर महीवीर वीरवीर समवरवर१ निज खूणा ।
सुरस रसना इछिती षड्‍रस सत्वर नैवेद्य आणा ॥२॥
रजनीचर वीर तरतर वेधती भगवती प्रसाद माथा ।
गवाक्ष पाहुनि धबधब वोतिति दधी घृत मध दूध चलथा ॥३॥
घटघट घटघट रसना घोटी मोठी धारा सुटी ।
अद्‍भुत उदरीं शांती न दिसे त्रिभुवन ज्याचे पोटीं ॥४॥
लेयं पेयं चोष्म खाद्यसें गटगट गटकावितो ।
चटमट चटमट चटमट करितो मटमट मिटक्या देतो ॥५॥
आंबे निंबे आणसें फणसें अंजिरें केळें बोरें ।
असंख्य मोटा राक्षस रिचविति शिणलीं रांडापोरें ॥६॥
अरिवीरदंडण कल्याणमंडण रामउपासक ध्याती ।
ऐकुनि कीर्ती सज्जन मूर्ती ईश्वर गातीं गीतीं ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP